आमच्या घराचा मालक शेतकरी होता. आम्ही भाडेकरू. पोनाप्पा असे मालकाचे नाव होते. त्याची बायको स्मिथा. तिला आम्ही मितवा म्हणायचो कारण आम्हाला स्मिथाव्वा असा उच्चार करायला जड जायचं. मितवाला एक मुलगी होती छाया नावाची आणि मुलाचे नाव रोहन. त्याकाळचे त्यांचे घर म्हणजे फार्म हाऊस. प्रचंड मोठे शेत होते. गुरेढोरे, बकऱ्या, दोन कुत्री, एक मांजर असा त्याचा मोठा परिवार होता. दोन गायी होत्या त्यांची नावे लक्ष्मी आणि इंद्राक्षी. " भाग्यद लक्ष्मी बारम्मा, भाग्यद इंदी बारम्मा ", असं म्हणत मितवा त्यांना चारा भरवायची.
एक काळ होता तेव्हा मी "मनोगत" वर पडीक असायचो. आयटी मधील नवी नोकरी आणि इंटरनेटची सुविधा. ऑनलाईन वाचन हि संकल्पना माझ्यासाठी नवीन होती. मला मजा यायची ऑनलाईन वाचायला. सतत काही छान वाचायला मिळतंय का ते बघायचं.
छान म्हणज, जे मला छान वाटतं ते.
असंच एकदा चाळत असताना तुझी 'कॉफी' दिसली. म्हटलं बघूया कशी वाटतीये !
कॉफी हा प्रकारच वेगळा आहे. कॉफी म्हंटलं कि येतं प्रेम आणि सोबतच विरह सुद्धा !
कॉफीचा कडवटपणा जितका जास्ती, तितकी तिची नशा जास्ती !
तुझी 'कॉफी' वाचताना अगदी असंच काहीसं वाटलं.
तुम्हे कॉफी पसंद है ।
और मैं चाय का दिवाना हू।....
तुझे पसंद है उची इमारतें
मैं वादियों में रहता हूं।..
तु धुंडती है हसने के बहाने
मैं बेवक्त मुस्कुराता हू।..
तु थोडी सी पागल है
मैं थोडा सा सयाना हूं।..
तुम्हे कॉफी पसंद है ।
और मैं चाय का दिवाना हू।....
तुम्हे नाचना पसंद है
मैं नज़्म सुनाता हूं।..
तुम्हे शौहरत पसंद है
मैं बेनाम ही रहता हूं।..
तुझे भीड़ पसंद है
मैं तन्हा रहता हूं।..
तुम्हे कॉफी पसंद है ।
और मैं चाय का दिवाना हू।....
तुम्हे ठंड पसंद है
"कुठे भेटतोय? मला उद्या दुपारी जमेल. अगदी थोडा वेळ."
त्याच्या इ-मेलला जवळपास दोन आठवड्यांनी आलेला तिचा रिप्लाय वाचून त्याच्या मनात चाललेली चलबिचल थोडी कमी झाली.
"ट्रॅव्हल कॅफे. एस बी रोड. दुपारी तीन ?"
"मी आलेय."
त्यानं धावत रस्ता क्रॉस केला आणि तो आत शिरला. एका कोपऱ्यातल्या बेंचवर ती पाठमोरी बसली होती. तो तिच्या समोर जाऊन बसला.
"का बोलावलंयस मला ?"
"मी बोलावलं, आणि तू आलीस.. का आलीस?"
"काय बोलायचंय तुला?"
आज अजून एक बायोडेटा तिच्या हाती पडला. विकेंड आला की ठरलेल्या मुलाला भेटायचं. फुकटची कॉफी प्यायची आणि मग "कळवते" असं म्हणून निघायचं. नकार द्यायला नवीन नवीन कारणं शोधायची.
कित्येक विकेंड तिचं हेच सुरू होतं.
आज पुण्याचं स्थळ होतं.
"सावकाश जा. काही लागलं तर लगेच कळव. आणि छान बातमी घेऊन ये. माझं बोलणं झालय त्याच्या घरच्यांशी.. खूप चांगलं घर आहे.." - आई
"क्लिक व्हायला पाहिजे गं आई... किती वेळा सांगू तुला....जाऊदे चल बाय .."
ज्यांचे वय साधारणपणे पस्तीशीहून अधिक आहे त्यांना आठवत असेल पूर्वी दुकानांतून सुटी कॉफी मिळत असे. सुटी म्हणजे त्याकाळी कॉफीचा ब्रँड नव्हता. दुकानदारांना होलसेल मध्येच मिळायची. आणि ग्राहकांना ते वजनावर पुडीत बांधून कॉफी देत असत. तिचा स्वाद अफलातून होता कि जो आजही जिभेवर रेंगाळत आहे.