स्पिती सप्टेंबर २०२१

स्पिती सप्टेंबर २०२१- भाग ३

Submitted by TI on 21 March, 2023 - 03:33

आज दिवस चौथा, काझा हा बेस पकडून पुढचे ३ दिवस आम्ही किब्बर हिक्कीम कोमिक असे आसपास फिरणार होतो. बऱ्यापैकी मोनेस्टरीज बघायच्या होत्या तरी प्रत्येक ठिकाणी वेगळा अनुभव आणि वेगळं निसर्ग सौन्दर्य असणार होतं. आज सकाळी लवकर आवरून नाश्ता करून आम्ही किब्बर मोनेस्टरीकडे कूच केलं. इथे दोन मुख्य आकर्षणं, एक किब्बर मोनेस्टरी आणि दुसरं म्हणजे किब्बर वाईल्डलाईफ सँक्चरी. हिवाळ्यात मुख्यतः ऑक्टोबर-मार्च दरम्यान जेव्हा संपूर्ण किब्बर बर्फाच्छादित असतं तेव्हा इकडे वरच्या भागात स्नो लेपर्डस दिसतात. खुष उंचीवर राहणारा बर्फात हिंडणारा हा गोंडस दुर्मिळ प्राणी फक्त भारतात ह्या भागातच आढळून येतो.

विषय: 
Subscribe to RSS - स्पिती सप्टेंबर २०२१