‘भक्त बाळ प्रह्लादाला छळीले पित्याने, नारसिंहरूपे त्याला रक्षिलें प्रभुने…’
होळी आली की हिरण्यकश्यपू, होलिका आणि भक्त प्रह्लादाच्या कथेची आठवण होते. आजच्या युगात आजूबाजूला जेव्हा अधर्म थैमान घालत असतो तेव्हा सामान्य माणसाला प्रश्न पडतो कारण प्रत्येकासाठी प्रह्लादासारखा चमत्कार घडताना दिसत नाही. आपल्याच कर्माला दोष द्यायचा म्हटलं तरीही कुठेतरी श्रद्धा डळमळीत व्हायला लागते. मग ती खरंच श्रद्धा असते की भाबडी समजुत?
कलंदर आयुष्याने ठेवला
हातावर शब्दाएवढा दाणा
म्हटला असू दे गाठीपदरी
जगायला एखादा बहाणा
हळूवार हातांनी रुजव
पाहून सुपीक काळी माती
सावली धरेल सांजसकाळ
जेव्हा गळून पडतील नाती
ह्यात दडलीय भविष्याची हाक
उफानत्या सागराची गाज
हुरड्यात आल्यावर कणीस
फिरवून फिरवून खमंग भाज
कैकदा आडवे येतील लोभ
वधारल्यागत वाटेल भाव
तेव्हाही फुलाफळांवर भागव
घालू नकोस मुळांवर घाव
सजग सावध काटी-कुपाटी
थोडा चोरा - ढोरांचा बंदोबस्त
जरा कुठे गाफील राहिल्यास
व्हायचे उभे आयुष्य फस्त..!
चरैवेति, चरैवेति
नाहीच येथ कोणी उत्साह वाढवाया
कोणी न दे प्रशस्ति ना वाहवा कराया
चालायचीच वाट माझीच एकट्याला
चुकली जरी कधी ती कोणी न सावराया
टिकवावयास धैर्या माझाच मीच साथी
विश्वास आणि श्रद्धा हातात हात द्याया
हा मार्ग वेगळाचि नाही खुणा पथीच्या
चालून कोणी गेले ना ठेविती सहाय्या
ह्रदयात एक उर्मी फुलवोनी कोणी गेला
मार्गी दिसे कधी तो आश्वस्त मज कराया
तो भासमान आहे, सत्यात उतरलेला
ठाऊक नाही तरीही बळ देई चालण्या या
मार्गी थकून जाता नव्हताच काही थारा
खांद्यावरी हाताचा आभास फक्त वाया
आपलं बाप्पाशी असलेलं नातं वयाबरोबर बदलत जातं नाही? आपली समज वाढते तसा कदाचित अधिक समजत जातो बाप्पा आणि दिसायला लागतो त्याच्या वेगवेगळ्या रुपात. लहान्पणी तो बुद्धी देणारा बाप्पा असतो, मग मागण्या पुरवणारा देव होतो, ज्याच्याशी वाद घालता येतो असा मित्र होतो, प्रश्नांची उत्तरे असणारा सखा होतो, आपला आधार होतो, दाता होतो, त्राता होतो.
खरे तर मोठया सार्वजनिक कार्यक्रमांत ’मुख्य पाहुणे’ या नात्याने सामील होण्याचे मी सहसा टाळते. तरीही अनेकदा अनेक छोटया मोठया कार्यक्रमांमध्ये दीपप्रज्ज्वलन आणि प्रतिमा पूजन अशी कामे मला करावी लागतात. दत्तगुरू, सरस्वती, अंबाबाई, गणेश....अशा अनेक देवतांना फुलांचा हार घालणे, त्यांच्या प्रतिमांना हळद कुंकू वाहणे, त्यांची आरती करणे... या गोष्टी मी करते - मला पटत नाहीत तरी त्या क्षणी मनापासून करते.
"पहिल्यांदाच लिहिलय , कृपया समजून घ्या. माझा आणि लेखनाचा तसा संबंध कमीच.."
देव आहे कि नाही या प्रश्नावरून वाद आहे पण कदाचित ज्या शक्तीवर हे निसर्ग चक्र सुरु आहे त्या शक्तीला देव हे नाव दिले गेले असेल .माझा मुद्दा देव आहे कि नाही हा नाहीये . त्यामुळे तो विषय राहू देत .
आज ऑफिसमध्ये बसले होते आणि नेहमीप्रमाणे खुर्ची मधून उठता उठता बोलले .."अरे देवा "..जस कि आपण "अग आई ग " पण म्हणतो तसच ..
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात मानवाची मन:शांती हळूहळू हरवताना दिसते आहे. जीवन जगताना कराव्या लागणा-या अनंत कसरतींमुळे आणि आसपासच्या अशांत, असुरक्षित परिस्थितीमुळे आपले मानसिक स्वास्थ्य कमी होते आहे. अशा वेळेस मनःशांती साठी माणूस स्वतःला कोठेतरी गुंतवण्याचा प्रयत्न करतो.मग कधी एखाद्या व्यक्तीवर, कधी एखाद्या तत्वावर, कधी एखाद्याधर्मावर, कधी एखाद्या स्थानावर, आपले मन एकाग्र करण्याचा प्रयत्न व्यक्ती करते. आणि व्यक्तीपरत्वे हे श्रद्धास्थान वेगवेगळे असते. मनातली अशांतता, अस्थिरता, असुरक्षितता दूर करण्यासाठी ही श्रद्धास्थाने व्यक्ती जवळ करत असते.