आपल्याकडे जमिनीचे व्यवहार करायचे म्हटलं की अनेक कायदे व तरतुदी माहित असाव्या लागतात. वेळोवेळी त्या त्या संदर्भाने अनेक कायदे येत जात असतात व लोकांचा गोंधळ उडवून देतात. जमिनीच्या संदर्भाने असलेले ढिगभर कायदे सामन्य माणसासाठी ख-या अर्थाने डोकेदुखी ठरतात. वरुन थोडेसे पैसे वाचवायच्या नादात लोकं चांगला वकिल न करता ऐविक माहितीवर व्यवहार करतात व अपु-या माहितीनिशी नको तिथे व्यवहार करुन बसतात. नंतर पैसे अडकले म्हणून बोंब सुरु असते. अशाच अनेक कायद्या पैकी भंबेरी उडविणारा आजून एक कायदा म्हणजे महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम २००१.
तसं जमीन सगळ्य़ांकडेच असते(म्हणजे असायची) परंतू जमिनीच्या हक्कांबद्दल अधिकांश लोकांना माहिती अथवा कायदेशीर ज्ञान नसतं. मग या लोकांना कोणीही काहिही स्टोरी सांगतं व त्यांना ते खरं वाटू लागतं, किंवा प्रचंड गोंधळ उडतो. त्यामागे कारण एकच, तुम्हाला जमिनी बद्दल मुलभूत माहिती नसते. मी आज ती माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो.
जमीनिचा मालक कोण?
मुंबई ही ज्या सात बेटांची बनली होती. त्यातील एक बेट अर्धेअधिक माझ्या खापरपणजोबांचे होते. असे आमचे वडिलधारी सांगतात. खरे खोटे ठाऊक नाही. आजची पिढी जशी फारसे डोके न लावता व्हॉटसप मेसेजवर विश्वास ठेवते. तसे थोरामोठ्यांनी सांगितलेल्यावर विश्वास ठेवा. असे आमच्या घरचे संस्कार होते. तर ते एक असो. पुढे भारत स्वतंत्र झाला. संस्थाने विलीन झाली. त्यात आमचीही जायदाद गेली. जे थोडंथोडकं उरले ते पुढच्या पिढीत दहा भावंडांमध्ये वाटले गेले. जे माझ्या आजोबांच्या वाट्याला आले ते पुन्हा आठ भावंडांमध्ये वाटले गेले. तेव्हा ही कॅलेंडर छपाई नॉर्मल समजली जायची.
दुष्काळाने हिरावला बाप
आणि आसवांचा बांध फुटला,
पण सावरला संसार माउलीने,
जेव्हा तान्हा पोरका झाला
का टाकले रे विठ्ठला,
असे दुर्भाग्य तिच्या माथी,
ना वारी चुकविली तिने कधी,
केला अट्टाहास तुझ्यासाठी
रमली भक्तीत तुझ्या ती,
आंधळा विश्वास ठेवला,
जपला फाटका संसारही पण
धनी तू चोरून नेला,
धगधगत्या उन्हात तिच्या,
डोईचा आधार हरपला,
जशी साथ सोडली सावलीने,
जेव्हा नभी सूर्य आला
घर खरेदी करताना काय पहावे,सरकारी कागदपत्रे,फसवणुकीचे प्रकार,बैंक लोन ,एजेंट करावा का इत्यादि माहिती हवी आहे.
नमस्कार !
मला थोडी माहिती हवी आहे. आमचा पुण्यामधे बावधनला फ्लॅट आहे, सध्या तिथे कोणी राहत नाही. तिथे राहणार्या शेजार्यांनी आमचा पार्किंग लॉट भाड्याने मागितला आहे. असे करणे योग्य आहे का? असल्यास किती भाडे मागावे? ह्यामधून पुढे काही अडचणी येऊ शकतात का?
धन्यवाद!