आपल्या सनातन किंवा हिंदु धर्माचा नविन वर्षाचा पहिला दिवस गुढीपाडवा. १३ एप्रिलला शालिवाहन शकेप्रमाणे १९४३ वे वर्ष सुरू होतं आहे. माझ्या लहानपणी सगळेच सण धार्मिक व कौटुंबिक द्रुष्टीकोनातून साजरे व्हायचे. त्यामुळे मोठ्यांबद्दल आदर, इतरांबद्दल सहिष्णूता, माया, ममता ही सगळी नैतिक मुल्ये जपली जायची. एकमेकांच्या सहकार्यामुळे समाजात सुख, शांतता होती. म्हणून सध्ध्यांच्या रोजच्या बातम्यांमधुन, जगांतली वाढत असलेली अस्थिरता व कमी होतं असलेली शांतता व मानवतां फार जाणवते. म्हणूनच, मी या वर्षी, नविन विचारांची "मानवतेची गुढी" स्थापन करायचे ठरवल आहे.
अपि क्रियार्थं सुलभं समित्कुशं जलान्यपि स्नानविधिक्षमाणि ते।
अपि स्वशक्त्या तपसि प्रवर्तसे शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् ।।
महादेवाच्या प्राप्तीसाठी घोर तपश्चर्या करणाऱ्या पार्वतीची परीक्षा घेण्यासाठी ब्रह्मचाऱ्याच्या वेषात भगवान शंकर प्रकटतात. पार्वतीच्या घोर तपस्येकडे पाहून म्हणतात की ‘तपःसाधनेसाठी आवश्यक अशी सामग्री, स्नानासाठी पाणी इ. सोयी उपलब्ध आहेत ना? कारण तू हे जाणतेस की शरीर हे धर्म (येथे ध्येय) साध्य करण्याचे प्रथम साधन आहे.’
अंतरंग – भगवद्गीता – भाग ९
झळकत कटि शोभे पीत वस्त्रे जयास
कनक किरिट माथी उज्वले नीलभास
शर धरि कर स्कंधे सज्ज कोदंड दंडा
असुरगण गळाठे हर्ष भक्ता उदंडा
मृदुल स्मित खुणावी ना भी संसारदुःखा
कर तरि नित पाठी धीर देई प्रभूचा
सजल जलद मोही रुप या राघवाचे
निशिदिनि मनी ध्याता मूळ तुटे भवाचे
अवतरण जयाचे भाविका उद्धराया
निजजन हित वाहे देऊनी नामछाया
असे आगळा राम आदर्शमूर्ती
जना दावूनी श्रेष्ठ कर्तव्यपूर्ती
वरी भाविका देतसे दिव्य भक्ती
अशा राघवासी स्मरावे भजावे
किती रामदासे जना बोधवावे
असे आगळा राम आदर्शमूर्ती
तया टाळूनी वाउगेची पूजीती
भ्रमा वाढवोनी रती आत्मघाती
अभक्ते स्वये देशही नासविती
बहु भक्त झाले इथे राघवाचे
पुढे गोडवे दिव्य ते सद्गुणाचे
तया पाहता कीव ये दुर्जनाचे
रवी तेज ते येई का काजव्याचे
जना उद्धराया स्वये राम येई
तया सांडूनी नष्ट ते दुष्ट ध्यायी
भ्रमाने भ्रमाते जगी वाढवीती
जनासी तरी व्यर्थचि घोळविती
(भरत जेव्हा श्रीरामांना परत नेण्यासाठी हट्ट करतो, पण श्रीराम वचनपालनापासून ढळत नाहीत, तेव्हा सर्व लोक जनक महाराजांना निवाडा करण्याची विनंती करतात. त्यावेळी जनक महाराज म्हणतात…)
श्रींच्या चरणी अनन्य व्हावे
प्रेम असे निष्काम असावे
रामप्रभू हे धर्मध्वजाधर
भरता, तू प्रेमाचा सागर
इतका सुंदर बघता संगर
न्यायनिवाडे सर्व हरावे
प्रेम असे निष्काम असावे
हक्क तुझा रामावर भरता
हट्ट तुझा हा योग्य सर्वथा
निर्मळ प्रेमळ अंतर असता
धर्माहुन ते श्रेष्ठ ठरावे
प्रेम असे निष्काम असावे
मित्रहो! गेले काही दिवस एका प्रश्नाने मनात घर केले आहे.मी हा प्रश्न बर्याच जणांना विचारला पण पटेलसे उत्तर कुठेच मिळाले नाही.
वरच्या फोटोत दिसणार्या व्यक्ती श्री रतन टाटा आणि श्री मुकेश अंबानी हे भारतातील अब्जाधीश उद्योगपती आहेत.फोटोत ते तिरुपतीच्या बालाजी मंदिरात दर्शनासाठी आल्याचे दिसत आहे.निदान ते मंदिर प्रांगणात आहेत इतके तरी नक्कीच.
तर प्रश्न असा आहे की हे दोघे अब्जाधीश पदरचे ३-४ तास खर्च करुन तिरुपतीच्या बालाजीला का गेले असावेत? (मंदिर कोणत्या देवाचं आहे हा प्रश्न इथे महत्वाचा नाहीये.ते कोणत्याही देवाच्या मांदिरात गेले तरी फरक पडत नाही.)
दोन इंटरेस्टिंग कथा आहेत .. खऱ्या खोट्या देव जाणे पण अध्यात्मिक वाटचाल करू इच्छिणाऱ्यांसाठी मार्गदर्शक आहेत.