Submitted by शब्दब्रम्ह on 23 April, 2024 - 06:13
गांभीर्यपूर्ण हास्य मी
अन् गहन रहस्य मी
कल्लोळपूर्ण शांती मी
अनंताप्रतची भ्रांती मी
थंड शीत ज्वाळ मी
न् सर्वनाशी काळ मी
शास्त्र मी न् शस्त्र मी
अधर्मभेदी अस्त्र मी
जहाल कडवा सर्प मी
मधुर विषारी दर्प मी
तांडवी रूद्र मी
बलिष्ठ वीरभद्र मी
भयाण,रौद्र,शांत मी
न् खल विदीर्ण अंत मी
गूढ, विषण्ण नाद मी
युगांतरीची साद मी
धैर्य मी धारिष्ट्य मी
अनंत अन् वरिष्ठ मी
हृदयप्रकांड भय मी
न् गहन गूढ लय मी
हृदयज्वाला क्रांती मी
रहस्यमय भ्रमंती मी
गहन अंधकार मी
युगंधरी प्रहार मी
तांडवी संहार मी
न् गूढ सूत्रधार मी...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
क्या बात है!
क्या बात है!
ह्या गहनगूढ, विश्वनियंत्या सूत्रधाराचा परिचय नितांत सुंदररित्या शब्दबद्ध केलात...
@ पॅडी धन्यवाद..!
@पॅडी
धन्यवाद..!
वाह!! होय सूत्रधारच
वाह!! होय सूत्रधारच