कोकण
साकव
साकव
पाणी म्हणजे साक्षात् जीवन … म्हणून मानवी वस्ती अगदी पूर्वीपासून नदीच्या, ओढ्याच्या काठावर वसली, तिथेच संस्कृती फुलली. सिंधू काठी बहरलेली मोहंजदरो आणि हडप्पा संस्कृती, नाईल नदीच्या सान्निध्यात विकसित झालेली इजिप्शियन संस्कृती, गंगा तीरावर वसलेलं आपला अभिमान आणि श्रद्धास्थान असलेलं वाराणशी शहर ही त्याची काही प्रसिद्ध उदाहरणं.
होम स्टे/ बजेट हॉटेल्स आणि रेस्टोरंट सुचवा
नमस्कार मायबोलीकर..
येत्या 2 महिन्यात पुणे ते गोवा आणि परत असा प्लॅन आहे. 8 ते 10 दिवसांचा विचार आहे. आम्ही 2 जोड्या स्वतः च्या गाडीने प्रवास करणार आहोत. खालील ठिकाणी/ जवळपास होमस्ते, हॉटेल आणि रेस्तरांत सुचवा.
पहिला मुक्काम: हरिहरेश्वर/श्रीवरधन/ बागमंडला भाग
दुसरा: बागकर हाऊस MTDC मुरुड हर्णे जवळ ठरतंय, उपलब्ध नसल्यास इतर option असावेत.
तिसरा: गणेशगुळे
चौथा: धामापूर/ मालवण तारकर्ली
पाचवा: गोव्यात कुठेही चालेल (दोन दिवसासाठी)
सहावा: कोल्हापूर
सातवा: महाबळेश्वर
कोकणचा विकास की विनाश? रिफायनरी येतेय...
मला ईथे माझे मत व्यक्त करावेसे वाटत नाहीये. कारण त्याने येणाऱ्या प्रतिसादांवर फरक पडू शकतो.
तरी आता ज्याचे त्याने ठरवायचे आहे की तुम्हाला हे दोन मार्ग दाखवले तर तुम्ही कुठे जाल?
दोन्ही मार्ग कोकणात जातात.
एक निसर्गसौंदर्याने नटलेला मार्ग त्याच जुनाट कोकणात नेईल.
तर दुसरा रिफायनरीच्या प्रदूषणाने बरबटलेला मार्ग औद्योगिक कात टाकलेल्या आधुनिक कोकणात नेईल.
कि तुमच्याकडे कुठला तिसरा मार्ग आहे?
स्मरणरंजन : पिरसा
पाऊस सुरू झाला की मन आपोआप भूतकाळात जातं. सहावीत आम्ही चोरवणे मराठी शाळेतून नाणीज हायस्कुल ला गेलेलो. सकाळी साडेनऊ वाजता घरातून निघून दहापर्यंत शाळेत पोहोचायचो... पण ओलेचिंब होऊन... रेनकोट, छत्री जे काही असायचं ते जून जुलै मधल्या कोकणातल्या मुसळधार पावसापुढे कधीच धाराशायी ठरायचं...
दिंडा भाजीबद्दल माहिती हवी आहे
दिंडा भाजीबद्दल माहिती हवी आहे.
(विनिता.झक्कास यांनी विचारलेला मूळ प्रश्न . त्यांचे काम झाले आहे. पण भविष्यात इतर कुणाला उपयोगी ठरेल म्हणून पुन्हा लिहितो आहे. -वेबमास्तर)
माझा गाव
शेण मातीने पोतले खळे माझ्या अंगणात
आंबा पोफळीची बने उभी माझ्या परसात
एका लयीत डोलती वार्यासंगे उंच माड
त्यात दिमाखाने उभे फणसाचे मोठे झाड
आहे चवही अवीट त्या आंबा-फणसांची
दारी फुलबाग फुले जाई जुई अबोलीची
लाल मातीतील वाट नागमोडी चालताना
पायी गारवाच मिळे जसा मेंदी लावताना
येई गोड दरवळ फळ फुल मोहोराचा
जणू अत्तर सांडतो भात आंबेमोहोराचा
माड बनाच्या पल्याड सागराची गाज येई
सूर्योदयी गजराने त्याच्या आम्हा जाग येई
त्याचा सूर्यास्त ही मोठा असे सुंदर देखणा
दमल्या सूर्यास कवेत जणू पाजतसे पान्हा
कोकणची खासियत ...वेस्वार
एखाद्या प्रदेशाचे भौगोलिक स्थान, तिथले हवामान, उपलब्ध असणारी साधन सामुग्री, तिथे पिकणारी अन्नधान्ये अशा अनेक गोष्टीनुरूप तिथली खाद्य संस्कृती फुलत असते, प्रांतीय वैशिष्ट्य जपत असते. जागतिकीकरणाच्या प्रचंड रेट्यात ही प्रांतीयता हरवत चालली आहे ह्याच कधी दुःख वाटत तर कधी हे अटळ आहे, हे होणारच असा विचार करून मनाची समजूत घातली जाते. कोकणात महिना महिना भातावर राहणाऱ्या आमचं ही हल्ली पोळी शिवाय पान हलत नाही ही वस्तुस्थिती आहे. तिन्ही त्रिकाळ पोळ्या लागतातच. अगदी नाग पंचमी ला ही खांडवी बरोबर पोळ्या केल्या जातातच.
वाडा - लघू भयकथा
कोकण : सहज साध्य नंदनवन २
घाट उतरून मुंबई गोवा रस्त्याला लागलं कि कोकण आपले रूप दाखवू लागतं. गर्द हिरवाइतून वळणे घेत जाणारा रस्ता , मधूनच डावीकडे आणि उजवीकडे दिसणार्या डोंगर आणि दर्या.. आणि रंग फक्त दोनच. धरित्रीचा हिरवा आणि आकाषाचा निळा.. आणि हो.. मातीचा तांबडा. निसर्ग मनुष्यावर इतका खूष आहे इथला कि , तुम्ही कॅमेरा कसाही कुठेही धरून क्लिक करा , येणारा फोटो कुठल्याही स्पर्धेत सहज इतर फोटोंना मागे टाकेल.
Pages
