"यावर्षी इयरएन्डला कुठे जायचं फिरायला?"
ऑक्टोबरच्या एका दुपारी आमच्या पुण्यातल्या घरात सुरु असलेला संवाद.
"हं .. !"
माझा एकाक्षरी प्रतिसाद.
तुझ्या लेकीच्या शाळेला ख्रिसमसची ८ दिवस सुट्टी आहे त्यातच अड्जस्ट झालं तर उत्तम.. !" आई म्हणाली. "रंजू मावशी कधीची बोलावते आहे रायपूरला. जायचं का?" गणपतींनंतर आई माझ्याकडे मुक्कामाला आली असता चाललेली प्लॅनिंग .
"बघू ....!"
काही त्रासदायक प्रश्नांना काय ऊत्तर द्यावे?
१) गावी गेल्यावर केव्हा आला? केव्हा जाणार? कूठे राहतो? असा प्रश्न भेटनारे १०० लोक तरी विचारतात. तेच तेच ऊत्तर देऊन फार त्रास नी कंटाळा येतो. एकवेळ अशा येते की ह्या प्रश्नांपासून वाचण्यासाठी घराबाहेर पडायचीच भिती वाटते.
२) दोन दिवसांच्या कामाला दोन दिवसच लागनार. तरी दोन दिवस का लागताहेत असं येऊन अनेक अडानी विचारतात. त्यांच्या पासून कशी सूटका करावी किंवा काय करावे की ते पून्हा असले फालतू प्रश्न विचारनार नाहीत.
कर्नाटकमधल गोकर्ण, तिथली मंदिरं, मठ, प्रसिद्ध ओम समुद्र किनारा, मुर्डेश्वर, शिवमंदिर याविषयी बरच ऐकल होत. कोस्टल कर्नाटक टुरमधली ही महत्वाची ठिकाणं माझ्या गावापासून म्हणजे सावंतवाडीपासून तीनशे किलोमीटरच्या आत. त्यामुळे एका सावंतवाडी फेरीत तिकडे जायच बरेच दिवसांपासून घाटत होत. या जूनच्या पहिल्या आठवड्यात सावंतवाडीला आम्ही सगळी बहीण भावंड सहकुटुंब एकत्र यायचा योग आला आणि गोकर्ण मुर्डेश्वर फेरीचा कार्यक्रम ठरला. लगेच गोकर्ण आणि मुर्डेश्वर हॉटेल बुकिंग करून शुक्रवारी दुपारी दोन गाड्यांमधून आम्ही गोकर्णाची वाट पकडली. पोहोचेपर्यन्त रात्रीचे नऊ वाजून गेले. मग जेवूनच हॉटेलवर जायच ठरल.
लोणावळा खंडाळा
रिसॉर्ट की शेतमळा
कुठं कुठं जायाचं वविला?
बोला कुठं कुठं जायाचं वविला
मैतर जमवून, कल्ला बी करून
घालवूया चला ह्यो कंटाळा
सांगा तुम्ही येताय ना वविला?
अहो सांगा तुम्ही येताय ना वविला...
विजय साळगावकरसाठी २ ऑक्टोबर जितका महत्त्वाचा त्याहून आपल्यासाठी ३० जुलै महत्वाचा.
दोस्तहो, मायबोली वर्षाविहाराची तारीख ठरली ३० जुलै २०२३!
३० जुलैला international friendship day पण आहे. मौका भी है| दस्तूर भी है |
मायबोली मैत्री दिन साजरा करायला आम्ही उत्सुक आहोत. तुम्हीही आहात ना?
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १३: वारंगल- भूपालपल्ली (७३ किमी)
भाग ४
आजचा पाचवा दिवस, आज आमचं एकदम निवांत शेड्युल होतं. सकाळी जरा निवांत तयार होऊन नाश्ता करून आम्ही निघालो चिचम (की छिछम) ब्रिज कडे.
आज दिवस चौथा, काझा हा बेस पकडून पुढचे ३ दिवस आम्ही किब्बर हिक्कीम कोमिक असे आसपास फिरणार होतो. बऱ्यापैकी मोनेस्टरीज बघायच्या होत्या तरी प्रत्येक ठिकाणी वेगळा अनुभव आणि वेगळं निसर्ग सौन्दर्य असणार होतं. आज सकाळी लवकर आवरून नाश्ता करून आम्ही किब्बर मोनेस्टरीकडे कूच केलं. इथे दोन मुख्य आकर्षणं, एक किब्बर मोनेस्टरी आणि दुसरं म्हणजे किब्बर वाईल्डलाईफ सँक्चरी. हिवाळ्यात मुख्यतः ऑक्टोबर-मार्च दरम्यान जेव्हा संपूर्ण किब्बर बर्फाच्छादित असतं तेव्हा इकडे वरच्या भागात स्नो लेपर्डस दिसतात. खुष उंचीवर राहणारा बर्फात हिंडणारा हा गोंडस दुर्मिळ प्राणी फक्त भारतात ह्या भागातच आढळून येतो.
द चिरा हाऊस ...एक अविस्मरणीय अनुभव
श्री आल्हाद आणि सौ. विदिता भिडे ह्यांच्या चौल रेवदंडा येथे असलेल्या दी चिरा हाऊस ह्या व्हिला ला भेट देण्याचा योग अलीकडेच आला. तो अनुभव इतका सुंदर होता की तुमच्याशी शेअर केल्या शिवाय रहावत नाहीये.
" चिरा हाऊस " हे नावच फार समर्पक आहे. कारण ह्याचं सगळं बांधकाम चिरेबंदी आहे जे अलीकडच्या काळात दुर्मिळ झाले आहे आणि तुम्ही जणू तुमच्या घरातच आहात असंच फीलिंग असत तिथल्या वास्तव्यात ... म्हणून हे " चिरा हाऊस."