मज दुःखा चे वावडे नाही
की सु:खा ची कांक्षा नाही
अंता ची आहे जाणिव
मात्र मृत्यू चे भय नाही
काटे अनेक रुतले मनात
तरी हृदयांत वेदना नाही
जरी दुखावले मन माझे
कोणतीही कटुता नाही
जीवनाची वाट आहे कठिण
मात्र सोबत कुणी ही नाही
रात्र संपत आली तरी ही
या प्राचीस तरी सुर्य नाही
तो जरी म्हणवतो मित्र माझा
पण मज तो ओळखत नाही
फुले वेचली बकुळी ची
का त्यांना सुगंध नाही
आयुष्य चालले पुढे सरकत
दिशा मात्र का अजूनही नाही
देव्हारा हृदयाचा का रिकामा
देवा ची प्रतिष्ठा अजुन ही नाही
कोरोनामुळे सध्या घरीच आहे. अभ्यास करून कंटाळा आल्यावर असंच काहीतरी वेगळं वाचावं म्हणून रस्किन बॉन्ड वाचत होतो . एका कथेचं नाव होतं - old graveyard at sirur....( By C.A Kincaid ) सिरुर वाचून जरा उडालोच... सिरुरची कथा ते पण रस्किन बॉण्ड च्या पुस्तकात?? छे छे हे दुसरं काहीतरी असेल म्हणून पुढे वाचायला सुरुवात केली .. forty miles from POONA आणि आश्चर्य सत्यात उतरलं हे पुणे नगर रोडवरचंच शिरूर ... तर कथा होती अशी की पुण्याच्या एका इंग्रज अधिकार्याला शिरूरला असताना स्थानिक लोक एका ठिकाणी नमस्कार करून जाताना दिसले .
नाम महाधन
नाम महाधन । देवोनिया भक्ता । केले जी कृतार्था । मायबापा ।।
नाम मुखी येता । लाभे महासुख । जीवासी क्षणिक । प्रभू भेटी ।।
ह्रदी ठसावता । नाम तुज कृपे । संसार नाशिजे । पूर्णपणे ।।
नामरुप जीव । होताचि समाधी । विराली उपाधी । जीवत्वाची ।।
तुजकृपे नाम । राहो मज चित्ती । उरेचिना खंती । ऐहिकाची ।।
विश्वाला चिरूनी जातील माझे शब्दबोध
मग कल्पांतालाही कवटाळेल माझी कविता
मुक्तविहारी मी बागडेन चंद्रचांदण्यांत घेत विधात्याचा शोध
अनंत रंग उधळून चौफेर दिशांना मग उगवेल नविन सविता
घनगंभिर गुढ उलगडण्या विसरेन देहभान होऊनी धुंद
छेडत ह्रदयीच्या तारा गुंजेल मग हळूवार अनाहत छंद
―र।हुल /२६.९.१७
ज्ञानेश्वरी अध्याय १५ पुरुषोत्तम योग