प्रत्येकाला आपले एक घर हवे असते. अशावेळी बरेचदा काही गोष्टी आपल्या मनात घर करून बसतात, आपल्या होणार्या घरासाठी... कधी काही आवडले म्हणून तर कधी कसली कमतरता जाणवली म्हणून.. मोठ्या मोठ्या गोष्टी आपण साग्रसंगीत करूच पण त्या छोट्या छोट्या कल्पनांची यादी करण्यासाठी हा धागा.. कारणांसकट .....
जसे
१- बेडरूमच्या दिव्यांची बटणे पलंगाच्या दोन्ही बाजूला व दाराजवळ पाहीजेत. दिवे कोणी मालवावे यावर वाद नको. रिमोटवर चालणारे दिवे ही नकोत कारण कोणताही रिमोट जाग्यावर मिळत नाही.
२- न्हाणीघराचे दरवाजे फायबरचे असावेत. पाण्याने खराब न होण्याचा फायदा आहेच, पण आतले दिवे मालवायचे विसरल्यास लगेच कळते.
टॉप फ्लोअर वरील फ्लॅटला काय समस्या येऊ शकतात? मला एका प्रकल्पातील टॉप फ्लोअर वरच्या फ्लॅटची ऑफर आहे, काम अजून सुरू आहे, त्यामुळे काही बदल करुन घ्यायचे असल्यास ते करुन घेता येतील. एकूण बिल्डिंग सात मजल्याची आहे आणि माझा फ्लॅट सातव्या मजल्यावर आहे.
१ ) उष्णता
समस्या : सर्वात वर असल्यामुळे सूर्यनारायणाचा प्रसाद मुबलक मिळेल आणि भट्टी होईल.
उपाय : POP करून घेता येईल तसेच बिल्डरच्या म्हणन्यानुसार टेरेसवर जाड प्लास्टर/लेवलिंग होइल जेणे करुन त्रास थोडा कमी होईल. AC लावावा लागेल?
२) पाण्याची गळती
माझ्या एका मैत्रिणीला तिच्या जमिनीचा ८अ उतारा पाहिजे - गाव - धामणी तालुका - आंबेगाव , गट number - १००१, १०१२. इंटरनेट वरून कसा शोधायचा?
दोन दिवसांपुर्वी बिल्डरकडून आमच्या सोसायटीतील सर्वांना एक नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यात एप्रिल २००६ ते एप्रिल २०१० मध्ये घर घेतलेल्यांना व्हॅटची अमाऊंट + १५% व्याज दरवर्षी याप्रमाणे देण्याची सूचना आहे. त्यानुसार सोसायटीची मिटींग झाली. पण ती व्हॅट ची रक्कम एक्झॅक्टली कशी कॅल्यूलेट करतात ते माहीती नाही.
माझ्या माहीतीप्रमाणे अॅग्रीमेंट व्हॅल्यूच्या १% इतकी ती असते. कुणी म्हणतं की ०.५% आहे तर काल आमच्याच सोसायटीतल्या एका जोडप्याने मला ती रक्कम ५% सांगितली.
नमस्कार मायबोलीकरांनो,
जुन्या लँड विक्रीतुन काही गेन झाला असल्यास त्यातून दोन घरे घेता येऊ शकतात का? कुणी जानकार आहेत का इथे? टॅक्स अव्हॉइड करण्यासाठी काही मार्ग सुचवु शकता का?
दोन-तीन सी एं ची मतं घेतल्यामुळे थोडे कन्फुजन आहे.
रिडेव्हलपमेंट अर्थात पुनर्विकास! पण हा पुनर्विकास माझ्या घराचा नाही. माझी आई ठाण्याच्या वर्तक नगरला ज्या इमारतीमधे रहाते त्या इमारतीच्या पुनर्विकास प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. ती इमारत आता नाहीशी होऊन त्याजागी २२ मजल्यांची टोलेजंग इमारत उभी रहाणार आहे म्हटल्यावर आधी मनात प्रचंड निराशा दाटून आली. निर्जिव भिंतींमधूनसुद्धा जाणवारा मायेचा तो स्पर्श आता अवघी दोन एक वर्षेच सोबत रहाणार होता. पण नंतर आनंदही वाटला की आईला, भावाला रहाण्याकरिता एक नवीन छानसं घर, आहे त्याच जागी, विशेष कष्ट न करता मिळणार आहे.
परदेशातल्या व देशातल्या घरांमधे एक मोठा फरक जाणवतो तो म्हणजे धुळीचा व स्वच्छतेचा.
परदेशात खुप कमी श्रमात घर स्वच्छ ठेवता येते पण भारतात रोजचं डस्टिन्ग निदान दोनदा तरी करावं लागतं. पण दोन्ही ठिकाणी जर right tools and products माहीती असतील तर काम खुप सोप्पं होतं.
काही बाफं वर सिंक व बाथरूम किंवा भांडी कशी स्वच्छ ठेवावीत हे प्रश्नं पाहिले म्हणून हा घराच्या स्वच्छतेचा (सगळ्याच प्रकारच्या) धागा उघडलाय.
बरेच वेळा काही जणांना जे products किंवा पद्धती अगदी बेसिक वाटतील त्या बकिच्यान्ना माहिती पण नसतील त्यामुळे जे काय माहिती असेल, बेसिक किंव्हा रीसर्च केलेले ते सगळे लिहावे, ज्याने अनेकांना
वास्तुशास्त्राविषयी चर्चा व प्रश्नोत्तरे यांची देवाण-घेवाण करण्यासाठी हा धागा उघडत आहे. इंटीरीअरच्या धाग्यावर मला या संदर्भात असलेले प्रश्न मी विचारले होते. पण कुणीच शंकानिरसन न केल्याने हा स्वतंत्र धागा बनवत आहे. कुणाचा या शास्त्राचा अभ्यास असेल तर कृपया मार्गदर्शन करावे. ज्यांना या विषयाबद्दल उत्सुकता आहे, कुतूहल आहे, अनुभव गाठीशी आहे अश्यांनी इथे माहिती व प्रश्न शेअर करावे.
मला मुंबईमध्ये घराच्या भाड्याबद्दल / भाड्याच्या घराबद्दल माहिती हवी होती.
माझे २ दीर सध्या बोरिवली (इ) ला रहात आहेत. दोघेही अंधेरीला मरोळ नाक्याजवळ नोकरी करतात. त्यातल्या एका दीराचे पुढच्या महिन्यात लग्न आहे, त्यामूळे ते दोघे सध्या नव्या मोठ्ठ्या (२ बीएचके) जागेच्या शोधात आहेत.
त्यांच्या नोकरीच्या जागेच्या आसपास घर भाड्याने घ्यायचे असल्यास किती भाडे असेल? किती दूर गेल्यास भाडे किती प्रमाणात कमी होईल (म्हणजे पवई च्या आसपास किती, अंधेरी (इ) /(वे) ला किती इ.इ.) अशी साधारण माहिती मिळेल का?
या माहितीच्या आधारे घरशोध मोहिम सुरु करायला सोपे पडेल.