आमची अमेरिका वारी….. भाग 1 - सीएटल
आमची अमेरिका वारी…..
(प्रशांत मठकर)
भाग 1- सीएटल
आमची अमेरिका वारी…..
(प्रशांत मठकर)
भाग 1- सीएटल
श्रीनगर ते सोहनेवाल अंतर ४९७ किमी
आजची सकाळ जरा जास्तच आल्हाददायक होती, एक तर लेह लडाख च स्वप्न पूर्ण झालं होतं आणि ते पण मनाली श्रीनगर पूर्ण सर्किट. समीर आणि मी तयार झालो तो पर्यंत बाकी दोघे अजून साखर झोपेत होते. त्यांना पटकन आवरायला सांगून आम्ही गाडी बाहेर घेवून थोडी साफ केली.
लेह ते श्रीनगर ? अंतर ४१८ किमी
दोन दिवस गाडी ला आराम होता, त्यामुळे आज सकाळी सकाळी पहिले उठून गाडी चालू केली. थोडी साफ केली आणि सामान लावून साधारण आठ वाजता लेह वरून निघालो. माझं गाडी घेवुन लेह लडाख येण्याचं स्वप्न पूर्ण झालं होतं, नी आता आम्हाला सुरक्षितपणे घरी जायचं होतं. हिमाचल प्रदेश आणि जम्मू मध्ये वातावरण खुप खराब आहे हे समजलं होत मात्र लडाख मध्ये वातावरण खुप छान होतं. लेह मधून निघताना हुर हूर वाटत होती पण हा क्षण येणार होताच... असो

लेह ते हुंडर दिनांक १९-०८-२०२२ अंतर १३० किमी
आज पहाटे लवकर जाग आली होती, मग एकमेकांना त्रास देत मस्ती करत तयार झालो. आज कोणालाही कसला त्रास जाणवत नव्हता त्यामुळे मस्ती जास्त चालू होती. साधारण नऊ पर्यंत ड्रायव्हर आणि गाडी दोघे हजर झाले. त्यांनी सांगितलं की, पाणी इकडेच जास्त विकत घेऊन ठेवा पुढे महाग मिळेल. आज आम्ही खरदूंग ला चढनार होतो. समुद्र सपाटी पासून साधारण १७५०० फूट उंचीवर आहे. तिकडे श्वास घेण्यासाठी त्रास होतो तर कमी वेळ थांबा म्हणजे त्रास होत नाही.

लेह दर्शन

आज सकाळी निवांतपणे उठलो कारण आज आम्ही लेह मध्ये फिरणार होतो त्यामुळे काहीही घाई नव्हती. सकाळ पासून समीर ला पण थोड ठीक वाटत होत. आम्ही साधारण नऊ पर्यंत आवरून बाहेर निघालो. पहिले जावून नवीन टायर घेतला आणि एका ठिकाणी गाडी पण धुवायला लावून दिली. लेह मध्ये आज खुप गरम वातावरण होत.
आज आमचा पूर्ण दिवस लेह शहर आणि तेथील प्रसिद्ध जागा पाहण्यासाठी ठेवला होता.

खरंतर आज आमचा दिवस रात्री बारा वाजता सुरू झाला होता. समीर ला तर पाणी पण पिण्याची इच्छा नव्हती. गणेश ला पण झोप येत नव्हती आणि मला पण. आम्ही फक्त घड्याळ कडे पाहत होतो. साधारण पहाटे चार वाजता गणेश बोलला, की बाहेर जावून एकदा गाडी चालु करून बघ बोललो टाईम तर बघ बाबा चार वाजले आहेत थांब जरा. मग पाच वाजता मी बाहेर येवुन गाडी चालु केली एक मिनिट वेळ घेतला पण चालू झाली नि थोड्या वेळातच हळू हळू उजाडायला सुरू झालं. मग लगेच यांना गाडी मध्ये बसवून आम्ही लेह कडे निघालो. सरचू पासून रस्ता छान आहे आणि आता तर आम्हाला उतार सुरू झाला होता. सरचु नंतर आज आम्हाला पहिलं मोठं आव्हान होतं ते गाटा लूप...