मराठी भाषा गौरव दिन २०२३ - खेळ - म्हणींच्या भेंड्या
Submitted by संयोजक-मभागौदि-2023 on 27 February, 2023 - 03:16
"गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बारा होता."
"नाचता येईना अंगण वाकडे."
"गाढवाला गुळाची चव काय?"
ही आणि अशी ठसकेदार वाक्ये आपण लहानपणापासून ऐकत आलेलो असतो, कधी आजी-आजोबांकडून, तर कधी आई-बाबांकडून. मग शाळेत चौथी पाचवीला मराठी व्याकरण शिकताना कळते की ह्यांना "म्हणी" म्हणतात.
विषय:
शब्दखुणा: