तीन वर्षांपूर्वी, जानेवारी २०२० मध्ये केलेल्या छोट्याशा सहलीचं हे वर्णन. बंगळूरच्या महाराष्ट्र मंडळाच्या अंकात देण्यासाठी हा लेख मुळात तेव्हा लिहिला होता. थोडेफार बदल करून आता इथे आणत आहे.
हवेत सुखद गारवा होता. सूर्योदयाची वेळ. धुक्याने वेढलेली कावेरी नदी संथ वाहत होती. नावाड्याच्या होडी वल्हवण्याचा हलकासा आवाज सोडला तर दुसरा कुठलाच मानवनिर्मित आवाज कानांवर पडत नव्हता. या शांत वातावरणात थोडेफार आवाज येत होते ते पक्ष्यांचे. त्यांची मात्र चांगलीच लगबग सुरू झालेली होती. एक राखी बगळा काठावर उभा राहून आपली लांब लवचिक मान पार पाण्यापर्यंत वाकवून मासा पकडण्याच्या प्रयत्नात होता, तर तिकडे खडकावर कुणी उभं रहायचं, यावरून दोन-तीन छोटे बगळे एकमेकांशी भांडत होते. पलीकडे मुग्धबलाकांची एक जोडी प्रणयक्रीडेत रमलेली होती. तोंडात काटकी घेऊन एखादा पेलिकन घरट्यासाठी जमवाजमव करत होता. आपलं अस्तित्व शक्यतो उघड न करता एक मगर संथपणे पाणी कापीत चालली होती.
रंगनथिट्टू पक्षी अभयारण्यात येण्याची माझी काही ही पहिलीच वेळ नव्हती, पण पहाटेच्या वेळी झालेलं असं निसर्गदर्शन मात्र माझ्यासाठी अनोखं होतं. आधीच्या दोन-तीन भेटींमध्ये डोक्यावर ऊन आणि आजूबाजूला पर्यटकांची गर्दी असतानाही रंगनथिट्टूने मन मोहून टाकलं होतं. करोनाचं संकट येण्यापूर्वीच्या जानेवारी महिन्यात सुखद थंडीत, आजूबाजूला काहीच गर्दी नसताना केलेली ही नौकासहल तर अविस्मरणीयच ठरली.
बंगळूरहून म्हैसूरला जाताना म्हैसूरच्या थोडं अलीकडे, श्रीरंगपट्टणजवळ वसलेलं रंगनथिट्टू हे पक्ष्यांचं, विशेषतः पाणपक्ष्यांचं नंदनवन आहे. सतराव्या शतकात म्हैसूरच्या तत्कालीन राजाने बांधलेल्या बंधार्यामुळे कावेरी नदीत तयार झालेली छोटी छोटी बेटं, तिथे वाढलेली झाडी यामुळे अनेक प्रकारच्या पक्ष्यांसाठी एक चांगला अधिवास (हॅबिटाट) तयार झाला आहे. विसाव्या शतकात बांधलेलं आणि वृंदावन गार्डनमुळे पर्यटकांचं आकर्षण बनलेलं कृष्णराजसागर हे प्रसिद्ध धरण रंगनथिट्टूच्या थोडं वरच्या बाजूला आहे. त्यामुळे पावसाळ्याव्यतिरिक्त बाकीच्या ऋतूंमध्ये कावेरी इथे संथपणे वाहते. लहान लहान बेटांवर घरटी करण्यासाठी अनुकूल अशी झाडी आणि नदीपात्रात सहजपणे उपलब्ध असणारं, मासे, बेडूक, इतर अळ्या असं खाद्य, यामुळे पक्ष्यांना हा परिसर आवडतो, यात नवल नाही. डॉ. सालिम अलींच्या प्रयत्नांमुळे १९४० पासून हा परिसर संरक्षित म्हणून घोषित करण्यात आला. धोबी, खंड्यासारख्या लहान पक्ष्यांपासून ते पेलिकन आणि चित्रबलाकासारख्या मोठ्या पक्ष्यांपर्यंत अनेक प्रकारचे पक्षी इथे दिसतात. यापैकी काही पक्षी वर्षभर इथे असतात, तर काही पक्षी स्थलांतर करून इथे वीण घालण्यासाठी येतात. जानेवारी-फेब्रुवारीत गेलं, तर पेलिकन, मुग्धबलाक, चित्रबलाक, विविध प्रकारचे बगळे अशा अनेक पाणपक्ष्यांची घरटी, त्यातली पिल्लं, पिल्लांना खायला घालणारे पक्षी बघायला मिळतात.
सकाळी लवकरची वेळ ही पक्षीनिरीक्षण करण्यासाठी अतिशय उत्तम असते. उजाडल्याबरोबर पक्षी त्यांचं खाद्य शोधण्यासाठी बाहेर पडलेले असतात. घरट्यात जर पिल्लं असतील, तर त्यांच्यासाठी खाणं आणण्यासाठी पक्ष्यांची लगबग चालू असते. माणसांची, वाहनांची वर्दळ, इतर आवाज पहाटेच्या वेळी कमी असतात. त्यामुळे आपणही जर तेव्हा बाहेर पडलो, तर आपल्याला जास्त सहजपणे पक्षी बघायला मिळतात, त्यांच्या विविध ॲक्टिव्हिटीज आपल्याला दिसतात. रंगनथिट्टू पक्षी अभयारण्याची उघडण्याची अधिकृत वेळ जरी उशिराची असली, तरी आदल्या दिवशी तिथे जाऊन नोंदणी केली तर आपण पहाटे तिथे जाऊ शकतो आणि उन्हं चढेपर्यंतचा बराच वेळ आपल्याला पक्षी बघता येतात.
या रंगनथिट्टू ट्रिपमध्ये ही सकाळची वेळ गाठायचा आमचा इरादा असल्यामुळे आम्ही आदल्या दिवशी लवकरच तिथे पोचण्याच्या हिशेबाने बंगळूरहून निघालो होतो. नेहमीप्रमाणेच वाटेत रामनगरजवळच्या ’कामत लोकरुची’ मध्ये थांबून तिथलं उत्तर कर्नाटकी पद्धतीचं जेवण जेवून आणि स्ट्रॉंग फिल्टर कॉफी रिचवून आम्ही ठरवल्याप्रमाणे दुपारनंतर रंगनथिट्टूजवळच्या हॉटेलला पोचलो. सामान ठेवून, थोडं फ्रेश होऊन आधी पक्षी अभयारण्याच्या कार्यालयात जाऊन दुसर्या दिवशी पहाटेसाठी बोटीची नोंदणी केली. मग वृंदावन गार्डनला गेलो. आता संगीत कारंजी पाहण्याचं अप्रूप राहिलं नसलं, तरी विविधरंगी फुलांचे ताटवे आणि त्यांच्या मध्ये नाचणारी कारंजी यांनी सजलेली ही बाग नेहमीच मन प्रसन्न करते.
दुसर्या दिवशी पहाटे लवकर उठायचं असल्यामुळे रात्री लवकरच झोपलो. पाठीवरच्या बॅगेत दुर्बीण, कॅमेरा आणि टेलिफोटो लेन्स, छोटं नोटपॅड आणि पेन, स्वेटर्स, थोडा कोरडा खाऊ, पाण्याची बाटली, टोप्या अशी सगळी तयारी बंगळूरहून निघताना भरून ठेवली होतीच. तरीही काही राहिलं नाही ना, हे झोपण्यापूर्वी दोनदोनदा तपासलं, कारण अशा सफारीत ऐनवेळी जर कॅमेर्याची बॅटरी संपलीय किंवा दुर्बीण आणायची राहिली आहे असं लक्षात आलं तर जो मनस्ताप होतो त्याला तोड नाही.
उजाडतानाच आम्ही पक्षी अभयारण्यात जाऊन पोचलो. प्रवेशद्वारातून आत शिरल्या शिरल्या एक राखी धनेशाची जोडी दिसली आणि पक्षीनिरीक्षणाची सुरुवात छान झाली. नावाडीदादा होडीसह तयारच होते. दुर्बीण आणि कॅमेरा सज्ज करून होडीत बसलो. हे नावाडी चांगले गाईडही असतात. विविध पक्ष्यांची नावं, त्यांच्या नेहमीच्या बसण्याच्या जागा, सवयी त्यांना माहिती असतात. कुठल्या बाजूने फोटो जास्त चांगला येईल, हेही ते सांगतात. जसजशी होडी पुढे सरकत होती, तसतसे आम्हीही जणू सावकाश पक्ष्यांच्या जगात शिरत होतो. पक्षीनिरीक्षण करताना शांतता पाळणं खूप महत्त्वाचं असतं. आपले कपडे, पाठपिशवी, टोपी, हे भडक रंगांचं नसलं पाहिजे. ज्यामुळे पक्षी किंवा प्राणी डिस्टर्ब होतील असं कुठलंही वर्तन आपल्याकडून घडता कामा नये, हे माहिती असल्यामुळे आम्ही उत्साहाने, पण हळू आवाजात एकमेकांना पक्षी दाखवत होतो. पाण्यावरून धुक्याच्या लाटा उठत होत्या. मुलांनाही त्या जादुई वातावरणाची मजा वाटत होती. रातबगळ्यासारखे (नाईट हेरॉन) काही पक्षी शांतपणे एका जागी बसल्यामुळे चटकन लक्षात येत नव्हते. कवड्या धीवर (पाईड किंगफिशर) अधांतरी तरंगत (हॉवरिंग करत) पाण्यातल्या माशाचा वेध घेत होता. एका झाडावर भरपूर वटवाघळं लटकत होती. काठावरच्या झुडुपांमधून एक लाजरी पाणकोंबडी तुरूतुरू पळत होती. आकाशात उडणारा, पंखांवर गुलाबी झाक मिरवणारा एखादा चित्रबलाक किंवा पाण्यावर आलेल्या एखाद्या फांदीवर बसून मत्स्यसाधना करणारा निळा खंड्या दुर्बिणीतून पाहणं म्हणजे निखळ आनंद! हा आनंद आम्ही अगदी भरपूर लुटला. भरपूर फोटोही काढायला मिळाले. होडीतून चांगलं तास-दीड तास फिरून, भरपूर पक्षी बघून आम्ही काठावर परत आलो.
रातबगळा (नाईट हेरॉन)
कवड्या धीवर (पाईड किंगफिशर)
चमचचोच्या ( युरेशियन स्पूनबिल)
लेख व प्रचि उत्तम !
लेख व प्रचि उत्तम !
छान लिखाण, सुरेख प्रचि!
छान लिखाण, सुरेख प्रचि!
सुंदर चित्रे !
सुंदर चित्रे !
लेख मस्त! थोडक्यात आटपलायस.
लेख मस्त!
थोडक्यात आटपलायस.
सुंदर, पण फोटो अजून हवे होते
सुंदर, पण फोटो अजून हवे होते असे मला वाटलं.
अगदी माहितीपूर्ण लेख. पण
अगदी माहितीपूर्ण लेख. पण अगदीच छोटा लेख वाटला. अजून फोटो पण हवे होते. तुझे फोटोज् म्हणजे नेत्रसुख असतं अगदी. असतील तर नक्की पोस्ट कर.
सगळ्यांना धन्यवाद!
सगळ्यांना धन्यवाद!
हो, लेख छोटा झालाय कारण मुळात तो त्या अंकाच्या शब्दमर्यादेत लिहिला होता.
फोटो अजून आहेत. ते टाकते.
खूप छान झालाय लेख. फोटोही
खूप छान झालाय लेख. फोटोही काय मस्त आहेत.
पहाटवारी तजेलदार करणारी आहे.
पहाटवारी तजेलदार करणारी आहे. आवडली.
सुंदर लेख आणि फोटो तर काय
सुंदर लेख आणि फोटो तर काय अप्रतिम.
अजून येऊ देत फोटो.
छानच लिहीलय.
छानच लिहीलय.
अजून मोठा कर ना इथे लेख.
ता. क. तुझी हत्तीवाली कथा खूप वेळा वाचते. तिचापण पुढचा भाग येऊ देत.
छान लेख फोटो वाढव अजून
छान लेख
फोटो वाढव अजून
अरे , लगेच संपला....अजून येऊ
अरे , लगेच संपला....अजून येऊ देत.
छान तजेलदार लिहिलेयं. फोटोही मस्त.
सामो, प्राचीन, धनवन्ती,
सामो, प्राचीन, धनवन्ती, हर्पेन, अस्मिता, वर्णिता, मनापासून धन्यवाद!
अजून मोठा नाही केला कारण मग ते वर्णन पसरट होत जाईल असं वाटलं.
धनवन्ती सूत्रांतरचा पुढचा भाग सुचला तर लिहीनच. आठवण काढल्याबद्दल थँक्यू!
छान लेख... पक्ष्यांचे फोटोही
छान लेख... पक्ष्यांचे फोटोही मस्त...
चमचचोच्या नाव वाचून कुतुहल वाटलं म्हणून फोटो निरखून पाहिलं तर पक्ष्याची चोच तोंडात चमचा धरल्यासारखीच दिसते.
मस्त लेख. फोटो छान आलेत. अजून
मस्त लेख. फोटो छान आलेत. अजून बघायला आवडले असते.
बाई दवे,
या आयडीने धाग का प्रकाशित केला. तिथून फोटोची मेमरी फुल्ल झाली म्हणून का? आय मीन ईथे फोटो अपलोड करून तिथे लिंक कॉपीपेस्ट करता येते.
फोटो मस्तच आहेत सगळे. वर्णन
फोटो मस्तच आहेत सगळे. वर्णन पण आवडले पण थोडे त्रोटक वाटले. आणखी वाचायला आवडले असते.
मी इथे प्रतिसाद दिला होता असं
मी इथे प्रतिसाद दिला होता असं वाटलं पण सापडत नाहीये. कदाचित सेव्ह झाला नाही. सुंदर फोटो आलेत. विशेषतः चमचचोच्यांच्या (किती च आहेत ह्या शब्दात!) थव्याच्या पार्श्वभूमीवर/पार्श्वपाण्यावर धुकं खूप सुंदर दिसतं आहे.
रंगनथिट्टूला पेलिकन्स पाहिले होते त्यांची आठवण झाली. आम्ही गेलो होतो तेव्हा कुत्र्यासारखे पेलिकन्स पसरले होते सगळीकडे (अशा वेळी अॅबन्डण्ट या शब्दाला मी मराठी पर्यायी शब्द 'कुत्र्यासारखे' हा वापरतो). तिथल्या पाण्यात बोटीने गेलो होतो तेव्हा आजूबाजूने पेलिकन्स हवेत झेप घेऊन पंख पसरून जेव्हा आपल्या डोक्यावरून जातात, तो अनुभव वर्णन करणं अवघड आहे. अहाहा! मी काही फोटोग्राफर नाही, त्यामुळे मी तो अनुभव केवळ मेंदूच्या आठवणीतच ठेऊ शकलो आहे.
लेख आवडला, संपादन करून खास लोकाग्रहास्तव आणखी वाढवा ही विनंती.
खूपच मस्त लेख! अगदी जीवंत
खूपच मस्त लेख! अगदी जीवंत वर्णन. आणि मत्स्यसाधना करणारा निळ्या खंड्या! खूप अभ्यासपूर्ण लेख!
रूपाली, ऋन्मेष, ह.पा., मार्गी
रूपाली, ऋन्मेष, ह.पा., मार्गी, माधव, धन्यवाद! सध्या जरा गडबडीत आहे. वेळ मिळाला की फोटो आणते नक्की इथे.
ऋन्मेष, फोटोंसाठी ड्युआयडी वापरण्याची आयडिया तूच कुठे तरी लिहिली होतीस ती मी वापरली तू म्हणतोयस तसं कॉपी-पेस्टही करता आलं असतं पण तशी गरज नाही वाटली. दोन्ही आयडी वापरत राहणार आहे.
चारपाच ड्युआयडी काढण्याचा माझा (आत्ता तरी) विचार नाही!
ह.पा., पेलिकन्स तर खूप दिसतात रंगनथिट्टूला. पाण्यावर झेपावत मासे झोळीत टाकतात. माझ्या रंगनथिट्टूवरच्या आधीच्या धाग्यात पेलिकन्सचे फोटो आहेत.
https://www.maayboli.com/node/69110
वावे फोटो टाक गं अजुन. बाकी
वावे फोटो टाक गं अजुन. बाकी लेख छान! अजून मोठा असता तर आवडले असते.
सुरेख , आटोपशीर लेख
सुरेख , आटोपशीर लेख
धन्यवाद निकु आणि जयंत नामजोशी
धन्यवाद निकु आणि जयंत नामजोशी.
वावे
वावे
तुमचं लेखन नेहमीच छान आणि फोटो म्हणजे बोनस असतो
पुलेशु
लेखाचं संपादन करण्याची मुदत
लेखाचं संपादन करण्याची मुदत उलटून गेली आहे त्यामुळे प्रतिसादातच नवीन प्रकाशचित्रं टाकते.
गेल्या महिन्यात परत एकदा रंगनथिट्टूला जाऊन आलो. यावेळची पहाटवारीही सुंदर झाली. खरं तर आता दिवसा जावंसं वाटतच नाही
यावेळी काढलेले फोटो
हा ९९% टिकेल्स ब्लू फ्लायकॅचर आहे.
चित्रबलाक
हा मुग्धबलाक आहे. त्यांच्या घरट्यातली पिल्लं मोठी होतात तशी त्यांना घरट्यात जागा कमी पडायला लागते. मग ते नव्याने काटक्या आणून घरटं मोठं करतात. त्यासाठी तो काटकी उचलतोय. ही माहिती मला नवीन होती!
घरट्यात बसलेला मुग्धबलाक आणि त्याची पिल्लं
रातबगळा (नाईट हेरॉन)
रातबगळा (नाईट हेरॉन)
राखी बगळा
ही पाकोळ्यांची असंख्य घरटी आहेत.
देखणे नभचर !
देखणे नभचर !
पाकोळ्यांची वसाहत दिसते.
पाकोळ्यांची वसाहत दिसते. सुंदर फोटो. रातबगळा गोड दिसतोय.
सुंदरच!
सुंदरच!
टू चं थ्री बीएचके करायची हौस आदीम आहे तर!
अप्रतिम फोटोज. मजा आली पहायला
अप्रतिम फोटोज. मजा आली पहायला. टिकेल्सचा फोटो कसला भारी आलाय!
Pages