कूटप्रश्न

चपाती आंदोलनाचे गूढ

Submitted by चामुंडराय on 30 December, 2024 - 18:40

chapati.png
आपल्या दररोजच्या जेवणात असलेली "चपाती / पोळी / रोटी" चा भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सहभाग होता का?
"चपाती आंदोलन" म्हणून ओळखली गेलेली हि चळवळ खरंच स्वातंत्र्य लढ्याचा भाग होती का?
१८५७ च्या स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा चपाती आंदोलन होती का?
आणि जर असेल तर हे आंदोलन एव्हढे दुर्लक्षित का राहिले?

शब्दखुणा: 

चक्रमे त्रेधा दृश्यम पादम

Submitted by रघू आचार्य on 26 August, 2024 - 10:02

गुरूजी शिकवत होते.
" कोणतीही गोष्ट सिद्ध झाल्याशिवाय विज्ञान त्यास मान्यता देत नाही"

हे वाक्य उच्चारतानाच त्यांच्या सराईत भिरभिरत्या नजरेने डाव्या कोपर्‍यातले रंगडपोश भुट्टा आणि खॅनकस झिग्गो टिपले. दोघे आपसात खुसुर फुसूर करत होते.

"रंगडपोश , खॅनकस हवेत उड"
दोघे अचंबित.
"गुरूजी आम्ही कसे काय उडू ?"

कट कट ..
मागे जाऊयात.

शब्दखुणा: 

पाऊस-कविता झाली पाडून

Submitted by अनन्त्_यात्री on 19 July, 2024 - 02:17

पाऊस-कविता झाली पाडून
विठुलाही वेठिस धरिले
जशी मागणी तसा पुरवठा
ब्रीदवाक्य कवि-झोळीतले

जरा स्वस्थ बैसेन तोवरी
दिन येईल स्वातंत्र्याचा
हस्तिदंती मम मनोऱ्यातुनी
शब्द तिरंगी लिहिण्याचा

दुरून मग खुणवेल दिवाळी
शब्दांची आतषबाजी-
-करण्यासाठी सज्ज होऊनी
लावीन "प्रतिभेची(?)" बाजी

"स्वांत:सुखाय सारी धडपड"
जरी हे जगास कथितो मी
शब्दांच्या पलिकडे वसे ते
सांग कधी का पाहीन मी? Happy

माझ्या सविनय दूरगामी साहित्यसेवेमुळे मराठी साहित्यविश्वात होऊ पाहणारे मूलगामी परिणाम : एक विनम्र सिंहावलोकन

Submitted by रघू आचार्य on 17 March, 2024 - 04:11

थोडक्यात सांगायचं तर..

432779595_7393908160645205_4885594837434241690_n_0.jpg

ईस्त्रायल स्थित मुलाच्या पुनर्विवाहाबद्दल

Submitted by prajo76 on 10 October, 2023 - 06:21

ईस्त्रायल स्थित मुलाच्या पुनर्विवाह करावयाचा असल्यास कुठे मदत मिळू शकेल? मुलगा जन्मापासून मुंबईत मराठी वातावरणात राहिलेला असून सध्या 2003 पासुन ईस्त्रायल मधे आहे. मुलाचा घटस्फाेट झालेला आहे. एक मुलगा असुन आईकडे त्याचा ताबा आहे. वय वर्ष 45 चालू.

कृपया मार्ग दाखवा. आभार.

भाजपा व त्यांच्या मित्रपक्षांचे सत्तापिसाट कडबोळे : चोराच्या उलट्या बोंबा.

Submitted by अलीबाबा on 17 July, 2023 - 10:57

सत्ता बळकावण्यासाठी काय वाट्टेल ते करणे व त्याचे समर्थन चाणक्यनीती, ऑपरेशन लोटस वगैरे म्हणत करणे, या भाजपच्या निलाजर्‍या खोटारडेपणाचा आता लोकांना वीट आलेला आहे.

हेडलाईन मॅनेजमेंट नावाचा अजून एक प्रकार आहे.

म्हणजे 'विरोधी पक्षांचे कडबोळे भाजपाला पर्याय होईल का' वगैरे हेडींग देउन लेख पाडायचा. त्याखाली कितीही पुराव्यासकट तोंडावर पाडले तरी वरवर पहाणार्‍यांना भाजप के खिलाफ सब लोक असे फिलींग द्यायचे काम होऊन गेलेले असते.

शब्दखुणा: 

काय करावे?

Submitted by काड्यासारू आगलावे on 10 July, 2023 - 05:45

काही त्रासदायक प्रश्नांना काय ऊत्तर द्यावे?
१) गावी गेल्यावर केव्हा आला? केव्हा जाणार? कूठे राहतो? असा प्रश्न भेटनारे १०० लोक तरी विचारतात. तेच तेच ऊत्तर देऊन फार त्रास नी कंटाळा येतो. एकवेळ अशा येते की ह्या प्रश्नांपासून वाचण्यासाठी घराबाहेर पडायचीच भिती वाटते.
२) दोन दिवसांच्या कामाला दोन दिवसच लागनार. तरी दोन दिवस का लागताहेत असं येऊन अनेक अडानी विचारतात. त्यांच्या पासून कशी सूटका करावी किंवा काय करावे की ते पून्हा असले फालतू प्रश्न विचारनार नाहीत.

बायका वय का चोरतात ?

Submitted by ढंपस टंपू on 6 July, 2023 - 22:44

बाईचे वय आणि पुरूषाचा पगार विचारू नये असं म्हणतात.
अपवाद वगळता कोणतीच बाई आपले वय खरे सांगत नाही हा सर्वांचा अनुभव असेल. बायका बायकात गप्पा मारताना मुलांची वयं सुद्धा दोन वर्षांनी कमीच सांगतात. कधी कधी कुणाचा सोनू तीन वर्षांपासून पाच वर्षांचा राहतो. त्यामुळं वय चोरलं तरी इतरांना ते माहिती असतं. पण तरी वय चोरतातच.

असं का ?
कृहघ्या.

शब्दखुणा: 

शब्दकोडे

Submitted by Revati1980 on 2 July, 2023 - 01:45

Gallery_1688272974571_1.jpg
आजच्या रविवार सकाळ (२ जुलै २०२३) मधील शब्दचक्र. बहुतेक सगळे शब्दकोडे अवघड वाटते. कुमार १ आणि इतर वाचकांचा प्रतिसाद मिळाला तर सोपे जाईल. धन्यवाद.

रविवार सकाळ मधील शब्दचक्र.

Submitted by Revati1980 on 2 July, 2023 - 01:26

Gallery_1688272974571_1.jpgआजच्या रविवार सकाळ मधील शब्दचक्र. यातील शब्दकोडे अवघड वाटते. कुमार१ तसेच इतर वाचकांचा प्रतिसाद मिळाला तर सोपे जाईल. धन्यवाद.

Pages

Subscribe to RSS - कूटप्रश्न