भटकंती

अयोध्या-काशी यात्रा!

Submitted by अमरेंद्र बाहुबली on 22 April, 2025 - 07:07

काही कामानिमित्त मला उत्तर प्रदेशातील गोरखपूरला जावे लागले. काम आटोपून १ दिवस होता म्हणून जवळच १३४ किमीवरील अयोध्येतही जाऊन यावे असा विचार केला. गोरखपूरहून बस पकडून अयोध्येत पोहोचलो. राममंदिराबद्दल आस्था होती आणि बाबरी कांडाबद्दल बरेच काही ऐकून असल्याने उत्सुकता होतीच.

अयोध्येत पोहोचल्यावर राममंदिराच्या दिशेने जाणारा “रामपथ” पाहिला – अतिशय छान बनवलाय, वॉकिंग ट्रॅकसह! घरांचे अतिक्रमण तोडल्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. रस्ता मोठा केल्याचे आवडले. त्यामुळे रहदारीला व परिसराला शोभा आली. २ बॅटरी ऑपरेटेड गाड्या बदलत, कुणाला १० तर कुणाला २० रुपये देत शेवटी मंदिराजवळ पोहोचलो.

विषय: 

कुठल्या Travel कंपनी चांगल्या आहेत ?

Submitted by अबोल on 18 April, 2025 - 05:23

कुठल्या Travelling कंपनी चांगल्या आहेत mumbai pune madhye ? तुम्ही कधी प्रवास केला असेल काही चन्गला वाईट अनुभव आहे asel tar ethe share करा... चांगल्या सोयी करत्तात .

शब्दखुणा: 

रंगाढंगाचा देश भाग~ 2

Submitted by अविनाश कोल्हे on 14 April, 2025 - 01:36

रंगाढंगाचा देश आयर्लंड — भाग 2

आता पुढील स्वप्न - आयरिश भूमी!

डब्लिन ते कॉर्क – "धडाकेबाज" स्वागताने सुरुवात!
आयरिश भूमीवरील पहिले पाऊल

परदेशात पहिल्यांदाच उतरलो होतो, आणि तोही थेट युरोपमध्ये—आयर्लंडमध्ये! विमानाच्या खिडकीतून बघितलेले डब्लिन शहर विमानतळावर उतरण्यापूर्वीच मनाला धरून बसले होते. विमान जसे उतरायला लागले, तशी आकाशातून खाली दिसणारी हिरवाईची चादर अधिकच जवळ येऊ लागली. हिरवेगार कुरणे, त्यांना विभागणारे दगडी कुंपण, एक पातळ रेषेसारखी वाहणारी नदी आणि दूरवरचा निळसर समुद्र – सगळंच अतिशय सुरेख होतं.

शब्दखुणा: 

रंगाढंगाचा देश. भाग 1

Submitted by अविनाश कोल्हे on 13 April, 2025 - 01:29
प्रवास वर्णन

माझी पहिली विदेशवाट

लेखक: अविनाश अरुण कोल्हे.

पहिल्यांदाच विदेशात जात होतो, तेही थेट युरोपमध्ये – आयर्लंडला! कल्पनेतही कधी पाहिलं नव्हतं असं हिरवंगार आयर्लंड माझ्या प्रवासाची वाट पाहत होतं. प्रवास जरी मुंबईतून सुरू होत असला, तरी तो प्रत्यक्षात मनात मात्र काही महिन्यांपूर्वीच सुरू झाला होता. नकाशावर बोटं फिरवता फिरवता, इंटरनेटवर आयर्लंडचे फोटो पाहता पाहता, त्या हिरव्यागार देशाची स्वप्नं रोज डोळ्यांत रंगत होती.

शब्दखुणा: 

टायगर जिंदा है।

Submitted by सदा_भाऊ on 8 April, 2025 - 09:15

लेखाचा विषय आपल्या लक्षात आलाच असेल. अर्थातच आपला राष्ट्रीय प्राणी “वाघ”. आता या महान प्राण्यावर मी पामर काय लिहणार? तरीपण हा एक क्षुद्र प्रयत्न!

विषय: 
शब्दखुणा: 

BMC - बेसिक मौटेनीरिंग कोर्स

Submitted by अजित केतकर on 4 March, 2025 - 10:34

BMC अर्थात "बेसिक मौटेनीरिंग कोर्स"

"मी BMC केला.. तू पण कर आवडेल तुला". बहिणीने मला किल्ली मारली. आजपर्यंत BMC म्हणजे बॉम्बे म्यू. कॉर्पो. हेच माहिती होते. पण हे BMC म्हणजे 'बेसिक मौटेनीरिंग कोर्स'. बहिणीने इतर जुजबी माहिती दिली आणि 'चांगली तयारी करून जा' असा इशारा वजा सल्ला दिला.

विषय: 
शब्दखुणा: 

मभागौदि २०२५ - निसर्गायण - निसर्ग जेव्हा गंमत दाखवतो.. - adm

Submitted by Adm on 3 March, 2025 - 17:27

२०२४चं वर्ष आमच्यासाठी भटकंतीच्या दृष्टीने फार चांगलं गेलं. नवीन देश पाहिले, नवीन शहरं पाहिली, काही आधी पाहिलेली शहरं, ठिकाणं, पुन्हा पाहिली, नवे अनुभव घेतले. घरची मंडळी, मित्र मैत्रिणी, नातेवाईक ह्यांच्याबरोबर भटकंती केली. आणि ह्या भटकंतीदरम्यान निसर्गाने काहीश्या अनपेक्षितपणे भरपूर गमती-जमती दाखवल्या.

शब्दखुणा: 

नेपाळ : एक जीवंत सांस्कृतिक संग्रहालय - भाग ३ (जनकपुर)

Submitted by संजय भावे on 20 February, 2025 - 01:27

भयाणक : अंधारा राजवाडा ( एक भीतीदायक भ्हयकथा)

Submitted by दाजीबा on 18 January, 2025 - 03:56

ती बग्गी एकटीच चालली होती. एकटीच होती ती बग्गी.
कुणी त्या दृश्याचे चित्र काढलं तर त्या चित्रात बग्गीच्या आजूबाजूला भयानक जंगल होतं ते एकाच जागी होतं. चित्रात फक्त बग्गी हलत होती.
त्या भयानक जंगलाच्या आजूबाजूला, आत , वर खाली भयानक अंधार होता. कारण ती एक भयानक रात्र होती.
रातकिड्यांचा आवाज भयानक होता. वारा सु सु करत होता त्यामुळे अजूनच भयानक भीती वाटत होती.
चांदण्यांचा प्रकाश ढगांमुळे अंधुक झाला होता. त्यामुळं भयानकतेत भरच पडली होती. त्या संघीप्रकाशात झाडांच्या आक्रुत्या भयानक दिसत होत्या.
बग्गीवान सराईत असला तरी त्यालाही तो भयानक रस्ता दिसत नव्हता.

विषय: 
शब्दखुणा: 

रॉय २ - सेरो तोरे

Submitted by किल्लेदार on 9 January, 2025 - 23:22

रॉय १

प्रसिद्ध ब्रिटिश गिर्यारोहक जॉर्ज मेलरीला एकदा एका पत्रकाराने प्रश्न केला, "व्हाय क्लाइंब माऊंट एव्हरेस्ट ?” त्यावर तो चटकन् उत्तरला, "बिकॉज इट इज देअर!” त्याच ढंगात जर मला विचारलं की का रे बाबा अर्जेंटिनाला का जावं तर मीही लगेच म्हणेन “तिथे रॉय आहे म्हणून!” अर्थात कुणी पत्रकार असं मला विचारणार नाही आणि काही वदलो तर ते प्रसिद्धीही पावणार नाही. पण अर्जेंटिनाच्या इतक्या कोपऱ्यात रॉयच मला ओढून घेऊन गेला होता एवढं मात्र खरं.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - भटकंती