धार्मिक
धार्मिक , भाषिक अस्मिता आणि तुम्ही
गेल्या काही महिन्यांपासून फेबुवर मराठी भाषाप्रेम टिपेला पोहचले आहे. विविध ग्रुपांतून मराठी शब्दांची उत्पत्ती, इंग्रजी शब्दांसाठी मराठी शब्द शोधणे हे सुरु आहे. दक्षिण भारतीय भाषांमधे बनणारे सिनेमे हे नेहमीच बॉलीवूडच्या सिनेमांपेक्षा कथा,पटकथेच्या दृष्टीने कसे दर्जेदार असतात ते पटवून देण्यात बॉलीवूडविरोधक पुढे असतात. महाराष्ट्रासहित दक्षिण भारतातील महानगरांमधे हिंदी भाषिकांकरवी होणारे हिंदी भाषेचे आक्रमण हे स्थानिक भाषांची गळचेपी करत असल्याबद्दलची अोरड तर नेहमीच होते. हिंदीची दादागिरी थांबवा अशी फेसबुकी आंदोलने बरीच सुरु आहेत. जोडीला सावरकरप्रेमींची भाषाशुद्धी आहेच.
मी आणि धर्म
हिंदू धर्मात भरपूर धर्मग्रंथ आहेत , त्यापैकी एकाच्याही वाटेला मी आजपर्यंत गेलेले नाही आणि पुढेही जाण्याची इच्छा नाही , साधी सत्यनारायण कथा ऐकताना माझ्या कपाळाला आठ्या पडतात की कोणी लिहिलं आहे हे , म्हणे प्रसाद खाल्ला नाही तर रागावून नुकसान करणारा देव ... तेव्हा पुराणातल्या अमुक कर्माला अमुक शिक्षा वगैरे वर्णनं करणारे ग्रंथ माझ्या पचनी पडणार नाहीत हे उघडच होतं .. मासिक पाळीच्या काळात स्त्रीला लांब बसवावी , तिचा स्पर्श अपवित्र इथपासून नवऱ्याच्या मृत्यूनंतर केशवपन आणि सती सारख्या प्रथा असलेल्या धर्माबद्दल मला आजवर कधीच आत्मीयता वाटलेली नाही .
गांधारी एक अद्वितीय नारी (भाग २)
पूर्वेकडून सूर्याची किरणे संपूर्ण सृष्टीवर प्रकाशाची उधळण करत होती . सर्व सृष्टी प्रकाशाने न्हाऊन निघत होती .प्रकाशाची चाहुल लागताच पक्षी किलबिलाट करत होते.पक्षांचे थवेच्या -थवे घरटी सोडत आकाशात उड्डाण करत होते .नदी घाटावर लोक सकाळची स्नान संध्या उरकत होते .तर कोणी मंत्रोच्चार तर कोणी सूर्य नमस्कार करत होते .महिला घरदार स्वच्छ करत होत्या; तर कुठे रांगोळी काढण्यात मग्न होत्या .गुरेढोरे ,घोडे ,हत्ती अंग झटकून उभी राहत होती . गोशाळांमध्ये स्त्री -पुरुष धारा काढत होते.कोठे लांबच्या मंदिराचा घंटा रव कानावर येत होता.तर कुठे भूपाळीचे मधुर स्वर कानावर पडत होते .
आरती गणपतीची
नमस्ते मित्र मैत्रिणींनो,
ही गणपतीची आरती माझ्या बाबांच्या काकांनी तयार केली आहे.
आम्ही ती अनेक वर्ष घरी रोज म्हणतो. तिचा प्रसार व्हावा हि इच्छा आहे.
तुम्हाला आवडल्यास तुम्हीही म्हणू शकता.
जय देव जय देव जय ओंकार रूपा
आरती ओवाळिता नुरविशी पापा || धृ ||
विश्वस्वरूपा तुजला स्थापू मी कोठे
आवाहन करू कैसे संमंतपी थाटे
तव निज महिमा आठविता तर्को दधि आटे
पाहुनी अद्भुत शक्ती आदर बहू वाटे || १ ||
संत तुकाराम महाराजांचे परमशिष्य श्री निळोबाराय
नाशिक येथील श्री. नीळकंठ मोहिनीराज नांदुरकर यांनी अल्पशा संदर्भ सामग्रीवर संत निळोबाराय यांचं जीवनचरित्र लिहिलं आहे. त्यावरुनच निळोबांचा अल्पपरिचय करुन देते.
दुःख
"मी दुःखात आहे." हे माणूस किती प्रामाणिकपणे. मनापासून आणि खरंतर कौतुकाने मान्य करतो! पण "मी सुखात आहे." हेही तेवढ्याच प्रामाणिकपणे आणि मनापासून का मान्य केलं जात नाही? "मी सुखात आहे" म्हणणार्यांच्या स्वरात काहिसा विषाद किंवा डोळ्यांत सत्य लपवण्याच्या धडपडीसारखे भाव असायलाच हवेत का? का नाही तो छातीठोकपणे सागू शकत की "हो... मी सुखात आहे! मला असलंही दुःख नाही! मला कुणाकडून कसलीही तक्रार नाही! माझी जेवढी अपेक्षा होती, माझी जेवढी पात्रता होती, त्याहून कित्येक पटींनी जास्त मला आयुष्याकडून मिळालेलं आहे. त्यासाठी मी द्देवाचा ऋणी आहे. आभारी आहे. समाधानी आहे. सुखी आहे."
संत गणोरेबाबा, पुणे
नमस्कार,
महाराष्ट्र ही संतांची भुमी म्हणुन ओळखली जाते. या लेखात आपण अशाच एका अपरिचित संताची ओळख करुन घेणार आहोत.
साक्षात्कार
साक्षात्कार!
जगता जगता अगणित वेळा माणसाच्या आयुष्यात साक्षात्काराचे प्रसंग येतात. दैनंदिन जीवनात येण्यार्या सर्वसाधारण अनूभुतींना साक्षात्कारचे नाव दिले तर हा शब्द, त्याचा अर्थ, आणि त्या अर्थाचे गांभीर्य हे सगळंच अगदी बोथट होऊन जाईल. पण तरीही.. खरोखरच ज्याला ’साक्षात्कार’ म्हणता येईल असं आपल्या आयुष्यात कितीदा घडतं?
करा उदो उदो
करा उदो उदो:कार गर्जा जय भवानी |
अष्ट्भुजा आली घरा अंबिका नारायणी ||
सुंदर कोमल कांती अष्टभुजा तळपती |
अयुधे त्रिशुलादि हाती नयनदीप झळकती |
चंद्रवदन ओठ लाल हास्य विलसे वदनी |
अष्टभुजा आली घरा अंबिका नारायणी ||
लाल शालु जरतारी चोळी हिरवी भरजरी |
कंठी हार मुक्तमाळ मेखला शोभे कटी |
नुपुर पदी रुणझुणती त्रिशुळ निशुंभावरी |
अष्टभुजा आली घरा अंबिका नारायणी ||