वर्षाविहार २०२३: वविनाट्याची पहिली घंटा
Submitted by ववि_संयोजक on 12 June, 2023 - 07:36
लोणावळा खंडाळा
रिसॉर्ट की शेतमळा
कुठं कुठं जायाचं वविला?
बोला कुठं कुठं जायाचं वविला
मैतर जमवून, कल्ला बी करून
घालवूया चला ह्यो कंटाळा
सांगा तुम्ही येताय ना वविला?
अहो सांगा तुम्ही येताय ना वविला...
विजय साळगावकरसाठी २ ऑक्टोबर जितका महत्त्वाचा त्याहून आपल्यासाठी ३० जुलै महत्वाचा.
दोस्तहो, मायबोली वर्षाविहाराची तारीख ठरली ३० जुलै २०२३!
३० जुलैला international friendship day पण आहे. मौका भी है| दस्तूर भी है |
मायबोली मैत्री दिन साजरा करायला आम्ही उत्सुक आहोत. तुम्हीही आहात ना?