करा उदो उदो

Submitted by सुरेखा कुलकर्णी on 5 October, 2011 - 12:03

करा उदो उदो:कार गर्जा जय भवानी |
अष्ट्भुजा आली घरा अंबिका नारायणी ||

सुंदर कोमल कांती अष्टभुजा तळपती |
अयुधे त्रिशुलादि हाती नयनदीप झळकती |
चंद्रवदन ओठ लाल हास्य विलसे वदनी |
अष्टभुजा आली घरा अंबिका नारायणी ||

लाल शालु जरतारी चोळी हिरवी भरजरी |
कंठी हार मुक्तमाळ मेखला शोभे कटी |
नुपुर पदी रुणझुणती त्रिशुळ निशुंभावरी |
अष्टभुजा आली घरा अंबिका नारायणी ||

मूर्ति तू सुभाग्याची कृपा सागराची
शरण त्र्यंबिके गौरी जननी मंगलाची |
कृपा दृष्टी ठेवि माते नमन तुझ्या चरणी |
अष्टभुजा आली घरा अंबिका नरायणी ||

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

विभाग्रज, सुहासिनी आभार. तुझ्या दसर्‍याच्या शुभेच्छा सर्वांना पोचवल्या. तुम्हा सर्वांनाही दसर्‍याच्या शुभेच्छा.

तुम्ही क्रंति साडेकर का? आत्ताच मी "गौरीसुता गजवदना" ह्या गीताला श्री प्रमोद देव यांनी लावलेली चाल ऐकत होते. खूप सुंदर गीत आहे. ते ऐकल्यावर मी थोडी नर्वस झाले होते. कारण तुम्ही गजाननाचं इतकं
सुंदर वर्णन केलेलं पाहून मला मी उगाच देविचं गाणं पाठवलं असं वाटलं. पण आत्ता पहाते तो तुमचा छान
प्रतिसाद.तुमचे मनःपूर्वक आभार.

मस्त.

Back to top