करा उदो उदो:कार गर्जा जय भवानी |
अष्ट्भुजा आली घरा अंबिका नारायणी ||
सुंदर कोमल कांती अष्टभुजा तळपती |
अयुधे त्रिशुलादि हाती नयनदीप झळकती |
चंद्रवदन ओठ लाल हास्य विलसे वदनी |
अष्टभुजा आली घरा अंबिका नारायणी ||
लाल शालु जरतारी चोळी हिरवी भरजरी |
कंठी हार मुक्तमाळ मेखला शोभे कटी |
नुपुर पदी रुणझुणती त्रिशुळ निशुंभावरी |
अष्टभुजा आली घरा अंबिका नारायणी ||
मूर्ति तू सुभाग्याची कृपा सागराची
शरण त्र्यंबिके गौरी जननी मंगलाची |
कृपा दृष्टी ठेवि माते नमन तुझ्या चरणी |
अष्टभुजा आली घरा अंबिका नरायणी ||
सुंदर देवी स्तवन .
सुंदर देवी स्तवन .
बोल भवानी की जय ......छान
बोल भवानी की जय ......छान
विभाग्रज, सुहासिनी आभार.
विभाग्रज, सुहासिनी आभार. तुझ्या दसर्याच्या शुभेच्छा सर्वांना पोचवल्या. तुम्हा सर्वांनाही दसर्याच्या शुभेच्छा.
अतिशय सुरेख काव्य! मातेचं
अतिशय सुरेख काव्य! मातेचं वर्णन सुंदर.
तुम्ही क्रंति साडेकर का?
तुम्ही क्रंति साडेकर का? आत्ताच मी "गौरीसुता गजवदना" ह्या गीताला श्री प्रमोद देव यांनी लावलेली चाल ऐकत होते. खूप सुंदर गीत आहे. ते ऐकल्यावर मी थोडी नर्वस झाले होते. कारण तुम्ही गजाननाचं इतकं
सुंदर वर्णन केलेलं पाहून मला मी उगाच देविचं गाणं पाठवलं असं वाटलं. पण आत्ता पहाते तो तुमचा छान
प्रतिसाद.तुमचे मनःपूर्वक आभार.
सहजतेने केलेलं अंबा मातेचं
सहजतेने केलेलं अंबा मातेचं प्रभावी वर्णन...... आवडलं.
सुंदर कवन !
सुंदर कवन !
सर्वांचे मनःपूर्वक आभार
सर्वांचे मनःपूर्वक आभार
सुरेख वर्णन.. खूपच प्रभावी !!
सुरेख वर्णन.. खूपच प्रभावी !!
ही पण झकास!!!
ही पण झकास!!!
ही वाचलेल्यांनी ही पण
ही वाचलेल्यांनी ही पण वाचा
http://www.maayboli.com/node/29959
धन्यवाद.
धन्यवाद.
छान लिहीलय.
छान लिहीलय.
खूपच छान...
खूपच छान...
खुपच छान लिहीतेस ग
खुपच छान लिहीतेस ग
वर्षा, मुक्ता, स्वाती
वर्षा, मुक्ता, स्वाती प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार.
खूपच छान...
खूपच छान...
अखी धन्यवाद.
अखी धन्यवाद.
http://www.divshare.com/downl
http://www.divshare.com/download/15988089-553
माझी प्रतिक्रिया ऐका.
आई राजा उदे उदे.....
आई राजा उदे उदे.....
सुरेख कवित्तं.
सुरेख कवित्तं.
मस्त.
मस्त.
सुरेख कवित्तं.
सुरेख कवित्तं.