चक्रमे त्रेधा दृश्यम पादम

Submitted by रघू आचार्य on 26 August, 2024 - 10:02

गुरूजी शिकवत होते.
" कोणतीही गोष्ट सिद्ध झाल्याशिवाय विज्ञान त्यास मान्यता देत नाही"

हे वाक्य उच्चारतानाच त्यांच्या सराईत भिरभिरत्या नजरेने डाव्या कोपर्‍यातले रंगडपोश भुट्टा आणि खॅनकस झिग्गो टिपले. दोघे आपसात खुसुर फुसूर करत होते.

"रंगडपोश , खॅनकस हवेत उड"
दोघे अचंबित.
"गुरूजी आम्ही कसे काय उडू ?"

कट कट ..
मागे जाऊयात.

हे वाक्य उच्चारतानाच त्यांच्या सराईत भिरभिरत्या नजरेने डाव्या कोपर्‍यातले रंगनाथ भट आणि खेमचंद झावळे टिपले. दोघे आपसात खुसुर फुसूर करत होते.
"रंगथाम आणि खेमचंद उभे रहा"
दोघेही चोरी पकडल्यासारखे उभे राहिले.

मित्रांनो इथे आपली कथा ट्रॅकवर आली बरं का. कथा रूळावरून का घसरली असावी ?
त्या खोलीतच काही तरी गौडबंगाल असेल. खोलीतच का ?
सगळीकडेच ते गौडबंगाल आहे.

गंमत म्हणजे हे गौडबंगाल असून, अगदी उघड असूनही आपल्या कुणाच्याच लक्षात आलेले नाही.
कुणाच्याच असे नाही.

खेमचंद आणि रंगनाथच्या लक्षात आले आहे.

गुरूजींनी त्यांचे कान पिळल्यावर ते चाचरत सांगू लागले.

खरे तर त्यांची अवस्था अशी होती कि गप्प बसावे तर धुलाई.
आणि सांगावे तर डबल धुलाई.

काल २७० अंशात पिळला गेल्यावर रंग्या कळवळला. या स्टेजला तो रंगनाथचा रंग्या झाला होता.

"गुरूजी, गणिताच्या बाई "
" त्यांचं काय ?"
रंगनाथ दोन्ही हातांची बोटं एकमेकांत गुंफत चुळबूळ करू लागला.

आता खेमचंद ने सूत्रं हाती घेतली. ही वेळ त्याला महत्व येण्याची होती.
" त्या तुम्हाला आवडतात ना ?"
त्या क्षणी धरणीकंप आणि अणूबाँबचा स्फोट आपल्या कानाजवळ झाल्यासारखे वाटले.
हे पाहून रंग्या सुखावला. माराचे न्याय्य वाटप झाले होते.
त्याचे सुखावणे खेमचंदच्या नजरेतून सुटले नाही.

"मास्तरबद्दल असं बोलतोस ? अरे आमच्या काळी काळे मास्तर आणि शकुंतला बाई शाळेमागच्या झाडामागे आम्ही पाहिले होते. पण आम्ही एव्हढे संस्कारी कि कुणाजवळच काही बोललो नव्हतो"

"नाही म्हणजे तसं नाही"
"मग कसं ?"
"म्हणजे गणिताच्या बाई तुम्हाला कशा दिसतात ?"
" कशा म्हणजे ?"
" अहो म्हणजे वर्णन केलं तर कसं करणार ?"
" आता त्यात काय वर्णन करायचं ? त्या थेट रेखासारख्या दिसतात"
" अंग अशी, द्या टाळी "

या वेळी टाळी रंग्याच्या कानाखाली वाजली. रंग्या गाल चोळत म्हणाला
"मारू नका कि गुरूजी. मग आम्ही काहीच सांगणार नाही"
त्या क्षणी दुसर्‍या कानाखाली टाळी वाजली. रंग्याचा टाळ झाला होता.
"सांगणार नाही हे मला सांगतोस ?"
"मग तुम्ही मारताय ना ?"
"बरं सांग"
" तर त्या आम्हाला पण रेखाच दिसत असतील कशावरून ?"
"म्हणजे ?"
" म्हणजे त्या आम्हाला हेमामालिनी सारख्या दिसत असतील "
" अरे डोळे आहेत का खोबण ? त्यांना स्वतः ला पटलेली गोष्ट आपण कशी काय नाकारू शकतो ? "
" कुठली गोष्ट ?"
" हीच कि त्या रेखासारख्या दिसतात "
"पण त्यांना पटलीय हे कसं ठरवायचं ?"
" अरे त्याच म्हणाल्या ना "
" कधी ?"
" त्या दिवशी नाही का मी त्यांना म्हणालो कि तू रेखासारखी दिसतेस, तेव्हां काय लाजली..."
आणि गुरूजींनी एव्हढ्या जोरात जीभ चावली कि त्यांच्या तोंडून किंकाळी बाहेर पडली.
अगदी काळेमास्तरांसारखीच !

दोघंही समजून उमजून गप्प राहिले. पण एकमेकांना बारीक चिमटे काढत होते.
आख्ख्या शाळेला माहिती असलेलं सीक्रेट अशा रितीने आता बाहेर आलं होतं. अधिकृतपणे.
अगदी सलमान ऐश्वर्या अफेअर ब्रेक अप नंतर कन्फर्म झालं तसंच.
धर्मेन्द्र हेमामालिनी अफेअरच्या अफवा खर्‍या असल्याचे लग्नानंतर समजले तसेच..

गुरूजी आता प्रेमाने बोलत होते. त्यांच्या चेहर्‍यावर आता गुरूनाथ नाईकांच्या कॅप्टन दीपच्या चेहर्‍यावर असलेले कठोर भाव जाऊन चंद्रकांत काकोडकरांच्या नायिकेप्रमाणे आरक्त भाव आलेले होते, त्याच वेळी सानेगुरूजींप्रमाणे "जगाला प्रेम अर्पावे" भाव विलसू लागलेले होते.
याचं एकत्र काँबिनेशन म्हणून मुलांना त्यांच्या जागी बॉबी डार्लिंग दिसू लागलीला होतीता. फळ्यावरचे चुकीचे पर्याय खोडून टाकावे हे वाक्य दिसू लागलेले होते.

"मुलांनो, घाबरू नका, सांगा काय सांगायचेय ते"
"गुरूजी तेच तर सांगतोय, तुम्हाला रेखा दिसती ती आम्हाला हेमामालिनी दिसती"
" असं नाही म्हणायचं मुलांनो, तुम्ही बाबूच्या अड्ड्यावर भांग प्यायला जाता का ?"
"नाही गुरूजी "
" ऐका ना गुरूजी , परवा हा मला म्हणाला कि मला जो चौकोन दिसतो तो तुला त्रिकोण कशावरून दिसत नाही "
" अरे मुलांनो तुम्ही काय हसबनिसांच्या वाड्यात गेला होता काय ?"
" नाही हो गुरूजी, मला पण आधी याच्या बद्दल असंच वाटलं "
" काय रे ? हा काय सांगतोय ?"
" म्हणजे बघा हा गुरूजी. ही रेखा "
ab3ee6a64160d5ee8ebb1e4be8fbf0e9.jpg
" हो यात काय शंका आहे ?"
"म्हणजे गणिताच्या बाई "
गुरूजींनी महत्प्रयासाने आपले सहजभाव आवरले आणि कमालीच्या प्रेमाने म्हणाले
" मुलांनो, त्या गुरूजन आहेत तुमच्या"
"हो तर गुरूजी. तर रेखा तुम्हाला अशा दिसतात कि नाही "
"गुरूजी रेखा मला अशी दिसते"
images (14)_0.jpeg
"अरेच्चा, या कोण ?"
" नवीन आलेल्या भूगोलाच्या बाई "
"मला कशा माहिती नाहीत ?" गुरूजी मनात पुटपुटले.
मग उघड म्हणाले " काय रे ही रेखा नाहीच्चे"
" अहो तेच तर ना, रेखा मला अशी दिसते, तुम्हाला तशी दिसते"
" अरे याला काय झालंय "
"गुरूजी बरोबर बोलतोय तो, हे पहा रेखा मला अशी दिसते "
javed.png

"अरे हे तर बाळ आहे "
"नाही गुरूजी, ही रेखा मला अशी दिसते "
" नाही रे हे तर जावेद बाळ "
" गुरूजी जावेद बाळ मला असे दिसते "
IndiaTv058fde_cryingin-happiness-celebs.jpg
" अरे मुलांनो , आता हा कोण ?"
" गुरूजी , हे बाळ आहे"
" हे पहा जीभ चावली गेल्याने मी शांत आहे नाहीतर "
"गुरूजी विचार करा ना, समोरची भिंत कोणत्या रंगाची आहे ?"
" त्यात काय ? पिवळ्या रंगाची "
" बरोबर "
"तुम्हाला पिवळा रंग कसा दिसतो ?"
" अरे म्हणजे काय,पिवळाच दिसणार "
" पण विचार करा ना मला तो लाल दिसत असेल तर ?"
"अरे असं कसं , मग लाल रंगाला तू काय म्हणशील ?"
"गुरूजी अहो म्हणजे मी लाललाच पिवळा म्हणणार "
" थांबा थांबा माझं डोकं चक्रावून जाऊ लागलंय "
" अहो गुरूजी म्हणजे पिवळाच हो. फक्त आपल्या दोघांना तो वेगवेगळा दिसत असणार "
गुरूजी आता डोकं दाबू लागले होते.
"याच्या डोळ्याचा रंग घारा आहे, त्याच्या काळा, त्याचा हिरवा, गुरूजी तुमचे डोळे निळे आहेत, माझे भुरे . मग आपल्याला एकच वस्तू एकसारखी कशी दिसते ?"
आता गुरूजींना चक्कर यायला लागली होती.
" गुरूजी आम्ही लाल रंगाला पिवळा म्हणत आलो कारण आम्हाला लहानपणापासून या रंगाला पिवळा म्हणायचं असं शिक्षण मिळालंय, कदाचित तुमचा पिवळा हा वास्तवात हिरवा असेल पण तुम्ही त्याला पिवळा म्हणता "
" हो गुरूजी आणि निळ्याला तुम्ही हिरवा समजत असाल "
"हेच आम्ही डिस्कस करत होतो, तेव्हां तुम्ही आम्हाला मारलं "

"अरे पण आपल्या विज्ञानाच्या तासाला याचा काय संबंध ?"
" नाही कसा ?"
"गुरूजी तुम्हाला पटलं कि नाही कि आपल्याला जे जसं दिसतं ते तसं नसतं. म्हणजे तसंच असतं पण प्रत्येकासाठी सेम नसतं, तरी आपण त्याला एकाच नावाने ओळखतो. म्हणजे नाव कॉमन असतं गुरूजी"
" माझं डोकं गरगरतंय रे मुलांनो "
" हाच मुद्दा आहे गुरूजी, कि हे विज्ञानाने सिद्ध कसं करणार ?"
" सिद्ध कसं करणार म्हणजे ?"

"अहो म्हणजे तुम्ही स्वतःला आरशात पाहता कि नाही ?"
"हो . रोजच. "
" तुम्ही स्वतःला कसे दिसता ?"
" अरे म्हणजे काय , जितेंद्र सारखा दिसतो"
"तर गुरूजी असे समजा कि जितेंद्र मला असा दिसतो "
302440554_369799638688498_3693454717638566009_n.jpg
" हा ? हा तर नॉन स्टॉप नॉनसेन्स आहे"
" अहो म्हणजे समजा हो कि मला जितेंद्र असा दिसतो आणि मला लहानपणापासून या चेहर्‍याला जितेंद्र म्हणायचं हे ऐकत आलो आहे"
"म्हणजे तुला मी असा दिसतो ?"
" समजा हो "
"तुला म्हणायचंय काय ?"
" हेच कि जितेंद्र असा दिसतो हे सिद्ध कसं करायचं ?"
" असं करता येत नाही "
"पण गुरूजी हे असं होऊ शकतं कि नाही ?"
" हो"
" मग तर ते विज्ञान आहे. हे सिद्ध करावं लागेलच मग. तुम्हीच म्हणालात ना कि जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत ते विज्ञान नाही ?"
" मुलांनो, तुम्ही ही डोकी भादरायला कुठे जात असता ?"
गुरूजींनी तोंडात आलेले शब्द वगळून कसे बसे वाक्य संपवले.
मग ते म्हणाले
" अरेच्चा ! थॉट एक्सपरिमेंटने करता येईल "
" मग करा कि "
" काय ?"
" हेच कि वर्तुळ हेच त्रिकोण आहे"
" वर्तुळ हे त्रिकोण कसे असेल ?"
" म्हणजे माझ्या जाणिवेत आणि तुमच्या जाणिवेत असलेला फरक ओ गुर्जी "
" अरे म्हणजे असे समजा कि अ या ऑब्जर्वरला वर्तुळ हे वर्तुळ म्हणून माहिती आहे. पण ब ला वर्तुळ हे वर्तुळ म्हणून माहिती नाही. त्याला तो त्रिकोण दिसते . आता ही समीकरणे एकाखाली लिहा आणि वर्तुळ वर्तुळ कॅन्सल राहिले काय ? "
" काय ?"
"एक वर्तुळ आणि एक त्रिकोण. म्हणून वर्तुळ = त्रिकोण "
" गुरूजी मग ब कुठे गेला ?"
" ब गेला अ च्या ह्याच्यात " गुरूजींनी अस्सल शिवी हासडायचा मोह आवरला.
" कशात ?"
" अरे म्हणजे मॅट्रिक्स मधे "
" अ च्या मॅट्रिक्स मधे वर्तुळ हे वर्तुळ आहे, तेच ब च्या मॅट्रिक्स मधे घातले कि त्रिकोण होते . झालं कि नाही सिद्ध ?"
" असं कसं गुरूजी ?"
" असंच असतं ते "
" पण गुरूजी तुमचं मॅट्रिक्स आम्हाला गणिताच्या बाई सारखं दिसतं "

आता मात्र गुरूजींचा पारा चढला आणि त्यांनी डस्टर उचलून मारायचा पवित्रा घेतला इतक्यात खेमचंद ओरडला,
" गुरूजी विंचू "
"कुठेय "
" तुमच्या हातात"
त्या क्षणी गुरूजींनी डस्टर उंच फेकलं ते काही वेळाने न्यूटनच्या नियमाला जागून खाली आले आणि गुरूजींच्या डोक्याचा वेध घेत न्यूटनचा तिसरा नियमही सिद्ध करून फरशीच्या किंवा आकाशाच्या दिशेने खाली किंवा वर गेले.

गुरूजी बेशुद्ध होत असताना खेमचंद म्हणत होता
"चला आता गणिताच्या बाईंना गणित विचारू "

तर मंडळी,
गौडबंगाल आहे हे लक्षात येतंय का ?
रंगनाथ आणि खेमचंदच्या ते लक्षात आलेलं आहे आणि आता गणिताचा तास सुरू होणार आहे.
गणिताच्या बाईंना शुभेच्छा !

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डोकं भंजाळल.
ह्या पेक्षा खरं खरं गणित शिकवणं आणि शिकणं सोपं.

Happy

घोड्याला हत्ती म्हटले, हत्तीला उंट म्हटले, उंटाला बैल म्हटले. तर....

अशा प्रकारचे प्रश्न चौथीत/सातवीत पूर्वी राज्य शिष्यवृत्ती परीक्षा असायची (आताही असते का?) त्यात असत.

हाहाहा. मस्त. त्रिकालाबाधित सत्याची मजेशीर मांडणी. आपल्या मेंदूला जे कळतं, पंचेंद्रियांना जे पर्सेप्शन होतं तेच अन्य कोणाला होतच असेल याची ना गॅरंटी आहे ना सिद्ध करता येतं ना खोडता येतं.

रघू आचार्य,

लेख खुसखुशीत आहेच, पण सिरियसली, बरीच वर्षे मला हा विचार करावासा वाटत आलेला आहे.

की:

मला ज्या रंगाला निळा म्हणायला जगाने शिकवले आहे त्याला निळा म्हणायला इतर सर्वांनाही जगाने शिकवले आहे. मात्र, ज्याला मी निळा समजतो तो रंग एखाद्याला हिरवा किंवा गुलाबी दिसत असला तरी तो त्याला निळाच म्हणणार आणि तो रंग मला निळा दिसतो म्हणून तोच रंग निळा असे काहीच नसणार.

निरभ्र आकाश निळे असते असे म्हणायचे असते एवढेच खरे! ते एखाद्याला 'इतर ज्या रंगाला तपकिरी रंग समजतात' तसे दिसत असले तरी त्याच रंगाला निळा हे नाव आहे एवढेच त्याच्यावर ठसवले असले तर तो आभाळ निळे असते असेच म्हणणार.

SharmilaR, मानव धन्यवाद.
किल्ली आभारी आहे. Happy

सामो आणि बेफिकीर, मला जे म्हणायचे होते ते तुम्ही कोट केले याबद्दल आभार.
माझे वाचन कमी असल्याने ज्या जाणिवा सांगायचा प्रयत्न केला आहे त्याला काही संज्ञा असेल तर कल्पना नाही.
बेफिकीर यांच्या प्रतिसादांमुळे अनेकांना ही गोष्ट जाणवत असेल हे लक्षात येऊन आनंद वाटला.

मी बेशुद्ध पडलीये, माझ्या चेहऱ्यावर पाणी मारून शुद्धीवर आणा कोणीतरी .
नजर मारली तर इतकं , जरा निवांतच वाचावं लागणार आहे हे प्रकरण .

Happy
मलाही असे वाटते. लहानपणा पासून हा विचार माझ्या मनात आहे!
नुसते रंगांबद्दलच नाही तर चविंबद्दल सुद्धा.
म्हणजे गोड चव मला जशी लागते...तशीच ती इतरांना लागत असेल का?
मिरची तिखट म्हणून मी जे अनुभवते ते नक्की ' अब्सोल्युट ' कसे लागत असेल?