प्रस्तावना:- सदर लेख माझी बायको मंजिरी घाटपांडे हिचा असून ती व्यवसायाने रिअल इस्टेट कन्सलटंट /ब्रोकर आहे. नोंदणी खात्यातील नोकरीचा पुर्वानुभव असल्याने त्याचा उपयोग कदाचित मायबोलीकरांना होउ शकेल यासाठी हा लेख इथे देत आहे. मी फक्त या ठिकाणी वाहक आहे. लेखातील मुद्द्यांविषयी वा शंका /कुशंका /माहिती साठी थेट लेखिकेशी संपर्क करावा. manjiri[dot]ghatpande[at]gmail[dot]com
काही बाबतीत मी दुवा म्हणुन काम करु शकेन
-------------------------------------------------------------------------------
पुण्यात एक जागा कमर्शियल वापरासाठी आणि एक जागा रेसिडेन्शियल वापरासाठी भाड्याने द्यायची आहे. भाडेतत्वावर जागा देताना त्यात कायदेशीर बाबींची तरतूद कशी करावी, ह्यावर मार्गदर्शन हवे आहे.
इस्टेट एजंट rental agreement तयार करून देणार आहेच.
पण त्याच बरोबर कोणा वकीलाची अथवा कायदा सल्लागाराची मदत घ्यावी असेही वाटत आहे.
पुण्यामधे अशी मदत कुठे मिळु शकेल? (मायबोलीकरांमधे असे कोणी सल्लागार असतील तर त्यांची मदत घेण्याची इच्छा आहे.)
अश्या agreement चा सर्वसाधारण मसुदा काय असतो? आणि कुठले मुद्दे त्यामधे असणे गरजेचे आहे?