कॉफी-वॉलनट मफिन्स
- २ कप सेल्फ रेझिंग फ्लार (२ कप मैदा + २ टीस्पून बेकिंग पावडर) चाळून
- १२५ ग्रॅम अनसॉल्टेड बटर - मऊ (रूम टेंपरेचर)
- १ कप बारीक साखर
- अर्धा कप दूध
- २ अंडी
- २-३ टीस्प्पुन इंस्टंट कॉफी (नेस्कॅफे, ब्रु कुठलीही)
- पाव कप अक्रोडाचे तुकडे
कॉफी आयसिंग
- १ कप आयसिंग शुगर
- १ टीस्पून इंस्टंट कॉफी (नेस्कॅफे, ब्रु कुठलीही)
- २-३ चमचे उकळते पाणी
- सजावटीसाठी अक्रोडाचे तुकडे
ऑफिसच्या मॉर्निंग टी साठी काल हे मफिन्स केले होते
कॉफी-वॉलनट मफिन्स
१. ओव्हन १८० डिग्री सेल्सीयस ला तापत ठेवा. मफिन पॅन मधे पेपर कप्स घालुन ठेवा किंवा सिलीकॉन मोल्ड्स तयार ठेवा.
२. चाळलेला मैद्यामधे अक्रोडाचे तुकडे घालुन ते नीट घोळवून घ्या.
३. काचेच्या बोल मधे मऊ बटर, साखर आणि कॉफी फेटायला घ्या. चांगले क्रिमी होईपर्यंत फेटा. यात एका वेळेस एक अंडे घालुन हलके मिक्स करुन घ्या.
४. आता या ओल्या मिश्रणात, वरचे मैदा+अक्रोडाचे मिश्रण हलके हलके मिक्स करा. यासाठी चमचा नाहीतर स्पॅट्युला वापरा. मिक्स करतानाच यात हळुहळु दुध देखिल घाला.
५. हे मिश्रण आता मफिन पॅन्समधे घाला.
६. हे मफिन्स १५ मिनीटे बेक करा. मफिन्स तयार झालेत की नाही हे टूथपीक्/सुई/स्क्युअर ने चेक करा आणि ओव्हनमधुन बाहेर काढा.
७. मफिन्स पूर्ण थंड होऊद्यात.
-----
कॉफी आयसिंग
८. कॉफी उकळत्या पाण्यात नीट विरघळून घ्या.
९. आयसिंग शुगर एका बोलमधे घेऊन त्यात हे कॉफी चे मिश्रण हलके हलके मिक्स करा.
१०. आयसिंगची कन्सीस्टंसी साधारण भज्यांच्या पिठासारखी यायला हवी. त्याप्रमाणे कॉफी चे मिश्रण कमी जास्त वापरा.
-----
असेंब्ली
११. थंड झालेल्या मफिन्सवर तयार कॉफी आयसिंग बटर नाईफ / पॅलेट नाईफ वापरून पसरा.
१२. आयसिंग ओले असतानाच त्यावर अक्रोडाचे तुकडे सजावटीसाठी लावा. थोड्या वेळाने आयसिंग थिजेल.
१. अक्रोड मैद्यात घालुन नीट घोळल्यामुळे तुकडे नंतर तळाशी बसत नाहीत, बॅटरमधे नीट मिक्स होतात.
२. तयार मिश्रण मफिन पॅन्समधे घालण्यासाठी दोन टेबलस्पून किंवा आयस्क्रिम स्कूप वापरा म्हणजे मिश्रण नीट कपात पडेल.
३. मफिन्सचे मिश्रण थोडे कोरडे वाटल्यास अजून चमचाभर दूध घाला. काल मला घालावे लागले. से रे फ्लार च्या बॅचेस मधे फरक असू शकतो.
४. मूळ रेसिपीमधे ओव्हनचे टेंपर्चर २०० डिग्री दिले आहे. पण मला वाटतं हे तापमान जास्त झाले त्यामुळे मफिन्सना थोड्या भेगा पडल्या. म्हणून १८० डिग्री ला ओव्हन तापवा. अर्थात तुमच्या ओव्हनचे तापमान त्याच्या प्रकारा प्रमाणे (फॅन फोर्स्ड, कन्वेक्शन, मावे इ इ ) आणि तुमच्या अंदाज / अनुभवा प्रमाणे कमी जास्त अॅडजेस्ट करावे लागेल.
४. आयसिंग शक्यतो फार आधी बनवून ठेऊ नका कारण ते थिजायला लागेल. थिजलेच तर गरम पाण्यात बोल ठेऊन ते परत नरम करता येते. पण शक्यतो टाळा कारण आयसिंग शुगर गरम केल्याने आयसिंगची कन्सिस्टंन्सी बदलते.
५. सजावटीसाठी अक्रोडाचे तुकडे न वापरता अर्धा अक्रोड लावता येइल किंवा रोस्टेड कॉफी बीन्स पण वापरता येतिल.
आज मी पहिली.. छान
आज मी पहिली..
छान रेसिपी..करून बघणार.
मस्तच
मस्तच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान सोपी रेसिपी आहे ..
छान सोपी रेसिपी आहे ..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त
मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मध्ये मध्ये बेक केल्याशिवाय
मध्ये मध्ये बेक केल्याशिवाय हिला चैन पडत नाही ....;)
मस्त दिसतायत मफिन्स....:)
Bhari!!!!
Bhari!!!!
मस्त !!
मस्त !!
वॉव, एकदम मस्त!!!
वॉव, एकदम मस्त!!!
मस्त दिसताहेत. मला वाटतं यात
मस्त दिसताहेत.
मला वाटतं यात एखादा इसेन्स (रम, चॉकलेट) चांगला स्वाद देईल.
भारीये...
भारीये...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान. मि बिना अंड्याचे करणार
छान. मि बिना अंड्याचे करणार![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मस्त.. गेल्या आठवड्यात
मस्त.. गेल्या आठवड्यात लेकीने विकतचे मफिन्स खाल्ले तेव्हाच चाललेली चर्चा लो कॅल मफिन्स बनवता येतील का याची. तुझ्या पाकृवर अजुन प्रक्रिया करुन बघते लो कॅल काही बनते का ते..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
झकास! एकदम प्रो क्वालिटी!
झकास! एकदम प्रो क्वालिटी!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वॉव. तोंपासु
वॉव. तोंपासु
भारी मफिन्स. मस्तच यम्मी
भारी मफिन्स. मस्तच यम्मी दिसताहेत.
मध्ये मध्ये बेक केल्याशिवाय हिला चैन पडत नाही>> अगदी अगदी.
मस्त दिसतायत
मस्त दिसतायत मफिन्स................. तोंपासु...............
मस्त.....
मस्त.....
सही$$$$$$$$$
सही$$$$$$$$$
हे कॉफी कप केकपेक्षा सोपे
हे कॉफी कप केकपेक्षा सोपे वाटताहेत.... करून बघेन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लाजो तु केक क्विन होणार आहेस.
लाजो तु केक क्विन होणार आहेस.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त मफिन्स. करुन बघते.
सोपी पाकृ आहे. करून बघावी का?
सोपी पाकृ आहे. करून बघावी का?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच..
मस्तच..
लाजो नेहमीच वेगवेगळ्या यम्मी
लाजो नेहमीच वेगवेगळ्या यम्मी तसेच देखण्या रेसिपीज करत असतेस!!! कसं सुचतं गं??? मला फार फार कौतूक वाटतं तुझं!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद लोक्स मंजूडी, मी
धन्यवाद लोक्स![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मंजूडी, मी विसरलेच होते ते कपकेक्स
धन्स गं, आठवण करुन दिल्याबद्दल. आता करायला हवेत परत ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान दिसतायत!
छान दिसतायत!
लाजो, टेम्प्टींग
लाजो, टेम्प्टींग दिसतायत!![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
पुन्हा देशात कधी येतेय्स ते सांग...तळच ठोकेन तुझ्याकडे!(शिकण्यासाठी म्हटलं गो!)
मस्त! मफिन्स नक्की करणार.
मस्त! मफिन्स नक्की करणार. हुकमी जमले तर झब्बूही देईन![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
यम्मी मफिन्स. एक्दम
यम्मी मफिन्स. एक्दम तोंपासु.
लाजोडी तु धन्य आहेस. (कितीवेळा हेच म्हणायचं?:-))
अहाहा! काय दृष्टीसूख! लाजो
अहाहा! काय दृष्टीसूख!
लाजो मायबोलीची बेकिंग क्वीन आहे!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लाजो मायबोलीची बेकिंग क्वीन
लाजो मायबोलीची बेकिंग क्वीन आहे! >>>>>>>> मृण्मयी तुला +१००
आनि लाजो तुला तर एकदम आउट ऑफ!!!!!!!!!!!!!
Pages