पंख पसरून उडणारी डुकरे
तू माझे काय झाले याची पर्वा केली नाहीस
आणि मी हि तुझी
कंटाळा आणि वेदनांशी सामना करीत आपण चाललो आहोत वेड्यावाकड्या मार्गावर
कधीतरी पावसाकढे बघत
कोणत्या नालायकाला दोष दयावा याचा विचार करीत
आणि बघत ती पंख पसरून उडणारी डुकरे
-उडता डुक्कर
(रूपांतरित / आधारित / प्रचोरीत)
आम्ही एक रिसेलमध्ये फ्लॅट घेत आहोत जो आम्हाला बाजारभावापेक्षा १८ लाखाने कमी किंमतीत मिळत आहे. आमच्या CA चे म्हणणे आहे की जर आम्ही कमी किंमतीत ते घर घेतले तर वरच्या १८ लाखावरसुद्धा आम्हाला ३०% टॅक्स भरावा लागेल. किंवा दुसरा पर्याय असा की अॅग्रिमेंट व्हॅल्यु संपुर्ण दाखवून (बाजारभावाप्रमाणे) मालकास संपुर्ण पेमेंट करुन वरील रक्कम मालकाकडुन रोख स्वरुपात परत घ्यावी. उदा. आमचा व्यवहार २० लाखाचा तर बाजारभाव ३८ लाख आहे. तर ३८ लाखाचे अॅग्रीमेंट करुन मालकास १९ लाख बँक लोनने तर उरलेले १९ चेक पेमेंट करावे. त्यानंतर मालकाकडुन रोख रक्कम १८ लाख परत घ्यावे.
त्याचे झाले काय, पुढच्या विकांताला आमचा शाळासमुह समुद्र बघायला जातोय. बहुतांश जणांचा समुद्र एव्हाना बघून झालाय तरीही पुन्हा बघणार आहोत. कारण फुल्ल टू धिंगाणा घालायचा प्लान आहे. या आधी आम्ही असे फार वर्षापूर्वी डोंगराच्या वेळी आणि नुकतेच हिलस्टेशनवर केले होते. यण्दा हा मान चक्क समुद्राने पटकावला आहे. पण एक गोची आहे. धिंगाणा डान्स करायला पोषक अशी जागा समुद्राजवळ नाही. म्हणून मग समुद्राला भरती आली की दंगा करायचा प्लॅन आहे. पण धिंगाणा करायला ब्रांडेड हॉटेल भाड्याने घेणे आले. किती वेळा छोट्या छोट्या गोष्टींसाठी मायबोलीकरांना त्रास देणार. म्हणून यंदा सरळ आमच्या नंदीबैलाला विचारले.
मी माझ्या घरात बसलो होतो. ती व्यक्ति माझ्यासमोर होती....
साधारण तीस वय. भारदस्त बांधा. सहा फूट उंच. लांब नाक. तरतरित डोळे.
मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याचे हात आणि पाय चांगलेच लांब असून त्याचे तळवे अत्यंत पसरट होते.
कोपऱ्यात असलेले खास बनवलेले बूट त्याची साक्ष देत होते.
तर पुतळा प्रकरणानंतर झालेल्या गोष्टी म्हणजे मी माझ्या घरात बसलो होतो आणि माझा पुतळा घराबाहेर दिमाखात उभा होता.
"तर आपल्याला आपले घर परत हवे आहे."
"हो."
"आणि त्यासाठी आपण मी मोजलेली किंमत परत करायला तयार आहात."
"हो."
"तर हे घर मी विकत घेतले आहे हे आपणांस मान्य आहे."
"हो."
शुभेच्छा नव-वर्षाच्या
करा निर्धार नव-वर्षाचा
यशप्राप्तीसाठी झटण्याचा
सुख-शांती-यश देखील
खुशी-खुशीने वाटण्याचा
मिळत राहील यश सदैव
तुमच्या सार्या प्रयत्नांना
जीवनी तुमच्या तत्परतेने
डिस्चार्ज मिळो यातनांना
झाला प्रफूल्लित मन:पुर्वक
हा घ्या शब्दफूलांचा गुच्छा
देतो आपणास स्नेहबंधाच्या
नव वर्षाच्या नव शुभेच्छा
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
आमचे संविधान
स्वातंत्र्य समता बंधुत्वाचा
चरा-चरात मिळतो मान
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा
इथे मिळतो हो बहूमान
धर्मनिरपेक्षता समाजवादी
आहे एकात्मतेचा प्राण
मानवतेच्या कल्याणासाठी
जगात भारी आमचे संविधान
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
मूंबई परिसराजवळ कर्जत , नेरळ्भागात सेकंड होमसाठे फ्लॅट घ्यायचा आहे.
कुणी सुचवू श्के का ?
सेकंड. होम शोधून जीव दमला. डोंगर असला की नदी नसते. दोन्ही असले की स्वीमिंग पुल नसतो. स्गळे अस्ले की बजेट जास्त असते.
निस्र्गरम्य हवे. स्वीमिंग पूल हवा.
सेकंड होम सोय की गैरसोय ( सत्य की थोतांड ? ) हेही लिहिल्यास चालेल.
मुम्बई परिसरात चाळीतील घरांच्या अनेक जाहिराती येतात. ही घरे लीगल आहेत व लोनही मिळते असा त्यात उल्लेख असतो.
चाळीतील घरे लीगल असतात का ?
माझ्या एका डॉक्टर मित्राने खूप वर्षांपूर्वी चाळीत दोन घरे घेतली होती. नंतर त्याने त्यावर दोन मजले चढवुन दवाखाना व घर केले.. अर्थात हे बांधकाम लोड बेअरिंगचे म्हणजे मेटलचे खांब व बीम्स या पद्धतीचे असते.
दोन नाही निदान एक तरी मजला नक्की चढवता येतो.
वीस पंचवीस वर्षानी जागेलाही भाव येऊ शकतो.
याबाबतचे अनुभव व माहिती कृपया इथे लिहा.
~!!! वावराकडं चाल !!!~
फाटक्या-तुटक्या संसाराची,तुच गड्या ढाल
वावराकडं चाल आता,वावराकडं चाल,...
हर्ष दाटला मनात-थेंब पडल्यातं रानात
काल भरलीया टिफणं-आज पेरूया रं रानं
पेरणीसाठी आज गड्या,होऊया बेताल
वावराकडं चाल आता,वावराकडं चाल,...
आज वावरातं कसंन-बीज आणंल उसणं
तुझ्या शेणाचं रे खात-देई मला साथं
आरं पिकु लागेल तुझ्यामुळं-शेतामधी रं माल
वावराकडं चाल आता,वावराकडं चाल,...
पेंडी-पेंडीचा हिसाब-आज दाण्यात भरला
अन् सुखा हा घास-आज वावरातं पेरला
लेकरा-बाळांचे रं माझ्या,नको करू हाल
वावराकडं चाल आता,वावराकडं चाल,...
कर्ज डोई घेऊनिया-बिंधास्त होऊनिया
आज पेरीतो हे रानं-तुझं गाऊनिया गाणं