दिठी
वांचुन सूर्यासवें । शिणणें होय ॥
आतां निमिषोन्मेषा दोहीं । ठेली वाट ॥
स्वतःमध्ये कायमस्वरूपी वस्ती करून असलेली भिती आणि दहशत संपवायची असेल तर एकच मार्ग आहे, आणि तो म्हणजे ती भिती आणि दहशत कुठचाही मुलाहिजा न ठेवता दुसर्यांना दाखवणे- हे 'रामन राघव' मधल्या 'रामन'ने मांडून दाखवलं, तेव्हा अंगावर काटा आला. नंतर विचार केल्यावर लक्षात आलं- हे असंच असतं हे आपल्याला आधीच माहिती आहे. फारतर त्याच्या अनेक व्यत्यासांच्या आणि उपप्रमेयांच्या स्वरूपात माहिती होतं.
मायबोलीवर येऊन १३-१५ वर्शं झाली तरी माझा एकच आयडी कायम होता तो म्हणजे बस्के. लोकं ड्युआय का काढतात ह्याचे नवल मात्र कायम वाटायचे. एक म्हणजे गरज काय, अन दुसरे म्हणजे हे सर्व मॅनेज करणे किती अवघड जात असेल?
दोन्ही प्रश्नांची उत्तरं मला मिळाली यथावकाश. मला ड्यु आय घेऊन का होईना पण व्यक्त होण्याची गरज पडली. आणि ते सर्व, दोन दोन आयडेंटिट्या मॅनेज करणे किती अवघड जाते हे ही समजले.
कर्हाडला सकाळी श्रीनिवास विनायक कुलकर्ण्यांकडे पोहोचलो तेव्हा दहा वाजून गेले होते. ब्रेकफास्टसाठी मंडळी आमच्यासाठी थांबली होती. स्वागत अत्यंत साध्या पद्धतीनं, पण खूप मनापासून केलेलं. ब्रेकफास्टला त्यांच्या पत्नीनं, ललिताकाकूंनी केलेला कणसाचा उपमा खूपच चवदार होता. त्या पाककृतीला त्यांनी एक आत्मीयतेचं बोट लावलं होतं, ज्यामुळे तो अजूनच आत कुठेतरी सुख निर्माण करत होता. आमचं छान जमणार आहे, याची खूण मला ब्रेकफास्टच्या टेबलावरच पटली. मला चटण्या-लोणच्यांमध्ये खूप रस आहे कळल्यावर श्री.
'देवा मला पास कर.. अरे मूर्खा अभ्यास कर!'
असे वाक्य वहीवर लिहिले की परीक्षेत पेपर सोप्पा जातो, पेपराच्या प्रत्येक पानावर डोक्यावर लिहिले की चांगले मार्क मिळतात अशी एक युक्ती मला शाळेत सोडायलाआणायला येणार्या पुष्पाने जाताना सांगितली. माझे वय ७ आणि तिचे वय १५. तिने नववीत नापास झाल्यावर शाळा सोडली होती. एवढी पावरबाज युक्ती माहिती असून तू नापास कशी झालीस? हे विचारण्याइतकी अक्कल मला वय वर्ष सातमधे नव्हती. भारीच वाटली होती ती युक्ती.
श्री. चेतन दातार यांच्या मृत्यूनंतर २००९ साली लिहिलेला हा लेख -
अंधा-र्या हायवे वर ऊजळणा-र्या ,आपलं माणुस दाखवणार्या पायवाटा......
वेगवेगळ्या आकारच्या गाड्या आणि त्यांचे चालक ... त्यातली विविध पार्श्वभुमीची माणसं. प्रत्येकाचे वेगळे विश्व वेगळ्या विवंचना, आणि सतत कशासाठी तरी पळायचा हव्यास.... ब्रेक लागतो तो ट्राफिक चा ..... मग अंधार, गैरसोयी ,गैरसमज, आणि प्रसंगिक अड्चणीतही माणसं आधी स्वता:ला कम्फ़र्टेबल करायला सुरवात करतात आणि हे करत असतानाच चढवलेले मुखवटे मोकळे होत जातात आणि तयार होतो या सगळ्या कोत्या आणि कोषातल्या वाटांचा मोकळा कोलाज हायवे ....