Submitted by निंबुडा on 1 November, 2012 - 02:45
माझ्या एका मैत्रिणीला तिच्या जमिनीचा ८अ उतारा पाहिजे - गाव - धामणी तालुका - आंबेगाव , गट number - १००१, १०१२. इंटरनेट वरून कसा शोधायचा?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बर्याच घोषणा झाल्या. माझ्या
बर्याच घोषणा झाल्या. माझ्या मते इंटरनेटवर असा पर्याय नाही.
म्हणजे तलाठ्याकडेच जावे लागेल
म्हणजे तलाठ्याकडेच जावे लागेल काय?
हो निंबुडा नाही मिळत online
हो निंबुडा नाही मिळत online
७/१२ उतारा मिळत असे.. ८ अ नव्हताच मिळत.
म्हणजे तलाठ्याकडेच जावे लागेल
म्हणजे तलाठ्याकडेच जावे लागेल काय? बहुतेक
पाच मिनीटात माहित गाराला विचारुन कळवतो.
निंबुडा ही माहिती नेट वर
निंबुडा
ही माहिती नेट वर नाही. तलाठीच मदत करु शकेल. कारण आपल्या कडे ह्या ८अ, ७/१२ चे रेकॉर्ड खुप किचकट आहेत. त्यामुळे त्याचे नेटीकरण अजुन तरी झालेले नाही.
८अ मधे एका व्यक्तिच्या नावावर
८अ मधे एका व्यक्तिच्या नावावर असलेले सगळे गट नं येतात. थोडक्यात ती एक खातेवहीच आहे. ८अ ऑनलाईन मिळणार नाही.
आपल्या नावावर एकूण कोणकोणत्या गटातील किती जमीन आहे हे दर्शविणारा गांव दप्तरातील नमुना म्हणजे 8अ चा उतारा होय. जमीन जर खरेदीची असेल तर, खरेदी तारखेनंतर घेतलेला 8अ चा उतारा फाईलला लावावा तसेच दरवर्षी शेतसारा भरल्यानंतर 8अ चा उतारा फाईलला लावावा. जमीन जर वडीलोपार्जित चालत असलेली असेल तर वडील हयात असतांना त्यांच्या नावावर एकूण किती जमीन होती व आजरोजी आपल्या नावावर किती जमीन आहे हे दाखविणारे दोन्ही 8अ चे उतारे प्राप्त करुन घेऊन फाईलला लावले पाहिजेत.
पाच मिनीटात माहित गाराला
पाच मिनीटात माहित गाराला विचारुन कळवतो.
>>>
धन्स, नितीन. लवकर कळवा.
त्यामुळे त्याचे नेटीकरण अजुन
त्यामुळे त्याचे नेटीकरण अजुन तरी झालेले नाही.>>नाही मीरा हे ७/१२ पूर्वी बघता यायचे. आता बंद
७/१२ आणि ८ अ एकच की दोन्ही
७/१२ आणि ८ अ एकच की दोन्ही वेगवेगळे?? सॉरी मी ह्या विषयात अज्ञ आहे.
जर त्या तालुक्यात
जर त्या तालुक्यात संगणीकीकरण झाले असेल तर खालील लिन्क पहा. सिन्धुदुर्ग चे झाले आहे. तालुका/ गाव निवडायचा.गट नं .द्यायचा.
www.mahabhulekh.maharashtra.gov.in
दोन्ही वेगवेगळे.
दोन्ही वेगवेगळे.
जर त्या तालुक्यात संगणीकीकरण
जर त्या तालुक्यात संगणीकीकरण झाले असेल तर खालील लिन्क पहा. सिन्धुदुर्ग चे झाले आहे. तालुका/ गाव निवडायचा.गट नं .द्यायचा.
www.mahabhulekh.maharashtra.gov.in>>> + १
ही साईट बरिचशी अपडेट आहे. मात्र नविन व्यवहार येथे यायला जरा अवधी लागतो.
८अ फक्त तलाठ्याकडेच मिळू
८अ फक्त तलाठ्याकडेच मिळू शकेल. ऑनलाईन मिळत नाही.
www.mahabhulekh.maharashtra.g
www.mahabhulekh.maharashtra.gov.in ही साईट फालतु आहे. तलाठी ऑफिस मधे जाणे, श्रेयस्कर ....
७/१२ आणि ८ अ एकच की दोन्ही
७/१२ आणि ८ अ एकच की दोन्ही वेगवेगळे?? सॉरी मी ह्या विषयात अज्ञ आहे.
<<<<<<<<
७/१२ आणि ८अ वेगवेगळे आहेत.
संपूर्ण महाराष्ट्र राज्यात गावांतील महसूली माहिती ही, गांव नमुना क्र.१ ते २१ या नमुन्यांमध्ये ठेवली जाते. त्यातील ७ नंबरचा नमुना मालकीहक्काबाबतचा आहे तर १२ नंबरचा नमुना पिकासंबंधीचा आहे. या दोन्हींचा मिळून ७/१२ चा नमुना प्रस्तावित करण्यांत आला आहे.
८अ फक्त तलाठ्याकडेच मिळू शकेल. ऑनलाईन मिळत नाही.
+१
धन्यवाद लोक्स... मैत्रिण
धन्यवाद लोक्स...
मैत्रिण स्तिमितच झालीये इतक्या पटापट प्रतिसाद येताहेत हे पाहून! काही जण साईट वर मिळेल म्हणतायत तर काही म्हणताहेत नाही!
असो, मी मैत्रिणीला त्या साईटवर चेक करायला सांगते. काम जरा अर्जंट आहे आणि तलाठी जागेवर नाहीये म्हणून नेटवरून झटपट काम होईल का ते पहायचे होते, असे तिचे म्हणणे आहे.
मुग्धानंद +१११११
मुग्धानंद +१११११
निंबुडातै आमच्या आंबेगाव
निंबुडातै आमच्या आंबेगाव तालुक्याचं महसूल रेकॉर्ड अजून तरी संगणकीकृत झालेले नाही.
त्यामुळे तलाठी किंवा मंडलाधिकारी याच्याकडून ८अ योग्य तो मोबदला देऊन मिळविणे हे श्रेयस्कर.
बर्याच घोषणा झाल्या. माझ्या
बर्याच घोषणा झाल्या. माझ्या मते इंटरनेटवर असा पर्याय नाही.
माझ वरील मत आज दोन महिन्यांनी बदलतो. www.mahabhulekh.maharashtra.gov.in ह्या साईटवर मला रत्नागिरी जिल्ह्यातील माझ्या वडीलांच्या नावाने असलेला ७/१२ बघता आला. प्रिंट घेता आली.
फक्त रत्नागिरी जिल्ह्यात नावाने ७/१२ शोधता येतो. अन्यत्र सर्व्हे नंबर शिवाय पहाता येत नाही. पुणे जिल्ह्यात तर सर्व्हे नंबरवर जमिनीचे स्वरुप दिसते पण मालकांची नावे दिसत नाहीत.