जय श्रीराम!
मानस - वारी श्रीमहाराजांसोबत (भाग २)
आषाढी एकादशीच्या भल्या पहाटेच २ वाजता श्रीमहाराज चंद्रभागेवर स्नान करून आईसाहेबांसहित विठ्ठल मंदिरात दाखल झालेले आहेत. श्रीमहाराज महाद्वारावर संत नामदेवांच्या पायरीवर डोके टेकतात.
नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे । वरी संत हिरे पाय देती ।।
मानस - वारी श्रीमहाराजांसोबत ( भाग -१)
जय श्रीराम!
आपल्या सगळ्यांना माहीत आहेच की श्रीमहाराजांचे आजोबा लिंगोपंत दर एकादशीला पंढरपूरची वारी करायचे. महाराजांचे वडील रावजीबाबासुद्धा वारीला जात असत. तोच परिपाठ महाराजांनी सुरू ठेवला होता.
आज आपण महाराजांच्या सोबत मानस- वारी करणार आहोत.
महाराजांच्या आयुष्यातले अखेरचे वर्ष. पंढरपूरच्या बडव्यांचे वाद महाराजांनी सोडवले होते. तेव्हापासून त्यांच्यापैकी एक जण कधीपासून महाराजांना पंढरपुरास चलण्यास आग्रह करत होते. त्याप्रमाणे महाराज जून १९१३ मधे निघाले.
हाच धागा पकडून आता पुढे...
****
मानस - वारी ( भाग १)
"मंदिराला कळस होता सोन्याचा, गाभाऱ्याला घमघमाट होता चंदनाचा, समईच्या वातीला तुप त्यात केशराची धुप, चोहीकडे पुण्य पुण्याचाच उत, कुणी सांगावे या सोगांड्यांना?
गर्भगृहाचा तो दगड सुखला होता दुधाशी, अन पायरीवर मात्र देव निजला होता उपाशी."
वाचायला किती भारी वाटतं ना?
सदरची चारोळी एका समाज माध्यमावर वाचनात आली.
ही चारोळी रसात्मक रूपाने उत्तम आहे. मात्रांचा मेळ ही जमला आहे, जो संदेश द्यायचा आहे तो देखील अत्यंत कल्पकतेने दिला आहे ,पण देण्यात आलेला संदेश मात्र चुकीचा आहे.
गांभीर्यपूर्ण हास्य मी
अन् गहन रहस्य मी
कल्लोळपूर्ण शांती मी
अनंताप्रतची भ्रांती मी
थंड शीत ज्वाळ मी
न् सर्वनाशी काळ मी
शास्त्र मी न् शस्त्र मी
अधर्मभेदी अस्त्र मी
जहाल कडवा सर्प मी
मधुर विषारी दर्प मी
तांडवी रूद्र मी
बलिष्ठ वीरभद्र मी
भयाण,रौद्र,शांत मी
न् खल विदीर्ण अंत मी
गूढ, विषण्ण नाद मी
युगांतरीची साद मी
धैर्य मी धारिष्ट्य मी
अनंत अन् वरिष्ठ मी
हृदयप्रकांड भय मी
।। राम कृष्ण हरी।।
" यशापयशाच्या विचारांचा पूर्णपणे त्याग करून हे अर्जुना तू तुझे कर्म कर. या पृथ्वीचे अखंड राज्य मिळवण्यासाठी अथवा सती द्रौपदीला न्याय मिळवून देण्यासाठी अथवा युधिष्ठिराला राजसिंहासनी बसवण्यासाठी हे धर्मयुद्ध लढूच नकोस मुळी, फक्त मी सांगतोय म्हणुन, फक्त माझी आज्ञा आहे म्हणून, हे धनंजया तुझे कर्तव्य निभावण्यासाठी तू हे युद्ध कर अन्यथा हे अनघ अर्जुना तू नाहक अधम गतीला प्राप्त होशील, येणाऱ्या हजारो पिढ्या तुला शौर्यहीन ठरवतील. इंद्रालाही लाजवणारे पराक्रम करणाऱ्या तुझ्या महान धर्मनिष्ठ भरतादी पूर्वजांच्या पुरुषार्थावरचा तू कलंक बनशील.”
‘भक्त बाळ प्रह्लादाला छळीले पित्याने, नारसिंहरूपे त्याला रक्षिलें प्रभुने…’
होळी आली की हिरण्यकश्यपू, होलिका आणि भक्त प्रह्लादाच्या कथेची आठवण होते. आजच्या युगात आजूबाजूला जेव्हा अधर्म थैमान घालत असतो तेव्हा सामान्य माणसाला प्रश्न पडतो कारण प्रत्येकासाठी प्रह्लादासारखा चमत्कार घडताना दिसत नाही. आपल्याच कर्माला दोष द्यायचा म्हटलं तरीही कुठेतरी श्रद्धा डळमळीत व्हायला लागते. मग ती खरंच श्रद्धा असते की भाबडी समजुत?
भारतात, जेथे विविध समुदाय शेजारी-शेजारी राहतात, तेथे हलाल आणि झटका यांसारख्या अन्न पद्धती समजून घेणे महत्त्वाचे आहे. दोन्ही पशू कत्तलीशी संबंधित असले तरी त्यांचे अर्थ आणि महत्त्व वेगळे आहे. चला ते सरळ तोडून टाकूया:
हलाल:
अर्थ: "परवानगीयोग्य" . अरबी म्हणजे इस्लामिक आहारविषयक कायद्यांनुसार तयार केलेले अन्न होय.
कत्तल करण्याची पद्धत: एक धारदार चाकू पशूच्या मानेतील प्रमुख रक्तवाहिन्या चटकन तोडते, वेदना कमी करते आणि संपूर्ण रक्त निचरा सुनिश्चित करते. प्रक्रियेदरम्यान प्रार्थना केली जाते.