भटकंती

चांदणचुरा

Submitted by Revati1980 on 16 August, 2023 - 09:58

आमच्या घराचा मालक शेतकरी होता. आम्ही भाडेकरू. पोनाप्पा असे मालकाचे नाव होते. त्याची बायको स्मिथा. तिला आम्ही मितवा म्हणायचो कारण आम्हाला स्मिथाव्वा असा उच्चार करायला जड जायचं. मितवाला एक मुलगी होती छाया नावाची आणि मुलाचे नाव रोहन. त्याकाळचे त्यांचे घर म्हणजे फार्म हाऊस. प्रचंड मोठे शेत होते. गुरेढोरे, बकऱ्या, दोन कुत्री, एक मांजर असा त्याचा मोठा परिवार होता. दोन गायी होत्या त्यांची नावे लक्ष्मी आणि इंद्राक्षी. " भाग्यद लक्ष्मी बारम्मा, भाग्यद इंदी बारम्मा ", असं म्हणत मितवा त्यांना चारा भरवायची.

भारत का दिल देखो (प्रवास वर्णन) : बस्तर : भाग १० : बस्तर आर्ट व रायपूर (अंतिम)

Submitted by मनिम्याऊ on 12 August, 2023 - 08:03

Tour du Mont Blanc भाग १० - सातवा दिवस आणि अखेर

Submitted by वाट्टेल ते on 10 August, 2023 - 09:46

आज finale त्यामुळे फ्रेडलाच प्रचंड घाई होती. रोज आम्हाला वारंवार ब्रेक देणाऱ्या त्याने आज जराही विश्रांती न देता घोड्यावर बसवले. ७:३० ७:४० ला वगैरेच निघालो. आधी बराचसा चढ आणि त्यात आम्ही निवडलेला रस्ता म्हणजे अक्षरश: गायींची सकाळची किंवा एकूणच दिवसभरात कधीही आन्हिके करण्याची जागा होती. कालच्या चीज फॅक्टरीला टेकाडावरून ज्या गायी उतरत होत्या, त्याच्या मागच्या बाजूला हा रस्ता असावा असे वाटते. दगड माती बर्फ पाणी गवत फुले सिमेंट डांबर लाकूड लोखंड एवढ्या सगळ्या गोष्टींवरून ७ दिवस चाललो होतो. आज शेणावरून चालणे झाले, काही राहिले म्हणून नाही.

शब्दखुणा: 

भारत का दिल देखो (प्रवास वर्णन) : बस्तर : भाग ९ : शुभ्र काही देखणे...

Submitted by मनिम्याऊ on 10 August, 2023 - 05:13

Tour du Mont Blanc भाग ९ - सहावा दिवस

Submitted by वाट्टेल ते on 9 August, 2023 - 13:25

Courmayeur मधून सकाळी खचाखच भरलेल्या बस मधून प्रवास करून जिथून पुढे ट्रेक चालू करणार होतो तिथं पोहोचलो. आता तास २ तासात फ्रान्सच्या दिशेने कूच करणार होतो. बसमध्ये जागा मिळाली, शेजारी एक म्हातारा होता, सॅन दिएगो मधला पण मूळचा ऑस्ट्रियन. तो असाच कुठे कुठे फिरलेला. एकेकटे फिरणारे असे बरेच भेटले, त्यांची कमाल वाटते. एकेकटे असते तरी ( किंवा म्हणूनच) कोणीही भेटला तरी गप्पा मारायला उत्सुक असतात. आपल्यालाही नवीन गोष्टी कळत जातात.

शब्दखुणा: 

Tour du Mont Blanc भाग ८ - पाचवा दिवस

Submitted by वाट्टेल ते on 8 August, 2023 - 18:12

आज प्रथमच खोलीच्या खिडकीतून सूर्योदय पाहिला. सकाळी निघता निघता सईद आणि माझा जरासा प्रेमळ संवाद झाला. दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण या दोन्हीला जेवण असाच शब्द आहे, या एका गोष्टीवरून त्याने हिंदी, संस्कृत, मराठी वगैरे भाषा किती अपुऱ्या वगैरे आहेत अशी टिप्पणी चालू केली. त्याच्या अरेबिकमध्ये किंवा रशियनमध्ये म्हणे यालसाठी २ वेगळे शब्द आहेत. या एका गोष्टीवरून भाषा समृद्ध आहे अथवा नाही वगैरे ठरवणे अगदीच बालिश आहे वगैरे माझे युक्तिवाद सुरु झाले. शेवटी संपूर्ण दिवसासाठी energy लागणार ती इथे दवडू नये म्हणून त्याला तुझेच अगदी बरोबर आहे आहे वगैरे सांगितले.

शब्दखुणा: 

Tour du Mont Blanc भाग ७ - चौथा दिवस

Submitted by वाट्टेल ते on 8 August, 2023 - 14:03

ब्रेकफास्ट जवळजवळ सगळीकडेच अंडी, toast, वेगवेगळ्या जेली, croissant, coffee , फळे , cereal असा भरपूर असायचा. Cereal बरोबर दुधाऐवजी दही असायचे. आज आमचे स्विसमध्येच दक्षिणेला La Fouly कडे प्रस्थान होते. लॉजच्या इथून खाली उतरत होतो तेव्हा बाजूला पाटाच्या बाजूने चालत होतो. शेतीसाठी बहुदा चांगले लाकडी लहान मोठे पाट सुबक बांधलेले. त्यातले खळाळते स्वच्छ थंड पाणी, त्याचा आवाज. त्याला पूरक म्हणून पुन्हा लता सुरु केली. मध्ये मध्ये किशोर-रफी पण. हे लोकही माझ्याबरोबर या पृथ्वीवरच्या स्वर्गात आलेत ही भावना होती.
काही वेळातच Champex Lake लागला.

शब्दखुणा: 

भारत का दिल देखो (प्रवास वर्णन) : बस्तर : भाग ८: चौक - चौराहों का शहर - जगदलपूर

Submitted by मनिम्याऊ on 8 August, 2023 - 05:09

भाग ७ : ढोलकल, दंतेवाडा
दुसऱ्या दिवशी दि. २८-१२-२०२२ रोजी सकाळीच ७ वाजता तयार होऊन रूम बाहेर पडलो. हवा एकदम स्वच्छ होती. कोवळे ऊन अंगावर घेत थोडावेळ रिसॉर्टच्या आवारात हिंडत फिरत वेळ घालवला. थोडी फोटोग्राफी केली. तिघी जेष्ठ महिला गवतावर निवांत बसून गप्पांचा आस्वाद घेत होत्या तर मी आणि लेकीने झाडाला टांगलेल्या झुल्यावर बसून झोके घेतले. भोजनगृहात जाऊन नाश्ता आटोपला. ठरल्यावेळेवर किरणभैया हजर झाले.

शब्दखुणा: 

Tour du Mont Blanc भाग ६ - तिसरा दिवस

Submitted by वाट्टेल ते on 7 August, 2023 - 22:12

सकाळी ८ ला निघालो. सकाळी ascent होता, तसे असले की बरे असते. दुसऱ्या group मधले आगे मागे असायचे ते मेंबर आज दिसले नाहीत, तर कालच्या शिणवट्यामुळे आज बरेचसे अंतर ते बसने कापणार आहेत असे कळले. मग आम्ही आपापली पाठ थोपटली. वारंवार चढत गेलो तशी राहिलो ती बिल्डिंग,रस्ते, खालची valley दिसायला लागली. इतक्या खालून गायीच्या घंटांचे निनाद ऐकू येत होते. मग फ्रेड सर्वांत जास्त दूध देणाऱ्या गाईला राणीसारखा मुकुट, रांगेत पहिला मान, गावागावांतील गाईंच्या लढतीच्या प्रथा, त्यात होणारे अपघात वगैरेबद्दल सांगत होता. कसे कोण जाणे Animal Welfare वाले तिथे पोहोचले नसावेत.

शब्दखुणा: 

Tour du Mont Blanc भाग ५ - दुसरा दिवस

Submitted by वाट्टेल ते on 6 August, 2023 - 14:44

फळे, कॉफी, cereals - भक्कम ब्रेकफास्ट करून ८च्या सुमारास निघालो. सकाळी steep uphill होता, थोडे switchbacks होते. Mount Whitney ला पहाटे ३:३० ते ६ असे एकूण १०० Switchbacks जे एकदाचे पायाने घडले त्यानंतर मी switchbacks साठी (मानसिकदृष्ट्या) कूल असते. आणि आज ठरवून गाणी ऐकत चाल सुरु केली. आज (आणि नेहमीच ) मूड लता. कुछ दिलने कहा, आजा रे परदेसी, पाकिजा आणि काय काय ! इस मोडसे जाते है च्या सुरुवातीचा आलाप, किंवा यार सिली सिली ऐकताना डोंगर हवाच. चढ कधी संपला ते कळलेही नाही. डोंगर चढताना गाणे ऐकू नये, आवाजावर लक्ष हवे असा फ्रेडचा सल्ला होता. पण मी ऐकत असलेले गाणे loud orchestra, music नव्हतेच.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - भटकंती