भटकंती
पुन्हा एकदा हिमालय - देवरियाताल चंद्रशीला - बनियाकुंड (४)
पुन्हा एकदा हिमालय - देवरियाताल चंद्रशीला - स्यालमी(३)
गंगोत्री-गौमुख-तपोवन, केदारनाथ, बद्रीनाथ
गंगेचे दर्शन गंगोत्रीला या आधी घेतले होते. गंगा आरतीचा सोहळाही गंगोत्री, हरिद्वार, वाराणसी या ठिकाणी पहिला होता. पण करोडो लोकांचे जीवन समृद्ध करणाऱ्या या गंगेचा प्रत्यक्ष उगम पाहण्याची इच्छा मात्र अजूनही अपूर्ण होती. तसेच तिथेच पुढे असलेली तपोभूमी अर्थात तपोवन इथेही जाण्याची तीव्र इच्छा मनात होती. प्रामुख्याने या दोन ठिकाणी जायचा बेत लॉक डाऊन मधे आणि नंतरही आखून फसला होता. पुनः एकदा मे - जून २४ मधे जायचे ठरवले आणि ग्रुपची जमवाजमव चालू झाली. भाऊ राजेश, शाळासोबती दोन विवेक, मित्र रवी आणि सनील असा सहा जणांचा चमू ठरला. पैकी सनील सगळ्यात तरुण म्हणजे ४१ वर्षांचा बाकी आम्ही सगळे ५२-५३ वर्षांचे.
पुन्हा एकदा हिमालय - देवरियाताल चंद्रशीला - देवरियाताल (२)
प्रवासाची प्रत्येक दिवसानुसार itinerary/योजना /माहिती
आपल्या सर्वानाच जेव्हा प्रवास करायचा असतो तेव्हा शोधाशोध करण्यात फार वेळ जातो. बरेचदा आपण जिथे सगळं जग जातं तिथे जातो तरीही हे काम टाळता येत नाही. त्यामुळे रोज काय करायचे याची मुलभुत माहिती मिळाली तर जरा काम कमी होते व त्यात सोयीनुसार बदल करता येतात.
त्यामुळे या धाग्यात तुमच्या प्रवासाची itinerary लिहावी. यात रोज काय पाहिले याचबरोबर कुठुन बुकिन्ग केले, कुठे राहिलात, काय केलेले योग्य झाले किंवा अयोग्य झाले (+/-) अशा गोष्टीपण लिहिले तर उत्तम.
पुन्हा एकदा हिमालय - देवरियाताल चंद्रशीला - सुरुवात (१)
असं म्हणतात की एकदा हिमालय बघितला की त्याची ओढ लागते. मी पिंढारी ट्रेक केला, त्यानंतर दर वर्षी एक ट्रेक करु असं मी आणि नवर्याने ठरवलं खरं पण व्यायामादरम्यान पुन्हा एकदा पाय ट्विस्ट झाला आणि आधीची दुखावलेली लिगामेंट आणखी दुखावली. मग थोडे दिवसांत निर्णय घेऊन मे २०२३ मधे सर्जरी केली. ४-५ महिन्यांत पूर्ण रिकवर झाले. पुढच्या ३-४ महिन्यांत विचार करुन 'देवरियाताल चंद्रशीला' हा निसर्गरम्म, मॉडरेट लेवलचा ट्रेक ठरला. खरं तर चंद्रशीला हा हिमालयन ट्रेक्स मधला इतका कॉमन ट्रेक आहे, की मी त्यावर लिहिलेलं एकही वाक्य नविन नसेल.
देवराई आर्ट व्हिलेज - पाचगणी
होम स्टे/ बजेट हॉटेल्स आणि रेस्टोरंट सुचवा
नमस्कार मायबोलीकर..
येत्या 2 महिन्यात पुणे ते गोवा आणि परत असा प्लॅन आहे. 8 ते 10 दिवसांचा विचार आहे. आम्ही 2 जोड्या स्वतः च्या गाडीने प्रवास करणार आहोत. खालील ठिकाणी/ जवळपास होमस्ते, हॉटेल आणि रेस्तरांत सुचवा.
पहिला मुक्काम: हरिहरेश्वर/श्रीवरधन/ बागमंडला भाग
दुसरा: बागकर हाऊस MTDC मुरुड हर्णे जवळ ठरतंय, उपलब्ध नसल्यास इतर option असावेत.
तिसरा: गणेशगुळे
चौथा: धामापूर/ मालवण तारकर्ली
पाचवा: गोव्यात कुठेही चालेल (दोन दिवसासाठी)
सहावा: कोल्हापूर
सातवा: महाबळेश्वर
माझी नर्मदा परिक्रमा : शूलपाणी ची झाडी
माझी नर्मदा परिक्रमा डॉट ब्लॉगस्पॉट डॉट कॉम या संकेतस्थळावरील लेखांक ८२ मधील लेखनाचा संपादित सारांश