ज्ञानेश्वरी अध्याय १५ पुरुषोत्तम योग
एका साधकाने ध्यान धारणा केली , अथक परिश्रम घेतले आणि आत्मा ज्ञान प्राप्त होण्याच्या बऱ्याच जवळ आला . वेगवेगळ्या सिद्धी प्राप्त होऊ लागल्या .
त्यानंतर साधकास जिज्ञासा उत्पन्न झाली कि ह्या विश्वा चे गूढ काय ? हे कुठून सुरु झालं ? कुठे संपल ?
पंच महाभूत कशी निर्माण झाली वेदांची गरज कशी निर्माण झाली ? रजोगुण तमोगुण सत्वगुण कशे निर्माण झाले ? ह्या प्रश्नामुळे साधक पुन्हा समाधिस्थ झाला . बराच काळ लोटला आणि त्याचे उत्तर त्याला मिळाले. पुन्हा जिज्ञासा काही स्वस्थ बसू देई ना . पुन्हा नवीन प्रश्न कि ह्या संसारातून तरुण जाण्या करिता किंवा अज्ञाना तुन बाहेर पडण्या करिता काय करावे ? झालं पुन्हा समाधिस्त व्हावा लागणार . पुन्हा काही काळ जाणार.
हा सर्व होणार त्रास वाचावा , साधकाने लवकरात लवकर अज्ञान दूर करावं, लवकर आत्मा ज्ञान प्राप्त करावा म्हणून पुरुषोत्तम योग आला
ह्या अध्यायात ऊर्ध्व मुखी मायेचा वृक्ष कसा निर्माण झाला , ब्रह्म म्हणजे काय, वेद कशे निर्माण झाले ,
पंचमहाभूत कशी निर्माण झाली आणि वेगवेगळ्या योनी कश्या निर्माण झाल्या ह्या चे सविस्तर वर्णन आहे . थोडक्यात सुर्ष्टी कशी निर्माण झाली ह्याच पूर्ण वर्णन आहे. हे सर्व म्हणजे अज्ञान कसं हे हि आहे. क्षर आणि अक्षर ह्यांचं भेद हि दिला आहे. जे जे प्रश्न तुम्हाला ह्या विश्वा बद्दल पडतील त्याची सर्व उत्तर दिली आहेत.
एवढा सगळं ज्ञान प्राप्त करून पुढे काय ? तर त्याचं हि उत्तर दिलं आहे. ह्या मायारूपी संसारातून बाहेर पडायचं असेल तर आत्मज्ञान प्राप्त करायला हवं आणि ते कसं हे हि सांगितलं आहे.
हा अध्याय जर सुरुवातीला असता तर कदाचित फक्त पुस्तकी ज्ञान आलं असतं. पोहण्याची कला पुस्तक वाचून जमणार नाही त्यासाठी पाण्यात उतरावं लागत. त्याच प्रमाणे सुरुवातीच्या अध्यायांमध्ये योग कसा करावा सुषम्ना नाडीतून प्रवास करत समाधी पर्यंत कसा पोहचवावं हे सविस्तर दिला आहे. एकदा समाधी सिद्ध होण्यास सुरुवात झाली कि पुढे जे रहस्यमय प्रश्न तुमचा वेळ खातील त्याची उत्तर दिली आहेत.
आपल्या सर्वांचा माझ्या पेक्षा ज्ञानेश्वरी मधला अभ्यास जास्त असेल . वरील मनोगतात काही चुकलं असल्यास षंढा चं लेखन समजून माफ करावं. माझ्या अल्पबुद्धी नुसार ज्ञानेश्वरीतील रहस्य शोधण्याचा प्रयत्न आहे.
महेश चिमणपुरे
चांगला परिचय. भारतात गेल्यावर
चांगला परिचय. भारतात गेल्यावर आध्यात्मिक पुस्तके वाचली जातात, माहेरी असतात म्हणुन. पुढच्या वेळी हे आहे का बघायला हवे.
धन्यवाद राया.
धन्यवाद राया.