Submitted by निंबुडा on 20 May, 2011 - 06:50
वास्तुशास्त्राविषयी चर्चा व प्रश्नोत्तरे यांची देवाण-घेवाण करण्यासाठी हा धागा उघडत आहे. इंटीरीअरच्या धाग्यावर मला या संदर्भात असलेले प्रश्न मी विचारले होते. पण कुणीच शंकानिरसन न केल्याने हा स्वतंत्र धागा बनवत आहे. कुणाचा या शास्त्राचा अभ्यास असेल तर कृपया मार्गदर्शन करावे. ज्यांना या विषयाबद्दल उत्सुकता आहे, कुतूहल आहे, अनुभव गाठीशी आहे अश्यांनी इथे माहिती व प्रश्न शेअर करावे.
शिवाय वास्तुशास्त्र खरे कि खोटे, या शास्त्राच्या वाटेला जाणे योग्य कि अयोग्य, वाटेला गेलेल्यांनी घेतलेले बरे - वाईट अनुभवही इथेच शेअर करायला हरकत नाही.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वास्तुशास्त्र या
वास्तुशास्त्र या शास्त्राविषयी भविष्य/ज्योतिष या शास्त्राबाबतीत असतात तशीच मत-मतांतरे आहेत. त्यातही हिंदू, चायनीज (फेंगशुई) इ. प्रकार आहेत.
होम इंटीरीअर करताना/ नवीन वास्तु (प्लॉट वा फ्लॅट) विकत घेताना वास्तुशास्त्र कन्सल्टंट चा सल्ला कुणी घेतला आहे का? असल्यास आलेले अनुभव (फायदा/तोटा) इथे शेअर करणार का प्लीज?
वास्तु संबंधित दिशांचे बेसिक नॉलेज कुणाला असल्यास इथे शेअर करणार का प्लीज? जसे की आग्नेय वा दक्षिण दिशा ही अग्नीची मानली जाते. त्यामुळे त्या दिशेला शेगडी किंवा लाल्/पिवळ्या/नारिंगी रंगाचे फूल असलेली फोटो फ्रेम इ. ठेवावी. उत्तर ही कुबेराची दिशा असल्याने त्या दिशेला टॉयलेटचे ड्रेनेज असू नये. (घरातला पैसाही ड्रेन होतो. याचा अनुभव एका स्नेह्याला आलेला आहे. घर घेतल्या घेतल्या ४ महिन्यांच्या आत शेअर्स मध्ये १८ लाखांचे नुकसान, घरातल्या व्यक्तींची आजारपणे, hospitalisations अशा मार्गाने पैसे जात राहिले. )
जनरली घरांची रचना पूर्व-पश्चिम-उत्तर-दक्षिण अशा मुख्य दिशांना धरून असते. पण जेव्हा घराची रचना आग्नेय-नैऋत्य-वायव्य-ईशान्य अशी असते तेव्हा ओटा, बेडवर झोपण्याची दिशा इ. साठी कसा विचार करावा??
मुंबई मधील चांगल्या वास्तुशास्त्र कन्सल्टंट चा पत्ता, नं इ. इथे शेअर करू शकेल का कुणी?
मला ह्या बाबत अधिक माहिती
मला ह्या बाबत अधिक माहिती वाचायला आवडेल. शक्य असेल तेंव्हा भर देखील घालीन... चांगला धागा..
धन्यवाद निंबुडा.....सध्या
धन्यवाद निंबुडा.....सध्या नविन जागेच्या शोधात आहे .... येक माबोकरीन आहे तिने मला मदत केली होती....ती नक्कि खुप माहीती देउ शकते......ती सध्या सुट्टीवर आहे आल्यावर तिला request करतो.....
निंबुडे हे वाच...
निंबुडे हे वाच... http://www.maayboli.com/node/12114?page=1
ईंद्रा, भलतीच विनोदी लिंक आहे
ईंद्रा, भलतीच विनोदी लिंक आहे बुवा.
खरं सांगू का असल्या
खरं सांगू का असल्या गोष्टींच्या मागे न लागलेलेच बरे. एवढा घाम गाळून कष्टाने कमावलेला पैसा खर्च करून जर मी वास्तू घेत असेन तर ती मला का नाही लाभणार?
खरं सांगू का असल्या
खरं सांगू का असल्या गोष्टींच्या मागे न लागलेलेच बरे.>>> अनुमोदन.... अगोदर कुतुहल म्हणुन, मग काही चांगल्या घटनांचा संबंध लावुन, आणि शेवटी वाईट घटनांचा संबंध लावल्यावर अक्षरशः बुद्धी गहाण टाकली जाते. जर असं असेल तर सगळेच सुखी होतील, काही प्रोब्लेमच नाही, आणि सल्ला देणारा तर 'जगाचा राजा'.
अगदी बरोबर
अगदी बरोबर
वढा घाम गाळून कष्टाने
वढा घाम गाळून कष्टाने कमावलेला पैसा खर्च करून जर मी वास्तू घेत असेन तर ती मला का नाही लाभणार? >> येस्स! लाभणारच.
पाटील बरोबर
पण आपण मायनॉरिटी आहोत. ज्यांना खरच चर्चा करायची आहे त्यांना करूदेत.:)
लंपन सहमत.
लंपन सहमत.
माझ्या एक मैत्रिणीने
माझ्या एक मैत्रिणीने वास्तुशात्रा चा कोर्स केला आहे. ह्या भारत भेटीत आम्ही सगळ्या मैत्रिणी, एका मैत्रिणी कडे जिने नविन घर घेतल होत, तिच्या कडे जमलो होतो. पेन्ट होउस होत त्यामुळे खुप छान वारा,
सूर्य प्रकाश, किचन आणी लिविन्ग रूम ला लागून दोन छान मोठ्या प्रशस्त टेरेस. तिनी सजवल पण खुप सुन्दर होत. ते सगळ पाहून सगळेच खुश झाले होते.
पण वास्तुशास्त्र मैत्रिण आल्यावर सगळ चित्रच पालटलं. कारण प्रत्येक गोश्ट ही इथे नको होती , हे अस पाहिजे होत हे तस हव होत की तिचा बिचारिचा मूड च गेला आणि आमचा पण.
उदा. महाभारतातला एक सीन च पेन्टिन्ग होत... तर त्यानी म्हणे घरात politics सुरु होउन घरात भांडण होतात. शंख शिंप्ल्याची सजावट पाहून ह्यानी दारिद्र्य येतं, सगळं कवडी मोलाने जातं,
एक wild horses च पेन्टिन्ग होत त्यानी म्हणे नशीब उधळतं आणी मेंटल peace निघून जातं.
>उत्तर ही कुबेराची दिशा
>उत्तर ही कुबेराची दिशा असल्याने त्या दिशेला टॉयलेटचे ड्रेनेज असू नये.
तिकडे एअरकंडीशनरचा इनकमींग व्हेंट लावला तर इनकम व्हेंट न होता वाढेल.
आग्नेयाकडे ड्रेनेज असेल तर घरातील सगळे लोक थंड बनतात.
ई.
थोडक्यात काय तर घरात ड्रेनेज असु नये. म्हणुन तर आधी संडास नेहमी बाहेर असत.
दिवे विकायला विसरलो होतो दिवे घ्या दिवे ...
अमेरिकेत असलेल्या घरांमधे
अमेरिकेत असलेल्या घरांमधे कित्येकवेळा कुठेही काहिही असते म्हणजे ती घरे कुणाला लाभतच नाहीत का? आपले चांगल्या मनाने घेतलेले, चांगल्या पैशने खरेनी केलेले आपल्यालाच का लाभू नये.
निरालीने लिहीलेले तर सगळ्यात वाईट. वास्तूशास्त्र/फेन्ग शुई नावाखाली मेहेनतीने बांधलेल्या घरात जाऊन -ve एनर्जी पसरविणे चालते वाटते!!
पण वास्तुशास्त्र मैत्रिण
पण वास्तुशास्त्र मैत्रिण आल्यावर सगळ चित्रच पालटलं. >>> थोडे अति वाटेल पण अशा लोकांना घरात पण आणु नये, आलेच तर तोंड पण उघडु देवु नये. आपण कितीही 'दगड' असलो तरी घरातील सगळेच असतील असे नाही. एकाच्याजरी मनात हा व्हायरस आला कि पार वाट लागते. त्यांना असे सांगितल्याशिवाय चैनच पडत नाही.
महाभारतातला एक सीन च
महाभारतातला एक सीन च पेन्टिन्ग होत... तर त्यानी म्हणे घरात politics सुरु होउन घरात भांडण होतात. >>> महाभारत पुस्तक माझ्या घरी आहे तर त्यावरून एका महाभागाने तुमच्या घरी भांडणं होत असतील असा निष्कर्ष काढून बोलून दाखावला. बायको म्हणाली, ' तुझ्या घरी तर महाभारत नाही, मग तुझे न बायकोचे इतके भांडणं का होतात" गप्प बसला. लोकं सुतावरून स्वर्ग गाठतात. बिनडोक! वार्यालाही उभे करू नये अशांना पण काय करणार, मित्र म्हणवतात व जोतीष्य शास्त्राचा विद्यार्थी अन कन्सल्टंट!
महाभारतातला एक सीन च
महाभारतातला एक सीन च पेन्टिन्ग होत..
वास्तु काय सांगते हे मला माहीत नाही. पण मलादेखील हे चित्र अजिबात आवडत नाही. एका राजघराण्यातील वारसाम्मध्ये इस्टेटीसाठी झालेल्या लढाईचे ते चित्रण आहे. धर्माच्या नावाने लावायला इतर शांत चित्रे उपलब्ध असताना असले चित्र लावू नये असे मलाही वाटते.. ( आणि हेच तत्वनिष्ठ हिंदु लोक मुघल घराण्यात इस्टेटीवरुन भाम्डणे होती , आपला धर्म किती श्रेष्ठ म्हणुन गळा काढतात. )
अर्थात, ते चित्र घरात असू नये असे अनेकांचे मत झालेले आहे, हे मात्र नक्की. ( महाभरतात नवरा-बायकोची भाम्डणे नव्हती, वारसांमधील भांडणे होती.. )
एक wild horses च पेन्टिन्ग
एक wild horses च पेन्टिन्ग होत त्यानी म्हणे नशीब उधळतं आणी मेंटल peace निघून जातं.
एव्हाना वास्तुवाल्याचे हे मत मात्र नक्कीच खरे झाले असणार. ! वास्तुवाल्याच्या खरेपणाचा आणि काय पुरावा पाहिजे?
महाभारतातलं ते पार्थ आणि
महाभारतातलं ते पार्थ आणि पार्थसारथीचं चित्र का? दुराचार्यांचा पाडाव आणि निष्काम कर्मयोगाची नांदी...त्या चित्राचा असाही अर्थ घेतला जाऊ शकतो
अर्थ कसाही लावा हो, पण घरच्या
अर्थ कसाही लावा हो, पण घरच्या भांडणाला १८-१८ अक्षौहिणी लोकांचे प्राण पणाला लावायचं म्हणजे अजबच. निष्काम कर्मयोगच करायचा तर गरिबांची सेवा करणं, प्रण्यांची सेवा करनं, शेती .. काहीही केलं असत्म तरी चाललं असतं की... आणि अशा प्रकारची इस्टेटीची भांडनं जनतेतही असली तर ते सोडवनं हे राजाचं कर्तव्य असतं. आता याना स्वतःच्याच इस्टेटीचा प्रश्न शांतपणाने सोडवता नाही आला. मग हे सगळे निष्काम कर्मयोगी कसे झाले?
आणि निष्काम कर्मयोग म्हटल्यावर नुस्ते एका झाडाचे किंवा कुठलेही शांत चित्र लावले तर ते पुरत नाही का?
वास्तुशास्त्र हे
वास्तुशास्त्र हे स्युडोसायन्सचा उत्तम नमुना आहे, त्यात कुठल्याही गोष्टीला अत्यंत हास्यास्पद शास्त्रीय आधार देण्याची केवीलवाणि धडपड आहे. हे सगळे तथाकथित 'शास्त्र' निव्वळ अॅड-हॉक रिझनिंगवर आधारित आहे.
मागे अग्निहोत्राच्या धाग्यावर लिहिले होते तेच इथे परत लिहितो- अशा प्रकारच्या 'शास्त्रा'मधे बर्याचदा तो करणार्याचा त्याच्या परिणामावर इतका प्रचंड आंधळा विश्वास असतो की नंतर मिळालेला कुठलाही डेटा/अनुभव आपल्याला पाहिजे त्या निष्कर्षात बसवण्यात येतो.
असा आंधळा विश्वास अनेक वेळा, सर्वच देशात, अनेक शास्त्रज्ञांनीही दाखवला आहे,
माझ्या विरोधामागे, भारतीय संस्कृती, हिंदू धर्म इ.इ. वर हल्ला करण्याचा काही उद्देश नाही. त्या मुद्द्यावरुन कुणी उर बडवू नये.
अनेक वेळा लोक ,'एखाद्या गोष्टीने लोकांचा फायदा होत असेल तर त्याला विरोध का?' असे विचारतात. इथे विरोध वास्तुशास्त्र करण्याला नसून त्याला खोटा शास्त्रिय मुलामा देण्यास आहे. 'आमच्या परंपरेत आहे म्हणून आम्ही करणार, शास्त्रिय नसेल तर नसो' अशी हिंमत का दाखवली जात नाही?
ह्म्म्म.. दोन विरुद्ध मतं
ह्म्म्म.. दोन विरुद्ध मतं असलेल्या सो कॉल्ड वास्तुतज्ञांबद्दल काय बोलावे..एकजण म्हणे देवघर जमीनीलगत असावे म्हणजे ते स्थिर राहील, दुसरा म्हणे देवघर आपल्या बैठकीपेक्षा उंच असावे.. देव आणि आपण एका उंचीवर असु शकत नाही..आता शहरातल्या १५० स्क्वे. फुटाच्या ६-८ माणसाच्या घरात हे सगळं कसं बसवणार.. मग ती घरं लाभतच नाहीत की काय कोणाला? तिथे राहणारी सगळी लोक कायमच गरीबीत, मनःशांती नसलेल्या अवस्थेत, अकाली मॄत्युच्या छायेत जगतात का? आणि हे सगळं करुनही आलेल्या संकटांचं काय? त्यासाठी परत नवीन काहीतरी शोधायचं का?
आत्ताच Being there पाह्यला
आत्ताच Being there पाह्यला (http://aschig-moviereviews.blogspot.com/2011/05/being-there-1979-810.html). मस्त आहे. आपल्याला हवे त्यावर कसा आपण विश्वास ठेवतो याचे सुंदर उदाहरण आहे - आणि ते सर्व विश्वासाबद्दल आहे, न की अंधविश्वासाबद्दल.
आणि परंपरांचे बोलायचे झाल्यास त्या बदलत असतात, बदलायला हव्या. कुबेर जेंव्हा घर बांधतो तेंव्हा टॉयलेट कोणत्या दिशे ला असते? दक्षीण धृव्वावरील बिचार्यांनी काय करायचे? जो बुद्ध घर सोडुन गेला त्याच्या हसर्या मुर्त्या कशाला जमवायच्या?
(मुन्नारपासुन ५० किमी वरील एका गावातील देवळाच्या अंगणातील फोटो)
फोटो मस्त आहे. फोटोतला
फोटो मस्त आहे. फोटोतला प्रकाश खुप आवडला.
अशीच एक लिंक ->
अशीच एक लिंक -> वास्तुशास्त्राचा उदो उदो
निराली तुझ्या वास्तुशास्त्र
निराली तुझ्या वास्तुशास्त्र शिकलेल्या मैत्रिणीचा निषेध!
बिल गेटसचं घर दक्षिणमुखी आहे
बिल गेटसचं घर दक्षिणमुखी आहे (म्हणे) :).
इथे अमेरिकेतही Toilet seat ची
इथे अमेरिकेतही Toilet seat ची दिशा बघून घर घेणारे आणि त्यासाठी होकायंत्र घेऊन फिरणारे लोक पण बघितले आहेत. पण घरात तीन-चार Toilet असतात आणि सगळीच एका दिशेला कशी असतील?(कोणत्या दिशेला काय होते कोण जाणे)
(हे माझे वैयक्तिक मत आहे, कुणाला सल्ला नाही).
अशा प्रकारच्या 'शास्त्रा'मधे
अशा प्रकारच्या 'शास्त्रा'मधे बर्याचदा तो करणार्याचा त्याच्या परिणामावर इतका प्रचंड आंधळा विश्वास असतो की नंतर मिळालेला कुठलाही डेटा/अनुभव आपल्याला पाहिजे त्या निष्कर्षात बसवण्यात येतो. >>>>> आगाऊ, माझं प्रोजेक्ट मधल्या क्वालिटी ऑडिट्स बद्दलही अगदी हेच मत आहे.. अरूणला विचारायला हवं..
वास्तुशास्त्राचा खरा उद्देश
वास्तुशास्त्राचा खरा उद्देश घरमधे भरपूर उजेड, वारा यावा असा आहे. वास्तुशास्त्राचे सर्वात महत्त्वचे तत्त्व असे आहे, की घराचा मध्य भाग ज्याला ते "ब्रह्म" म्हणतात तो मोकळा ठेवावा. जुन्या मंदिराचे, वाड्याचे, हवेल्याचे मध्य भाग (प्लॉटच्या मधोमधचे) असे मोकळे ठेवलेले दिसतात. मोठ मोठ्या घरामधे ते फिरायला पण खरंतर सोयीचे. नाहीतर किचनला जायचे असेल तर याच्यात्याच्या खोलीतून प्रवास करायला लागला असता तेव्ह्याच्या लोकाना.
त्या उद्देशाने घराचे दार पूर्व किंवा पश्चिमेला असावे. (सूर्योदयाला अथवा सूर्यास्ताला) उजेड आत यावा. क्रॉस व्हेंटिलेशन होऊन घरात हवा खेळत रहावी इत्यादि.पूर्वी पायखाने असत, त्यामुळे ते घराच्या मुख्य भागापासून लांब असायचे.
त्यावेळेला न्हाणीघर हेच मुळात आताच्या दोन बेडरूम इतके असायचे. त्यामुळे त्याचे पाणी निचरा होण्यासाठी जमिनीचा उतार वगैरे बघून मग घर बांधायला घ्यायचे. बाजूच्याच्या घराचा देखील विचार करावा लागायचा. त्याचा पायखाना आणि आपला किचन समोरासमोर येऊ नये म्हणून कदाचित दिशा वापरून घराची बांधणी करत असावेत (
असे माझे मत.
सध्याच्या १५०० स्क्वे.फुटाच्या फ्लॅट्मधे हे सर्व नियम पाळता येणे शक्य तर नाहीच, त्याहूनही त्यावरचे उपाय मूर्खपणाचे आहेत. त्यात अजूनच गंमत म्हणून कुठलेतरी पुस्तक वाचून कसलातरी कोर्स करून हे लोक काहीही सल्ला देतात. त्यात, तोडफोड न करता वास्तुसल्ले हा त्याहून मोठा विनोद. काहीतरी बेडूक, उंदीर, कसलीतरी नाणी असले काही आणून ठेवून घरात समृद्धी येत असेल तर कुणी काम करायलाच नको.
सध्याच्या काळात आपल्याला घरामधे कमीत कमी सामान ठेवावे, गरज नसलेले सामान दुसर्याला देऊन टाकावे. घर कायम स्वच्छ हायजिनिक ठेवावे. घरामधे सर्वच सदस्यानी हसत खेळत रहावे. जेवताना टीव्ही बघण्यापेक्षा सर्वानी एकमेकाशी गप्पा मारत जेवावे. घरामधे ऑफिसची टेन्शन घेऊन येऊ नये. घरातील स्त्री जर किचनम्धे एकटीच काम करत असेल तर बाकीच्यानी तिला मदत करावी. शक्य होईल त्या विकांताला घर बंद करून दूर कुठेतरी फिरून यावे असे नविन नियम तयार करायला हवेत.
घरातील स्त्री जर किचनम्धे
घरातील स्त्री जर किचनम्धे एकटीच काम करत असेल तर बाकीच्यानी तिला मदत करावी. >>>
नंदिनी म्हणुन तर आधुनिक वास्तुंमध्ये आजकाल ओपन किचन हा कन्सेप्ट आहे.
Pages