सुस्त सम्राट
Submitted by Santosh zond on 17 August, 2021 - 00:03
कष्ट कमी त्याला फळ
घाम गाळणाऱ्याला मात्र पळ
कुठला न्याय कुठली सत्ता
रास्ता रोके भोके कुत्ता
जितके पैसे तितके लबाड
पहीले गोड नंतर थोबाड
पांढरी टोपी काळे घोडे
पाय विकून आंधळे दौडे
खोट्याची कमाई भल्याची सोंगे
गल्लो गल्ली नुसतेच भोंगे
कुणाचे दात कुणाचे ओठ
हाताची घडी तोंडावर बोट
आमची लढाई तुमची शक्कल
महागाई पोटी विकली अक्कल
स्वार्थी खोकडे विचारात खोट
मामाच्या खिशात फाटकी नोट
जगाची मौज जगाचा बोजा
उन्हात माझा शेतकरी राजा
सुस्त सम्राट मखमली गादी
पायात बाटा अंगात खादी