Submitted by निंबुडा on 20 May, 2011 - 06:50
वास्तुशास्त्राविषयी चर्चा व प्रश्नोत्तरे यांची देवाण-घेवाण करण्यासाठी हा धागा उघडत आहे. इंटीरीअरच्या धाग्यावर मला या संदर्भात असलेले प्रश्न मी विचारले होते. पण कुणीच शंकानिरसन न केल्याने हा स्वतंत्र धागा बनवत आहे. कुणाचा या शास्त्राचा अभ्यास असेल तर कृपया मार्गदर्शन करावे. ज्यांना या विषयाबद्दल उत्सुकता आहे, कुतूहल आहे, अनुभव गाठीशी आहे अश्यांनी इथे माहिती व प्रश्न शेअर करावे.
शिवाय वास्तुशास्त्र खरे कि खोटे, या शास्त्राच्या वाटेला जाणे योग्य कि अयोग्य, वाटेला गेलेल्यांनी घेतलेले बरे - वाईट अनुभवही इथेच शेअर करायला हरकत नाही.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मूळातच दिशा काल्पनिक आहेत
मूळातच दिशा काल्पनिक आहेत त्या स्थिर नाहीत
म्हणजे
आपण पृथ्वीच्या बाहेर अंतराळात उभे असल्यास -
प्रुथ्वीच्या परिवलनामुळे सकाळची पुर्व दिशा संध्याकाळी पश्चिम असेल (केवळ आपण प्रूथ्वीवर असल्याने सुर्य उगवतो ती पुर्व म्हणतो आणि मावळतो ती पश्चिम म्हणतो प्रत्यक्षात सुर्य उगवतही नाही आणि मावळतही नाही तो एकाच ठिकाणी स्थीर आहे )
त्यामुळे अमूक दिशेला यम आणि तमूक दिशेला गम असण्याची सूतराम शक्यता नाही.
दक्षिणेला दार ठेवल्याने काही फरक पडत नाही.
नॉर्थ आणि साउथ पोलचा संबंध असेल तर दक्षिणेला पाय करुन झोपणारे बुटके होतील आणि दक्षिणेला डोके करुन झोपणारे उंच होतील (ताणले जाऊन)
काहीच्या काही
टिंबक टू हा मात्र अफलातुन
टिंबक टू
हा मात्र अफलातुन टोला आहे.
कोण पाखंडी म्हणतो की सूर्य
कोण पाखंडी म्हणतो की सूर्य स्थिर आहे. आमच्या धर्मग्रंथा मधे स्पष्ट सांगितले आहे की सूर्य सात घोड्यांच्या रथामधून आकाशातून परिभ्रमण करतो. असंच एकदा परिभ्रमण करीत असताना हनुमानाने त्याला फळ म्हणून धरले आणि पृथ्वीवर हाहा:कार उडाला. या खोडीबद्दल मारुतीला त्याच्या सर्व शक्ती विसरून जाण्याचा शाप मिळाला. हाच सुर्य पराक्रमी कर्णाचा अनौरस पिता होता. (काहीतरी गोंधळ झाला बहुतेक, अनौरस संतती असते, पण अनौरस बाप असतो का? चुभूद्याघ्या...)
आमच्या परम बुद्धिवान पूर्वजांनी हे सांगितले असल्यामुळे हे सर्व खरेच असणार हे निर्विवाद. त्याविषयी शंका घेण्याचे पाप जो करेल त्याला रौरव नरकामध्ये १०८ वर्ष अल्ताफ रझा नामक म्लेंच्छ गायकाची गाणी ऐकावी लागतील.
सूर्य स्थिर आहे?
सूर्य स्थिर आहे? ऐतेन!
आम्हाला उगाचच वाटायचं की तोच काय आकाशगंगाही स्थिर नाही
http://www.universetoday.com/60174/does-the-sun-move/
(वास्तुशास्त्र वगैरे आजपत्तुर न पाहिलेली)
आताच कोणीतरी सांगितलंय घरी
आताच कोणीतरी सांगितलंय घरी पपईचं झाड लावू नका म्हणून(आमच्याकडे अलरेडी २ आहेत आणि त्याला चांगल्या पपया पण.) आजूबाजूच्यांनी पण हौसेने लावली आहेत.
नक्की काय कारण आहे इथे जाणून घ्यायचंय.अर्थात निर्णयावर आधारीत सध्याचं पपईचं झाड कापणार नाही.
घराच्या मुख्य दरवाज्याची
घराच्या मुख्य दरवाज्याची दिशा कशी ठरवावी?
घराच्या दरवाज्यातुन आत येताना पुर्व दिशा पण मध्यभागी उभे राहीले तर मुख्य दरवाजा अग्नेय दिशेला असेल तर त्या वास्तुत दोष असतो का? अन असे असेल तर त्यावर उपाय काय? प्लिज सांगा कोणीतरी.
धन्यवाद
माझं बालपण दक्षिणेकडे दरवाजा
माझं बालपण दक्षिणेकडे दरवाजा असलेल्या घरात गेलं. आणि ते दिवस माझ्या आयुष्यातील सोनेरी दिवस होते. दक्षिणमुखी दरवाजा असलेल्या घरात पुन्हा राहायचं आहे काय माहीत ते सोनेरी क्षण पुन्हा येतील.
माझे आयुष्य दोन्ही दरवाजे
माझे आयुष्य दोन्ही दरवाजे दक्षिणेला असलेल्या घरात गेले. सामान्य माणसाला जे काही त्रास होऊ शकतात ते सगळे झाले. दक्षिणेला एका डोंगरावर देवीचे मंदिर आहे. दरवाजात उभे राहिले की दिसते. तिची इच्छा म्हणून जे जे झाले ते ते पार पडले. तेंव्हा तुम्ही जास्त काळजी न करता निवांत राहा. काही होत नाही वास्तू दोषाने.
पण त्यांचा प्रश्न दक्षिण
पण त्यांचा प्रश्न दक्षिण दिशेबद्दल नाही, आग्नेय दिशेबद्दल आहे
व्हीबी आग्नेय म्हणजे साऊथ
---------------------- शतकी प्रतिसाद -----------------------
व्हीबी आग्नेय म्हणजे साऊथ ईस्ट का? आमच्या घराच्या दाराची दिशा आहे ती. अजिबात काही त्रास नाही. फार आनंदी आहोत आम्ही. कित्येक वर्षांनी कारण तीघेही एकत्र आहोत पहील्यांदाच.
वास्तुशास्त्र बेसलेस आहे.
सामो, दाराची दिशा नव्हे,
सामो, दाराची दिशा नव्हे, घराच्या मध्यभागी उभे राहीले तर दरवाजा ज्या दिशेला असेल ती दिशा.
आग्नेय म्हणजे साउथ ईस्ट होय
https://merymoi.com/10-bad
https://merymoi.com/10-bad-luck-plants-you-need-to-avoid-to-plant/
Papaya tree brings illness
दक्षिण आणि पूर्व दिशेच्या
दक्षिण आणि पूर्व दिशेच्या मधली दिशा म्हणजे आग्नेय, आमच्या प्रवेशदाराची दिशा पण तीच आहे सर्वांनी सांगितले तुम्ही आगीतून प्रवेश करत आहात , घरात भांडणं ,तंटे,मनस्ताप होईल .आठ वर्षे झाली आगीतून प्रवेश( आतबाहेर)करून काहीही झाले नाही उलट खाऊन पिऊन सुखी आनंदात आहोत .तरी आरोग्याच्या तक्रारी (ज्या कुणाला नसतात आजकाल )त्यासाठी एकांनी पंचमुखी हनुमान बाहेर दारावर पहाऱ्याला ठेवायला (लावायला)सांगितलंय तो लावायचा विचार आहे.
होय व्ही बी मी जर घराच्या
होय व्ही बी मी जर घराच्या मध्यभागी उभी राहीले तर आमचा मुख्य दरवाजा आग्नेय दिशेस आहे. पण हे घर फार मस्त आहे. वी आर हॅपी.
दारूच्या दुकानचे
दारूच्या दुकानचे वास्तूशास्त्र कोण करतो ?
सगळी फुल्ल चालतात
अग्नेय वाईट कारण अग्नीची दिशा
अग्नेय वाईट कारण अग्नीची दिशा बरोबर. भांडणे, कर्जबाजारी, ताप आदि गोष्टी घरात येणार म्हणुन बरोबर? पण तसे काही जाणवलेच नाही आम्हाला.
पण तुझ्या मनात किंतु परंतु आला असेल तर डोन्ट गो फॉर इट. बाकी तथ्य नाही असे मला वाटते,
मित्राच्या टुमदार बंगल्याच्या
मित्राच्या टुमदार बंगल्याच्या
वास्तुशांतीला गेलो होतो .....
त्याला सहज विचारले.. ..
"इथे पूर्व दिशा कुठे आहे रे?"
त्याने बायकोकडे बोट दाखवले.
विषय संपला.
(No subject)
साऊथ ईस्ट ला ही तिजोरी ची
साऊथ ही तिजोरी ची जागा आहे
Sauth east हेवी अग्नी साठी बेस्ट असते
दरवाजा असेल तर त्याचा इफेक्ट माईल्ड करण्यासाठी गुलाबी , ग्रे या रंगसंगती चा वापर करू शकतो
माझे वडिल वकिली करत असताना
माझे वडिल वकिली करत असताना सदनिकांची कामे करत. सदनिका तयार झाल्या की ग्राहकांची सेल डिड वगैरे लगबग सुरु होत असे.
एकदा बिल्डर वैतागून एका गिर्हाइकाला घेऊन आला. त्या गिर्हाइकाने घेतलेल्या सदनिकेतील संडासात बसल्यावर दक्षिणेकडे तोंड होत होते. त्याच्या कोठल्यातरी बाबा-बुवाने दक्षिणेकडे तोंड करून संडासला बसू नये म्हणून सांगितले होते. तेव्हा हे गिर्हाइक बिल्डरला संडासाचे भांडे (भारतीय पद्धतीचे) काढून, दिशा बदलून पुन्हा प्लंबिंग वगैरे करून दे यावर अडून बसला होता. सदनिका बांधून पूर्ण होती.
वडिलांनी हे ऐकले आणि म्हणाले संडासाचे भांडे बदलण्यापेक्षा संडासला बसताना तुम्हीच उत्तरेला तोंड करून का बसत नाही?
तर तुम्ही; कुठेतरी पत्रा घालून वाढवून, वा जड वस्तु ठेवून घराचा भौगोलिक वा गुरुत्वमध्य का बदलून टाकत नाही?
(No subject)
वास्तू कन्सल्टन्सीचा उद्योग
वास्तू कन्सल्टन्सीचा उद्योग कसा सुरू करतात ? वास्तू , ज्योतिष , जातक इ इ
वास्तूशास्त्रातील तज्ज्ञ
वास्तूशास्त्रातील तज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजींची चाकूने भोसकून हत्या; घटना सीसीटीव्हीत कैद
‘सरल वास्तू’ फेम चंद्रशेखर गुरुजी यांची कर्नाकमधील हॉटेलमध्ये चाकूने भोसकून हत्या करण्यात आली
https://www.loksatta.com/desh-videsh/vastu-expert-chandrashekhar-guruji-...
Pages