Submitted by सख्या on 17 January, 2012 - 12:43
नमस्कार मायबोलीकरांनो,
जुन्या लँड विक्रीतुन काही गेन झाला असल्यास त्यातून दोन घरे घेता येऊ शकतात का? कुणी जानकार आहेत का इथे? टॅक्स अव्हॉइड करण्यासाठी काही मार्ग सुचवु शकता का?
दोन-तीन सी एं ची मतं घेतल्यामुळे थोडे कन्फुजन आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जुन्या घराच्या/जागेच्या
जुन्या घराच्या/जागेच्या विक्रीतून नफा झाल्यास खालील मार्ग आहेत.
(१) घेतल्यापासून ३ वर्षांच्या आत विक्री केल्यास अल्प मुदतीचा कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो.
(२) ३ वर्षांनंतर विकल्यास तो नफा दीर्घ मुदतीचा कॅपिटल गेन धरतात. त्यासाठी खालील तरतुदी आहेत.
(अ) गेन वर एकदाच २० टक्के टॅक्स भरणे.
(ब) जेवढा गेन झाला आहे, तेवढ्या किंमतीचे सरकारचे कॅपिटल गेन टॅक्स सेव्हर बाँड घेणे. हे ३ वर्षे मुदतीचे असतात व त्यावर ६-७ टक्के करपात्र व्याज मिळते. पण मूळच्या कॅपिटल गेन वर कर भरावा लागत नाही.
(क) जेवढा गेन झाला आहे, कमीतकमी तेवढ्या किंमतीचे नवीन घर घेणे. त्यासाठी आधीचे घर विकल्यापासून ६ महिन्यांच्या आत एखाद्या मोठ्या बँकेत एक वेगळे खाते उघडावे लागते (बँकेत या विशिष्ट खात्याविषयी माहिती मिळेल). त्या खात्यात कॅपिटल गेन जमा करून आधीचे घर विकल्याच्या तारखेपासून ३ वर्षांच्या आत नवीन घर घ्यावे लागते. यामुळे मूळ कॅपिटल गेन वर कर भरावा लागत नाही.
कॅपिटल गेन मधून एकापेक्षा अधिक घरे घेता येतात का नाही याची कल्पना नाही. पण जेवढा कॅपिटल गेन झाला आहे, कमीतकमी तेवढ्या किंमतीचे घर घ्यावे लागते हे नक्की.
चांगली माहिती
चांगली माहिती आहे..
घेतल्यापासून ३ वर्षांच्या आत विक्री केल्यास अल्प मुदतीचा कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो. >> ही ३ वर्षे कधीपासून धरतात? अग्रीमेंट नंतर ३ वर्षे का पझेशन नंतर ३ वर्षे? तसेच हे पैसे दुसर्या जागेचे कर्ज फेडण्यास (आधीच घेतलेल्या) वापरल्यास कॅपिटल गेन्स टॅक्स वाचवता येतो का?
>>> ही ३ वर्षे कधीपासून
>>> ही ३ वर्षे कधीपासून धरतात? अग्रीमेंट नंतर ३ वर्षे का पझेशन नंतर ३ वर्षे?
बांधकाम पूर्ण होऊन पूर्णत्वाचा दाखला व भोगवटा पत्र मिळाल्यावर रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये जाऊन जागेचे कन्व्हेन्स डीड रजिस्टर करावे लागते. त्या दिवसापासून ही ३ वर्षे मोजली जातात.
>>> तसेच हे पैसे दुसर्या जागेचे कर्ज फेडण्यास (आधीच घेतलेल्या) वापरल्यास कॅपिटल गेन्स टॅक्स वाचवता येतो का?
नाही
मास्तुरे धन्यवाद. मला दोन घरे
मास्तुरे धन्यवाद.
मला दोन घरे घ्यायची आहेत त्यासंदर्भातच कन्फुजन आहे नेमके. ऑनलाइन माहीती मिळवायचा प्रयत्न केला पण तेही अजुन कन्फ्युजींग आहे
दोन घरे, कॅपिटल गेन टॅक्स इ.
दोन घरे, कॅपिटल गेन टॅक्स इ. विषयी तुम्ही एखाद्या चांगल्या सीए चा सल्ला घ्या.
वर लिहिलय की! क्न्फ्युजिंग
वर लिहिलय की! क्न्फ्युजिंग आहे. तरी पन विचारीन धन्यवाद,
सख्याजी. आपला प्रश्ण चांगला
सख्याजी.
आपला प्रश्ण चांगला आहे. कायद्याप्रमाणे फक्त १ घर घेता येते. कारण अॅक्ट मध्ये प्रत्येक ठिकाणी " “by investing in new house property” असे म्हंटलेले आहे. properties म्हंटलेले नाही. तसेच असेही म्हंटलेले आहे की "if the cost of the new house is less than the net consideration in respect of the old asset, the proportionate capital gain is not taxed. "
ह्यावरुन हेच सिध्ध होते की एकच घर घेता येइल. तुम्ही एक घर घेवुन बाकीचे पैसे ३ वर्षा करीता बाँड मध्ये ठेवु शकता. बाँडची मुदत संपल्या वर ते मॅचुअर करुन त्यातुन दुसरे घर घेवु शकता. पण दोन घरे एकदम घेतलीत तर पंचाइत होइल. आजकाल रजिश्ट्रेशन ऑफिस मोठ्या व्यवहारांवर नजर ठेवुन असते.
वर म्हंटल्या प्रमाणे "बांधकाम पूर्ण होऊन पूर्णत्वाचा दाखला व भोगवटा पत्र मिळाल्यावर रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये जाऊन जागेचे कन्व्हेन्स डीड रजिस्टर करावे लागते. त्या दिवसापासून ही ३ वर्षे मोजली जातात.">>>>>
आज काल मुंबई पुण्यात अशा अनेक इमारती आहेत की ज्यांचे कन्व्हेन्स डीड झालेले नाही. बहुतेकदा अती स्टॅम्प डुटी हे त्याचे कारण आहे. तसेच बहुतांश बिल्डर त्यात सहकार्य करत नाहीत. त्यामुळे पझेशन व ओ.सी. हे निकश पुरेसे आहेत. ( ह्या वर केस लॉ पण आहेत. संदर्भ मिळाला तर इथे घालीन. ) त्यातुन सोसायटी झाली तर मग सोन्याहुन पिवळे.
अनेकदा हाउसींग लोन वरील कर सवलत सुध्धा बांधकाम चालु असताना लोक क्लेम करतात. खरेतर हे चुकीचे आहे. त्या करीता पझेशन व ओ.सी. हे निकश गरजेचे आहेत.
मी ९२ साली प्लॉट १५ रु
मी ९२ साली प्लॉट १५ रु प्रमाणे विकत घेतला होता आणि आता तो ८०० प्रमाणे विकते आहे. कॅपिटल किती लागेल? प्लॉटच विकत घ्यावा लागतो अथवा फ्लॅट विकत घेतला तर चालतो का?
सख्या, मी कंपनी सेक्रेटरी आणि
सख्या,
मी कंपनी सेक्रेटरी आणि करसल्लगार असून कॅपिटल गेन या विषयावर माझा बर्यापैकी अभ्यास आहे. दोन तीन चार्टर्ड अकौंटंट्नी वेगवेगळे सल्ले दिले असल्यास नवल नाही, कारण कायद्याची स्थिती सुस्पष्ट नाही. कायदा म्हणतो, संपूर्ण मिळालेली संपूर्ण रक्कम घरात गुंतवली असेल तर दीर्घकालीन भांडवली नफा माफ होतो: आणि कमी गुंतवली असेल तर त्या प्रमाणात कमी माफ होतो. मात्र त्यावेळी करदात्याच्या नावावर एकापेक्षा जास्त घरे असता कामा नये. म्हणजे एक घर अगोदरच असेल तर दुसर्या घरात सुद्धा रक्कम गुंतवता येते. याचा दुसरा अर्थ असा काढता येतो की, जर एकसुद्धा घर करदात्याच्या नावे नसेल तर दोन घरात पैसे गुंतवता येतील. भांडवली नफ्याचे पैसे घरामध्ये गुंतवण्याच्या बाबतीत न्यायालयांनी साधारणतः करदात्याच्या बाजूने निर्णय दिलेले आढळतात. संपूर्ण फॅक्ट्स माहीत नसल्याने सध्या मी इतकेच सांगू शकतो. पुण्यात असाल तर कधी ऑफिसला भेट दिल्यास सविस्तर चर्चा करता येईल.
मंजू,
<< प्लॉटच विकत घ्यावा लागतो अथवा फ्लॅट विकत घेतला तर चालतो का? >> फ्लॅट्च घ्यावा लागेल. प्लॉट घेतलाच तर त्यावर तीन वर्षाच्या आत घर बांधून पूर्ण करावे लागेल.
सख्या ना पडलेला प्रश्न वेगळाच
सख्या ना पडलेला प्रश्न वेगळाच आणि चांगला होता. मोकिमी तुझं उत्तरही चांगल आणि माहिती भर घालणार:)
शरद उत्तम माहिती
ठाणे जि. डीफसी रेल्वे साठी
ठाणे जि. डीफसी रेल्वे साठी जमीन कंपल्सरी अॅक्वीझीन अॅक्ट खाली घेउन दहा टक्के टीडीएस कापुन आता कॅपीटल गेन भरा म्हणतायत
<<दहा टक्के टीडीएस कापुन आता
<<दहा टक्के टीडीएस कापुन आता कॅपीटल गेन भरा म्हणतायत>> तारीख महत्वाची आहे. कॅपिटल गेन टॅक्स काढून त्यातून टी.डी.एस. वजा करून उरलेली रक्कम कर म्हणून आजच भरावी लागेल. नाहीतर कराच्या रक्कमेवर कमीत कमी ३ टक्के व्याज लागेल. अर्थात कर (आणि व्याज) वाचवण्याचे इतर उपाय (कॅपिटल गेन बॉण्ड्ज, घरात गुंतवणूक वगैरे) सुद्धा आहेतच. अन्य काही शंका असल्यास scpcs2011@gmail.com वर इमेल किंवा ०८८०५१५२९५१ वर फोन जरूर करा.
एक प्रश्न समजा माझ्याकडे आधी
एक प्रश्न
समजा माझ्याकडे आधी एक फ्लॅट आहे (य जागी) मी अजुन दुसरा एक फ्लॅट घेतला (र जागी).
आता मी य जागेचा फ्लॅट विकला तर ते आलेले पैसे मी र जागेच्या फ्लॅटचे कर्ज फेडण्यास करु शकतो का ?
य आणी र हे वेगवेगळ्या राज्यात आहेत.
जेम्स बॉण्ड, तारखा
जेम्स बॉण्ड,
तारखा महत्वाच्या! हायपोथेटिकल प्रश्न नकोत.
जेम्स बाँड, मला वाटते,
जेम्स बाँड,
मला वाटते, तुमच्या प्रश्नाचे उत्तर इथे आधीच आलेले आहे,
तुम्हाला झालेला कॅपिटल गेन वगळता उर्वरीत रक्कम तुम्ही तुमच्या सोयीनुसार वापरु शकणार आहात, त्यात कर्ज फेडणे ही आलेच! चु भु दे घे.
नेत्रा, त्यांचा प्रश्न खूपच
नेत्रा,
त्यांचा प्रश्न खूपच ढोबळ आहे. त्यामुळे कुठलेही उत्तर बरोबर किंवा चूक असू शकेल. जर दोन्ही फ्लॅट्चे व्यवहार एक वर्षा अगोदर झाले असतील; तर कुठलीच रक्कम करमुक्त होणार नाही. म्हणून मी म्हणत होतो की तारखा महत्वाच्या आहेत. पण त्यांना फक्त जनरल नॉलेज वाढवायचे आहे असे दिसते. नाहीतर त्यांनी तारखा सांगितल्या असत्या.
एक प्रश्न. २०१५ डिसेंबरमधे मी
एक प्रश्न.
२०१५ डिसेंबरमधे मी एक फ्लॅट घेतलाय. आणि ह्या महिन्यात मी एक एन ए प्लॉट विकलाय. आता प्लॉटची मिळालेली किंमत टॅक्सेबल असते कि नसते?
मेधाव्ही तुम्हाला डिसेम्बर
मेधाव्ही तुम्हाला डिसेम्बर २०१४ म्हणायचे आहे का ?
एन ए प्लॉट घेतल्याची तारिख सान्गितल्यास ऊत्तर देऊ शकतिल
हो हो..डिसेंबर २०१४. वर
हो हो..डिसेंबर २०१४. वर चुकीचे लिहिले गेले.
प्लॉट ९० साली घेतला होता.
उपयुक्त उत्तरे.
उपयुक्त उत्तरे.
कॅपिटल गेन टॅक्स वाचवण्यासाठी
कॅपिटल गेन टॅक्स वाचवण्यासाठी कॅपिटल गेन बॉण्ड्स मधे गुंतवणूक करतात असे वाचले. मग त्या बॉण्डचे मिळणारे व्याज हे टॅक्स फ्री असते का? तसेच मुद्त संपल्यावर मिळणारे मुद्दल हे त्या वर्षाचे इन्कम म्हणून पकडतात का?
एखाद्या घराचे भाड्यापासून मिळणारे उत्पन्न हे त्या घराच्या किंमतीच्या हिशोबाने जर २.५ % परतावा देणारे असेल तर त्या पेक्षा टॅक्स फ्री बॉन्डस मधे गुंतवणुक केलेली चांगली नाही काय? मुद्दा राहतो ते घराच्या किंमतीचे अॅप्रिसिएशन होउ शकते इथे मुद्दलाचे होउ शकत नाही.
माझ्या एका घराचे ५ पट अॅप्रिसिएशन झाले आहे. आता पुढे तितके होण्याची शक्यता फार कमी आहे. आताच्या किंमतीच्या हिशोबाने मिळणारे भाडे फार कमी आहे. तसेच दुरुस्ती देखभाल व कार्पोरेशन टॅक्स चा हिशोब करता मिळणारे उत्पन्न २.५ टक्के आहे. घर जुने होत चालल्याने आता खर्च ही वाढतो आहे. अशा केस मधे मी काय करणे सोयीचे आहे? तज्ञांनी मार्गदर्शन करावे.
व्याज टॅक्स फ्री नसते. तीन
व्याज टॅक्स फ्री नसते.
तीन वर्षानंतर मुद्दल टॅक्स फ्री होते. मात्र एकूण गुंतवणूक रु. ५० लाख पर्यंतच करता येते.