२३ व्या शतकातील हिंदू धर्म

Submitted by Mandar Katre on 23 December, 2024 - 11:29

इसवी सन २२५० साली धर्म आणि हिंदू धर्माचे स्वरूप आणि मानवी जीवनातील स्थान काय असेल याबाबत काही विचार मनात आले.... त्याबद्दल आपली मते अपेक्षित आहेत...

१. ह्युंमनोईड रोबोट आणि मानव यांचे संबंध आणि याबाबत तत्कालीन धर्माचे काय मत असेल?
२. अस्ट्रॉइड बेल्ट आणि मंगळ इत्यादी ग्रहावरील वसाहतीतील लोकं कोणता धर्म पाळत असतील व त्यांच्या आयष्यात धर्माचे काही स्थान असेल का व असल्यास काय?
३. मानवी लैंगिक संबंध आणि प्रजोत्पादन याबाबत तत्कालीन धर्म नियम काय असतील? कारण बहुधा सर्व प्रजोत्पादन यांत्रिक असणार...

असे अनेक प्रश्न मनात आले... आपणास काय वाटते???

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहो ऋन्मेऽऽष, चुकताय तुम्ही. फक्त प्रजोत्पादन यांत्रिक असणार. असं म्हणतायत ते. म्हणजे प्रजोत्पादन करण्याची चिंता नसल्यामुळे , उलटी नुसतीच मजा. आणि असं झालं तर धर्म काय म्हणेल असा त्यांच्या प्रश्नाचा अर्थ मी काढला.

अजुन २०० वर्षे मानवजात टिकेल का हा प्रश्न आहे.

टिकलीच तर आर्टिफिशियल इन्टेलिजन्ट रोबो तिचे काय हाल करतील, त्याम्च्या जगात तिचे समाजातील स्थान काय असेल हा दुसरा प्रश्न आहे.

पण जगात सांमजस्य निर्माण झाले व त्यामुळे टिकली तर हिंदु सनातन धर्म मुळ स्वरुपात असेल. या धर्मात कसलेही लिखित नियम नसल्यामुळे, उत्साहीमंडळीनी जे लिहिले गेले ते पाळलेच पाहिजे हे बंधन नसल्यामुळे धर्म खाजगी व व्यक्तीगत स्वरुपात राहिल. त्यामुळे तिनही मुद्द्यांचे उत्तर हेच असेल की तेव्हा जे सोयीचे असेल तसे लोक वागतील. तेव्हा काय सोयीचे असेल याचा विचार करुन लिहायला इथे विज्ञानकथा लिहिणारे लेखक आहेत. ते करतील हा उद्योग, वाचक वाचतील.

जगात सामंजस्य निर्माण झाले तर… हा कळीचा मुद्दा आहे. सध्याचे धर्म सामंजस्य प्रमोट करत नाहीत.

असे अनेक प्रश्न मनात आले... आपणास काय वाटते??? >>

असे प्रश्न कुणाच्याही मनात येऊ शकतात.
इतर कुणाला काही वाटण्याचा काय संबंध ? पण तुमच्या मनात प्रश्न आले याबद्दल इतरांना काय वाटले हे जाणून घेण्याचा प्रयत्न कौतुकास्पद आहे.
मन म्हणजे काय ? त्यावर नियंत्रण कसे मिळवावे याचे अनेक युट्यूब व्हिडीओज आहेत.

मन जर २२५० सालात गेले असेल आणि ह्युमनॉईड व धर्म यांच्या संबंधावर विचारात पडले असेल तर त्याला जानेवारी २०२५ साली भारतात पेट्रोलचे भाव काय असतील,कोथिंबीरीची गड्डी काय भावाने मिळेल यावर विचार करायला भाग पाडा म्हणजे ते इतके लांब फिरायला जाणार नाही. सध्याच धर्माचे ह्युमनॉईड बद्दल मत काय याबद्दल मनाला विचार करायला सांगा.
यंत्र पुनरूत्पादन कसे करणार हे मनाला स्पष्ट करायला सांगा.

बाकी तुमचे मन काहीही विचार करायला स्वतंत्र आहे असेच मला फायनली वाटते.

हिंदु सनातन धर्म मुळ स्वरुपात असेल>>> इथे २०२४ मध्येच हिंदू धर्म धोक्यात आहे असे महामानव, ईश्वरीय अंश, विश्र्वगुरू श्री श्री श्री मोदीजी म्हणत होते.