द चिरा हाऊस ...एक अविस्मरणीय अनुभव
श्री आल्हाद आणि सौ. विदिता भिडे ह्यांच्या चौल रेवदंडा येथे असलेल्या दी चिरा हाऊस ह्या व्हिला ला भेट देण्याचा योग अलीकडेच आला. तो अनुभव इतका सुंदर होता की तुमच्याशी शेअर केल्या शिवाय रहावत नाहीये.
" चिरा हाऊस " हे नावच फार समर्पक आहे. कारण ह्याचं सगळं बांधकाम चिरेबंदी आहे जे अलीकडच्या काळात दुर्मिळ झाले आहे आणि तुम्ही जणू तुमच्या घरातच आहात असंच फीलिंग असत तिथल्या वास्तव्यात ... म्हणून हे " चिरा हाऊस."
आत शिरताच दिसणारा मोठा व्हरांडा , त्यात समोरच ठेवलेले लाकडी बाक, बाजूला असलेला झोपाळा , व्हरांड्याच लाकडी रेलिंग, कोकणात ही अलीकडे क्वचितच पाहायला मिळणारं उतरतं पाखं, खडबडीत टेक्चर असलेल्या चिऱ्याच्या लाल भिंती ( ज्या क्षणात मला नाडणात घेऊन गेल्या ) बघूनच भिडे दांपत्याच्या उच्च अभिरुचीची कल्पना येते. पुढे घरात ही सगळीकडे ती निःशब्दपणे जाणवतच रहाते. सगळीच सजावट अजिबात भडक अथवा अंगावर न येणारी तरी ही उच्च अभिरुची दर्शवणारी आणि मनाला शांतवणारी आहे.
2)
स्वच्छ सुंदर घर आणि आवार, आजूबाजूला वाऱ्यावर डुलणाऱ्या माड आणि पोफळी, घराला लागून असलेला छोटासा स्विमिंग पूल, वातावरणातली निरव शांतता, (होती फक्त पक्ष्यांची किलबिल), सकाळी नारळीच्या झावळ्यांमधून व्हरांड्यात येणारी कोवळी सूर्यकिरण आणि रात्री गच्चीतून बघितलेला माडा आडून उगवलेला चंद्र हे सगळं कायम स्मरणात राहिल असच आहे. आम्ही त्या घरातच इतके रमलो की आता आलोच आहोत तर समुद्र तरी बघून येऊ या म्हणून थोडा वेळ जाऊन आलो झालं बीचवर.
आम्हाला निगुतीने सैपाक करून मायेने खाऊ घालणाऱ्या काकूंचा आणि त्यांच्या टीमचा शांत वावर घराची प्रसन्नता आणखीनच वाढवत होता. त्यांच्या हाताला विलक्षण चव आहे. मोदक, भाकरी, पोहे, घावन, मिसळ हे सगळेच पदार्थ फारच रुचकर होते. मी शाकाहारी आहे पण बरोबरच्या इतर मंडळींनी माश्यांवर ही आडवा हात मारला. मासे ही चवीला अप्रतिम होते असा रिपोर्ट आहे. तुम्हाला स्वतः काही रांधायच असेल म्हणजे लहान मुलांसाठी पेज, मऊभात वैगेरे तर ते ही नक्कीच करू शकता. सैपाकघर ही अगदी स्वच्छ, सुसज्ज आणि आधुनिक आहे.
परतीच्या प्रवासात आम्ही " कासा दी चौल " ह्या त्यांच्या दुसऱ्या प्रॉपर्टीला ही धावती भेट दिली. ते ही फारच सुंदर आहे. आता next visit इकडे अस ठरवूनच तिकडून बाहेर पडलो.
एका मराठी माणसाने धडाडीने ह्या व्यवसायात इतकी यशस्वी झेप घेतलेली पाहून खूप कौतुक आणि अभिमान वाटतोय. त्याना पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.
तुम्ही ही ह्या व्हिला ला अवश्य भेट द्या, मला खात्री आहे तुमची बिलकुल ही निराशा होणार नाही.
हेमा वेलणकर
छान परिचय!
छान परिचय!
देवकी थॅंक्यु ,
देवकी थॅंक्यु ,
आज ह्या धाग्याने रडकुंडीला आणलं . सारखी एरर येत होती , अपलोड होतंच नव्हत. किती ट्रायल एरर केल्या पण नाहीच. शेवटी अडमिनना विपु पाठवूया असा ही मनात विचार आला...
आणि तो युरेका क्षण आला. फेसबुक वरून कॉपी केल्याने त्यात एक स्मायली होती आणि तीच ग्यानबाची मेख होती. ती काढून टाकली आणि सगळं सुरळीत झालं.
छान ओळख. भेट द्यायला हवी.
छान ओळख. भेट द्यायला हवी.
खोल्यांचे आणि पदार्थांचे फोटो पण दिले असते तर अजून नीट कल्पना आली असती.
छान ओळख! यातील कासा दी चौल चे
छान ओळख! यातील कासा दी चौल चे फेबु पेज आहे.
छान ओळख.
छान ओळख.