मागच्या महिन्यातल्या एका रविवारच्या संध्याकाळी धोधो पाऊस कोसळत होता. त्यामुळे घरातच अडकून पडलो होतो. आंतरजालावर पुरेसे बागडून कंटाळा आला होता. मग वेळ घालवायचा म्हणून छापील इंग्लिश वृत्तपत्राची साप्ताहिक पुरवणी बारकाईने पाहू लागलो. त्यातला एक लेख दुबईबद्दल होता. त्या शहराची अनेकविध वैशिष्टे सांगितल्यावर तिथल्या एका संग्रहालयाचा त्यात उल्लेख होता. त्यामध्ये सर्व देशांच्या आतापर्यंत छापल्या गेलेल्या चलनी नोटांचे प्रदर्शन आहे. त्यात जगभरातील जवळजवळ सर्व नोटा असून ‘त्या’ जगप्रसिद्ध १००ट्रिलियन झिंबाब्वे डॉलर किमतीच्या नोटेचाही समावेश आहे. हे वाचून स्तिमित झालो.
सर्वांना नमस्कार. नेताजी सुभाषचंद्र बोस! लहानपणापासून त्यांच्याबद्दल अतिशय आत्मीयता वाटते. "महानायक" आणि "नेताजी" अशी मोठी पुस्तकं व इतर अनेक पुस्तकांमधून त्यांचा परिचय झाला. नव्हे त्यांच्या आयुष्यातला प्रत्येक प्रसंग, प्रत्येक घटना मनावर बिंबली होती. लहानपणापासून त्यांचं वेगळेपण, त्यांचे विचार, त्यांची बंडखोर वृत्ती, शाळा- महाविद्यालयातील पराक्रम, नंतर ब्रिटनमधील शिक्षण, गांधीजींना विरोध, दुस-या महायुद्धामध्ये केलेला अभूतपूर्व प्रवास, परकीय देशांमध्ये जपलेला स्वाभिमान, देश प्रेम, पुन: एकदा रोमांचक पाणबुडी प्रवास, पूर्व आशियातील रोमहर्षक महाभारत आणि...
महाराष्ट्र शासन मध्यंतरी जुने सातबारा , फेरफार online उपलब्ध करून देणार असे वाचले होते . परंतु अजून . काही पुणे, अ.नगर जिल्ह्याची जुनी माहिती दिसत नाही . कोणाला यासंदर्भात काही update असेल तर सांगा ...
मला ही माहिती पणजोबा आणि इतर पूर्वज यांच्या माहितीसाठी हवी आहे . म्हणजे आजोबांना लिहितावाचता येत नव्हते त्यामुळे एक दोत पिढ्यांपर्यंतच तोकडी माहिती त्यांच्याकडे आहे . मी जरा खोलात जाऊन कुतुहल म्हणून हे सगळं करण्याचा प्रयत्न करतोय .
कोरोनामुळे सध्या घरीच आहे. अभ्यास करून कंटाळा आल्यावर असंच काहीतरी वेगळं वाचावं म्हणून रस्किन बॉन्ड वाचत होतो . एका कथेचं नाव होतं - old graveyard at sirur....( By C.A Kincaid ) सिरुर वाचून जरा उडालोच... सिरुरची कथा ते पण रस्किन बॉण्ड च्या पुस्तकात?? छे छे हे दुसरं काहीतरी असेल म्हणून पुढे वाचायला सुरुवात केली .. forty miles from POONA आणि आश्चर्य सत्यात उतरलं हे पुणे नगर रोडवरचंच शिरूर ... तर कथा होती अशी की पुण्याच्या एका इंग्रज अधिकार्याला शिरूरला असताना स्थानिक लोक एका ठिकाणी नमस्कार करून जाताना दिसले .
आपण माझ्या पहिल्या लेखाला जो प्रतिसाद दिलात, तो पाहून माझा लिहिण्याचा हुरूप अजूनच वाढला. मला खात्री आहे, दूसरा भागही आपण पसंद कराल. या लेखात मी चाणक्यांचा उल्लेख काही ठिकाणी 'आचार्य' म्हणून केला आहे.
चाणक्य भाग -1 चाणक्यांचा जन्म आणि राजकारणात प्रवेश - https://www.maayboli.com/node/79173
दुसर्या भागाची सुरुवात .......................
चाणक्यांच्या जन्म आणि बालपणाबद्दल अनेक खर्या खोट्या पण तितक्याच विलक्षण गोष्टी ऐकिवात आहेत. तमिळनाडूतील शोलियार समाज आणि केरळमधला नायर समाज त्यांना आपआपल्या जमातींतला विद्वान समजतात. चाणक्यांना म्हणे जन्मतःच सगळे दात आले होते; आणि त्यामुळेच एका ज्योतीष्याने त्यांच्या आईला त्यांचे भविष्य असे संगितले होते की ,"ज्या अर्थी तुमच्या पुत्राला जन्मतःच सर्व दात आले आहेत, त्याअर्थी हा मोठेपणी एका अफाट साम्राज्याचा चक्रवर्ती सम्राट होईल." परंतु दक्षिण भारतातल्या रिवाजाप्रमाणे त्याकाळी केवळ क्षत्रियच राजा होऊ शकत असे, त्यामुळे चाणक्याला त्याचे सर्व दात काढून टाकावे लागले.
कथा: पोळी शब्दाच्या इतिहासातील उल्लेखाची
चेहरापुस्तकावर पोळी आणि चपाती यापैकी योग्य मराठी शब्द कोणता यावर वाद झडत असतांना इतिहासाची पाने चाळतांना काही ऐतिहासीक पुरावे हाती लागले.
महान पुरुषांना आपला मृत्यू आधीच कळतो असं म्हणतात. `महान` हा शब्द लोकांच्या भल्यासाठी आपले आयुष्य वेचलेल्या व्यक्तींसाठी आपण वापरतो. तशा अर्थाने हिटलरला महान निश्चितच म्हणता येणार नाही. पण त्याचं संपूर्ण जीवन जर आपण पाहिलं तर ते एका असामान्य माणसाचं होतं हे कोणीही मान्य करेल. तर अशा या असामान्य हिटलरनं आपल्या बोलण्यातून, लिखाणातून आणि भाषणांतून अनेकदा त्याला आयुष्य फारच कमी असल्याचं सांगितलं होतं. १९२८च्या दरम्यान तो एकदा म्हणाला होता की आत्ता मी ३९ वर्षांचा आहे. आणखी वीस वर्षेच मी जगणार आहे.