
नमस्कार, मायबोलीच्या निसर्गाच्या गप्पांच्या ३५ व्या भागात आपले स्वागत आहे.
सर्वप्रथम गुढीपाढव्याच्या व मराठी नविन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
नेहमीप्रमाणेच आपण आपल्याला माहित असलेली निसर्गातील घटकांची माहिती, अनुभव या धाग्यावर शेयर करुन या धाग्याचा एक माहितीपूर्ण संच तयार करुया.
निघा निघा चिऊताई
सारीकडे काँक्रीटले
दाणा पाणी हरवले
शहरी ह्या
विषारी धुरके आले
घरट्याच्या दारापाशी
डोळ्यावर झोप कशी
अजूनही
उरलेली पाखरे ही
भयसूचनांचे गाणे
गाऊनी टिपती दाणे
अखेरचे
झोपू नका अशा तुम्ही
वाचविण्या मृत्युक्षणी
येईल का मग कोणी
बाळाला ह्या
बाळाचे मी घेता नाव
जागी झाली चिऊताई
बाळासकट ती जाई
कायमची!
डोळ्यासमोर नजर जाईल तिथपर्यंत विस्तीर्ण माळरान, सोनेरी पिवळ्या गवताने आच्छादलेले! साधारण हजारेक एकराचा त्याचा पसारा. त्याच्या ज्या कडेला मी उभी आहे. तिथून माळरान संपून उत्तरेकडे शेताडी सुरू होते. ती थेट वायव्येकडून आग्नेयेकडे पसरलेल्या पुणे सोलापूर महामार्गापर्यंत. या सगळ्यातून तिरकी काट मारून एक छोटासा ओढा वाहतो त्याचा आता रस्त्यापल्याडच्या शिवारांत फारसा माग लागत नाही. पण लागला तरी पुढे उत्तरेकडे लगेचच असलेल्या भीमेच्या काठापर्यंतच त्याची धाव असणार हे स्पष्ट आहे. पश्चिम दख्खनमध्ये अनेक ठिकाणी अगदी सर्रास आढळणार्या भौगोलिक परिसर-तुकड्यांमधलाच हा एक. गावातले लोक याला बामणथळ म्हणतात.
गेला आठवडा अमेरिका खंडातल्या ३ देशांच्या स्वातंत्र्यदिनाचा… कॅनडाचा जुलै १, अमेरिकेचा जुलै ४ तर व्हेनेझुएलाचा जुलै ५ ! भारतातल्या दिवाळी फटाक्यांची मौज इथे ४ जुलै आणि ३१ डिसेंबरला फिटते. एकावर्षी आम्ही रोडट्रीपहून परत येत होतो आणि दूरवर रस्त्याच्याकडेने वेगवेगळ्या रहिवासी भागातून उडणाऱ्या शोभेच्या दारुकामाचे दर्शन होत होते. काही वर्षं नेमाने हजेरी लावून आम्ही ऑस्टिन डाऊनटाऊनमध्ये रात्रीच्यावेळी आकाशात साजरी होणारी आतिषबाजी पाहायला जायचो. मागच्यावर्षीपासून यामध्ये वेगळा बदल येऊ घातलेला आहे.
गेल्या काही दिवसांत बिहार राज्यांत अनेक पूल कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. दोन आठवड्याच्या काळांत तब्बल बारा पूल कोसळले. बहुतेक सर्व पूल नदीवर बांधलेले होते. बिहार सरकारने बांधकाम कंपनीला कारणे दाखवा नोटिस बजावली आहे. ब्रजेश सिंग या सतर्क नागरिकाने, सर्वोच्च न्यायालयांत चौकशी साठी, स्ट्रकचरल ऑडिट साठी PIL दाखल केली आहे.
माझा जन्म झाला हिमालयाच्या पर्वतीय परिसरामध्ये. उत्तराखंडच्या पिथौरागढ़ जिल्ह्यात सद्गड नावाच्या अतिशय सुंदर गावाजवळ. हिमालयाच्या पर्वत रांगांच्या मधोमध! सगळीकडे डोंगर, झाडं, पशु- पक्षी अशा वातावरणात मी जन्मलो. अतिशय थंड वातावरण होतं ते. मी आणि माझे भाऊ- बहीण डोंगरात खेळायचो. खूप सुंदर परिसर आणि हीss शांतता होती तिथे. सगळीकडे हिरवंगार वातावरण, माती, शेतं आणि भरपूर थंडी. शिवाय आम्ही जिथे राहायचो तिथे खूप बकर्या सोबत असायच्या. मी बकर्या आणि गायी- बैलांसोबत खेळायचो. माझे दिवस खूप मजेत जात होते. आजूबाजूला असलेले डोंगर- झाडं मला ओळखीचे वाटायला लागले होते.
पुणे अफाट, बेशिस्त आणि अनियंत्रित वाढतेय. आताच्या पुणेकरांना त्याचं विशेष वाटत नाही.
पण ज्यांनी जुनं पुणं अनुभवलं आहे त्यांना पुण्याचं हे रूप झेपत नाही. काहींना बदल हा नैसर्गिक आहे असे वाटते. अर्थात शहरात होणारे बदल नैसर्गिक कसे असू शकतात असा प्रश्न लगेचच विचारला जाऊ शकतो.
मागचा भाग : https://www.maayboli.com/node/84992
गावी आल्यावर मी लगेच शेतात धाव घेतली. आधी उस पाहिला. काही ठिकाणी ऊसरोपे मरुन गेली होती पण त्या गॅप पडलेल्या जागी नविन ऊसरोपे लावली गेली नव्हती. जवळपास हजारभर उसरोपे तरी ऊरलेली जी मी जाताना सावलीत ठेवली होती. त्यांना १५ दिवस पाणी मारले नव्हते त्यामुळे ती सगळी रोपे सुकून गेली होती. आता ती लावता येणे शक्य नव्हते.