मुंबईमध्ये घर भाड्याने मिळण्यासंबंधी

Submitted by अल्पना on 4 January, 2011 - 05:56

मला मुंबईमध्ये घराच्या भाड्याबद्दल / भाड्याच्या घराबद्दल माहिती हवी होती.
माझे २ दीर सध्या बोरिवली (इ) ला रहात आहेत. दोघेही अंधेरीला मरोळ नाक्याजवळ नोकरी करतात. त्यातल्या एका दीराचे पुढच्या महिन्यात लग्न आहे, त्यामूळे ते दोघे सध्या नव्या मोठ्ठ्या (२ बीएचके) जागेच्या शोधात आहेत.
त्यांच्या नोकरीच्या जागेच्या आसपास घर भाड्याने घ्यायचे असल्यास किती भाडे असेल? किती दूर गेल्यास भाडे किती प्रमाणात कमी होईल (म्हणजे पवई च्या आसपास किती, अंधेरी (इ) /(वे) ला किती इ.इ.) अशी साधारण माहिती मिळेल का?
या माहितीच्या आधारे घरशोध मोहिम सुरु करायला सोपे पडेल.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बोरीवलीहून चर्चगेटच्या दिशेने जसजशी पुढे येशील तसं चढ्या दरात भाडं पडेल आणि विरारच्या दिशेने मागे जाशील तसं भाडं कमी होत जाईल. Happy

थोडक्यात, बोरीवलीपेक्षा अंधेरीला जास्त भाडं आहे, जागा मोठी असेल तर त्याप्रमाणात भाडं वाढेल, पवईला तर अजूनच जास्त भाडं पडेल.

आधी आपलं बजेट सांगा. (हे लई म्हत्वाचं मुंबैत)
त्यावरूनही लोकेशन ठरवता येईल.
एजंट लोकांचे (त्या त्या एरीया नुसार) नंबर देऊ शकेन.
किंवा
http://www.bharathrentals.com/browse/all/all/Mumbai/all
ही लिंक फार उपयोगी पडेल. Happy

असंच नुसतं नाहीये. अंधेरी लोखंडवाला, यारी रोड/ वर्सोवा, गोरेगाव आरे कॉलनीच्या जवळचा काही भाग या ठिकाणी पार्ल्याइतकीच भाडी आहेत.
मरोळ भागाच्या जवळपास रेसिडेन्शियल बघायचं तर १ बीएचके साधारण २५ च्या आसपास सुरू होतात. २ बीएचके साधारण ३०-३५ पासून पुढे. (यात जुनं/ नवं, लिफ्ट, इतर अ‍ॅमेनिटीज, पार्कींग अश्या सगळ्यावर कमी जास्त होतं. स्क्वेअरफुटाचा हिशोब धरला जातोच असं नाही.)
१ बीएचके साठी साधारण १-३ लाख डिपॉझिट जातं जनरली तर २ बीएचके साठी २-५ ही रेंज आहे.
अंधेरी-पार्ला इस्ट भागासाठी साधारण ही रेंज आहे.

मी डोंबीवलीला राहून मरोळला १ वर्ष नोकरी केलेली आहे... या भागात नोकरी करत असल्यास ऑड ड्युटी घ्यावी.. माझी ड्युटी १२-९ अशी होती... त्यामुळे १०:१५ ला डोंबिवलीतून निघाले तरी चालायचे. कांजुरमार्गवरुन पवई मार्गे बसने जायचे . ( घाटकोपरला गर्दी फार असते म्हणून मी असे जाय्चो. ) असे जमत असल्यास डोंबिवली - ठाणे चांगले होईल... ५-६ हजार मध्ये १ बी एच के डोंबीवलीत मिळून जाईल. सध्या ठाण्यात १ आर के ६-७ हजारला जाते.

दुसरा एक पर्याय आहे.. सायन स्टेशन/ चुनाभट्टी इथे १ आर के ७-८ पर्यंत मिळू शकेल.. १ बी एच के ची कल्पना नाही.. तिथून २२ नंबर बस सायन स्टेशनजवळ मिळेल, ती मरोळपर्यंत जाते.. संध्याकाळी येताना मरोळ डेपोतूनच बस पकडायला मिळाली तर आरामात बसून येता येईल. आणखी एक ३७६ की कुठली तरी बस आहे.. नंबरची खात्री करुन घ्यावी..

०२२ २८८८८८८८ या नंबरला फोन करा. त्याना सांगा अमूक एक एरियात भाड्याने ( किंवा ओनरशिपने) जागा हवी आहे.. ते स्वतः एजंटला तुमचा कॉल जोडून देतील.. शिवाय इतर एजंटही तुम्हाला संपर्क करतील... तुम्हीही एस एम एस नुसार इतराना संपर्क करु शकाल..
ठाण्याहूनच आमचे मित्र याच कंपनीत यायचे.. ठाण्याच्या ग्रुपची स्पेशल बसही असते. ठाणे- मरोळ डेपो अशी..

वेस्टर्न लाइनची कल्पना नाही...

अल्पना, माझी बहिण मरोल मरोशीला रहात होती. तीथे १ बीएचके १५,०००/- व डिपॉझीट ५०,०००/- होते. सोसायटी बर्‍यपैकी जुनी होती. लिफ्ट नवती. मेन रोड जवळच घर होते.
सध्या तीच्या मैत्रीणी पवईच्या इथे रहात आहेत. त्या १ बीएचके साठी १५,०००/- व डिपॉझीट ६०,०००/- देत आहेत. पवई आयआयटी जवळ घर आहे. अजुन काही माहिती हवी असेल तर सांग.

नी, स्वाती, मयुरेश, मामी, मनस्मी, जामोप्या, मंजूडी सगळ्यांना खूप धन्यवाद. मला मुंबई सोडून ४ वर्षे झाल्याने आत्ताच्या रेट्स चा अंदाज नव्हता, तो वर दिलेल्या माहितीवरून आला.

या दोघा दिरांना अजूनही दिल्लीच्या लाइफस्टाइलची सवय आहे, त्यामूळे मोठ्ठं घर अन अश्या बर्‍याच गोष्टी डोक्यात आहेत. अर्थातच तितक्या प्रमाणात पेइंग कॅपेसिटी नाहीच. या सगळ्या साईट्सवरून आणि वर दिलेल्या अंदाजावरून त्यांना फीडबॅक दिलंय.

१ बीएचके घ्यायला हरकत नाही हेही पटवतेय. तसंही सध्याच्या रहात्या घराचं भाड जूनपर्यंत भरलेलं असल्याने ते सोडता येणार नाहीच. त्यामूळे १ बीएचके घेवून नव्या जोडप्याने रहावं आणि जुननंतर दुसर्‍या दिराने त्यांच्या घरी रहायला जावं असा पर्याय दिलाय. बहूतेक तो अ‍ॅक्सेप्ट होईल.