आमच्या घराचा मालक शेतकरी होता. आम्ही भाडेकरू. पोनाप्पा असे मालकाचे नाव होते. त्याची बायको स्मिथा. तिला आम्ही मितवा म्हणायचो कारण आम्हाला स्मिथाव्वा असा उच्चार करायला जड जायचं. मितवाला एक मुलगी होती छाया नावाची आणि मुलाचे नाव रोहन. त्याकाळचे त्यांचे घर म्हणजे फार्म हाऊस. प्रचंड मोठे शेत होते. गुरेढोरे, बकऱ्या, दोन कुत्री, एक मांजर असा त्याचा मोठा परिवार होता. दोन गायी होत्या त्यांची नावे लक्ष्मी आणि इंद्राक्षी. " भाग्यद लक्ष्मी बारम्मा, भाग्यद इंदी बारम्मा ", असं म्हणत मितवा त्यांना चारा भरवायची.
कष्ट कमी त्याला फळ
घाम गाळणाऱ्याला मात्र पळ
कुठला न्याय कुठली सत्ता
रास्ता रोके भोके कुत्ता
जितके पैसे तितके लबाड
पहीले गोड नंतर थोबाड
पांढरी टोपी काळे घोडे
पाय विकून आंधळे दौडे
खोट्याची कमाई भल्याची सोंगे
गल्लो गल्ली नुसतेच भोंगे
कुणाचे दात कुणाचे ओठ
हाताची घडी तोंडावर बोट
आमची लढाई तुमची शक्कल
महागाई पोटी विकली अक्कल
स्वार्थी खोकडे विचारात खोट
मामाच्या खिशात फाटकी नोट
जगाची मौज जगाचा बोजा
उन्हात माझा शेतकरी राजा
सुस्त सम्राट मखमली गादी
पायात बाटा अंगात खादी
पिढीजात आहे म्हणून धंदा करण्यात अर्थ नाही
शेतकरी बाप माझा, शेती करण्यात अर्थ नाही...
बाजारात भाव ठरवणाऱ्यांना एवढेच कळावे
अजून ह्यांना आता पिडण्यात अर्थ नाही...
ज्याच्या दावणीची जनावरं, बायकापोरं उपाशी
त्यास 'जगाचा पोशिंदा' म्हणण्यात अर्थ नाही...
चार-चौघात ज्याची माय निलाम होते
त्याला 'भुमीपुत्र' म्हणण्यात अर्थ नाही...
सदा परिस्थिती खेळे त्याच्या नशिबाशी
गुलामच तो,'बळीराजा' म्हणण्यात अर्थ नाही...
योजना सगळ्या फायलींत अन् कागदोपत्रीच
हत्याच ती, 'आत्महत्या' म्हणण्यात अर्थ नाही...
दुष्काळाने हिरावला बाप
आणि आसवांचा बांध फुटला,
पण सावरला संसार माउलीने,
जेव्हा तान्हा पोरका झाला
का टाकले रे विठ्ठला,
असे दुर्भाग्य तिच्या माथी,
ना वारी चुकविली तिने कधी,
केला अट्टाहास तुझ्यासाठी
रमली भक्तीत तुझ्या ती,
आंधळा विश्वास ठेवला,
जपला फाटका संसारही पण
धनी तू चोरून नेला,
धगधगत्या उन्हात तिच्या,
डोईचा आधार हरपला,
जशी साथ सोडली सावलीने,
जेव्हा नभी सूर्य आला
सावल्या पार पायाखाली आल्या होत्या.सूर्य डोक्यावर आला होता तरी गारठा कमी होत नव्हता.वारा गारा घेऊन भणाभणा वाहत होता.हळूहळू सारी माणसं पांगत चालली होती.भरलेले घर रिकामं होऊ लागलं होतं.समोर दादाचा फोटो होता खूर्चीवर हार घातलेला.शायनासरीत आताचं उठून बोलतेलं असा.फुटू पाहीला की नुसता पोटात जाळ उठायचा.तेव्ह जाळ काळीज जाळीत पारवर डोक्यापर्यंत जायचा.हुंदका नुसता नरडयातचं आडकून बसायचा.वरचा श्वास वर. खालचा श्वास खाली व्हायचा.आता डोळं नाही पाझरतं.डोळयातलं पाणीच आटून गेलं आसलं. धा-बारा दिसं झालं की दादानी फाशी घेतलेली. कव्हरं डोळ तरी वाहतेल ?
पुन्हा तीच आळवणी
थेंब पहिले वहिले
धरेवर कोसळले
अंकुरती आशा थोर
मनमन थरारले
रान होईल हिरवे
दाणे अमूप टपोरे
उजाडशा झोपडीत
डोळे लकाके गहिरे
सुखावेल गाईगुरां
चारा गोजिरा हिरवा
वेली रोपट्यांना येई
धुमारून तो फुटवा
भाजी भाकरी इवली
पडे ओंजळीत का रे ?
दिस येतील सुखाचे
परजेना (पर्जन्या) सांग ना रे !!!
सकाळ सकाळचं उन्हं चटकतं होतं. रायबानं दोन तीन पोती कांदयाची आणली होती. रातचं त्यानं कोठयावर आणून ठेवली होती.आज आठडयाचा बाजार.आठ दिवसा पासून त्यानं कांद काढून ठेवलं होतं. तसचं चांगलं चांगलं निवडून ठेवलं होतं. लालजरीत कांदं.. चमकत होतं. लयचं प्यूअर कांदा आला होता. बरं ते पोसला भी चांगला होता.खाताडाचा जोर होता. आंवदा त्यानं कारखान्याची गाडी बंद केली.. शेतातच डोकं लावलं होतं.दोघ नवरा बायको आणि एकुतली एक पोरगी. सारचं शेतात राबत होतं. उषीची शाळा म्हणजे नावला साळा. परीक्षा बीरीक्षा असली की त्यावढया पुरतं साळात जायचं. नाहीतर सारख रानातच खपायचं. मास्तरं भी चांगलेत.
हा लेख New Jersey च्या रंगदीप या दिवाळी अंकात प्रकाशित झाला आहे
-------------------------
२०१५ चा हॉलिडे सिझन. जवळजवळ रोजच पार्ट्या चालू होत्या. अश्याच एका पार्टीत, संगीताच्या तालावर धुंद नाचून दमलेली मंडळी जेवायला बसली होती.
“अगं, शेतकऱ्यांच्या आत्महत्येविषयीचा व्हिडिओ पाहिलास की नाही? कित्ती वाईट वाटतं ना ग त्यांची छोटी छोटी मुलं आणि म्हातारे आईवडील बघून?”
खड्डा
लवता लवत नाही
पापणीही मिटत नाही
भाळी आभाळभर चिंतापरी
आभाळालाच पाझर नाही
खिशात दमडी नाही
घरात भाकर नाही
लाज बाजारात विकूनही
नशिबाला ठिगळ नाही
ढगात पाणी नाही
घरात नाणी नाही
फुलांत मकरंद नाही
फुलपाखरू दिसत नाही
सूर्याच्या दाहापायी आतडी
काही जळत नाही
घोटघोट हुंदका गिळून
खड्डा काही भरत नाही
.
मी भूमिपुत्र
सर्व भुकेल्यांचा मित्र
जीवन विखुरले हो सर्वत्र
गोठुनि गेली आता काळरात्र
मी भूमिपुत्र
कष्टाळलेे माझ्या जीवनाचे चित्र
रंग सर्व उडुनि गेले
रक्ताचा लाल उरला मात्र
मी भूमिपुत्र
सामान्य जगण्यांसही अपात्र
बायको मुलांस न देवू शकलो
सुख समृद्धीचे स्थिर छत्र
मी भूमिपुत्र
कर्जात जाहलो गलितगात्र
नव्या मौसमाच्या आधारे
उमीद जागवून राहिलो मात्र