निसर्गाच्या गप्पा (भाग ३५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 30 March, 2025 - 08:10

Screenshot_20250330_173724_Photos.jpg

नमस्कार, मायबोलीच्या निसर्गाच्या गप्पांच्या ३५ व्या भागात आपले स्वागत आहे.

सर्वप्रथम गुढीपाढव्याच्या व मराठी नविन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

नेहमीप्रमाणेच आपण आपल्याला माहित असलेली निसर्गातील घटकांची माहिती, अनुभव या धाग्यावर शेयर करुन या धाग्याचा एक माहितीपूर्ण संच तयार करुया.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

व्वा. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आवडत्या धाग्याचा नवीन भाग आला.
सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!

आज गुढीपाडवा.
आजचा मान कडुनिंबाचा.
Screenshot_20250330_175857_Gallery.jpg

कडुनिंबाच्या बहरावरचे कुमारजींचे गोड गाणे

निमोरी का मौरा है रे
गमकीला है मन बौरारे.....

https://youtu.be/cod1_MiuKN0?si=bLbFna1pGsuAzdVu

नवीन धागा आला.

मोगरा फुलला.
हा संकुलातला कडूलिंब

402d0965-f9bc-414a-8af4-eebe952ca51c.jpeg

दोन्ही कडुनिंबाचे फोटो औचित्यपूर्ण आणि छान. Happy सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा.

मी लावलेला गुलाबाचा ताटवा दरवर्षी या ऋतूत फुलतो. गेले दोनतीन दिवस भरपूर पाऊस पडतो आहे, त्यामुळे बहर आला आहे.
१.IMG-20250330-WA0004.jpg
२.IMG-20250330-WA0005.jpg
३.IMG-20250330-WA0007.jpg

सर्व फोटो अप्रतिम ... नेहमीसारखेच Happy
अस्मिता, गुलाब तर अफाट सुंदर... मी भावाकडे US ला आलेले तेव्हा असे गुलाब पाहिले होते. नजर हलू देत नाहीत ते. किती बघत बसायचे मी. वहिनी शेवटी म्हणाली की गारूड केले आहे त्या गुलाबानी तुझ्यावर.

कडुलिंबाचे दोघांचेही फोटो सुंदर. तुम्हाला कडूलिंबाचे उपयोग माहित असतील ते लिहा म्हणजे सगळ्यांना समजेल.

अस्मिता काय हेल्दी आहेत गुलाब. कशी निगा घेतेस काय काय घालतेस ते सांग ना. मी आजच दोन कलमे आणली गुलाबाची.

धनवन्ती, जागु आणि अनिंद्य Happy

वहिनी शेवटी म्हणाली की गारूड केले आहे त्या गुलाबानी तुझ्यावर. >>> हो, होते खरं. मी पण भरपूर फोटो काढत बसले होते काल. Happy

निगा काहीच घेत नाही. आधी एक दोनच रोपं होती, कलमं करून ताटवा केला. लावण्याआधी मातीत एक कच्चं अंडं घातलं होतं, ते जबरदस्त खत होते. पुन्हा दरवर्षी मार्च एप्रिल मधे आपोआपच फुलतात.

अस्मिता
गुलाबांचा ताटवा जबरदस्त फुलला आहे.

वा काय फोटो आहेत गुलाबाचे अस्मिता. केव्हडी फुलं आली आहेत मस्तच .कडुलिंब आणि जागु यांची धाग्यातली मोगऱ्याची फुलेही छान .
सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
IMG_20250330_231947.jpg

सुप्रभात.
नास्टुरिअम रंग मस्त आहे.
Screenshot_20250331_082211_Gallery.jpg

सुस्नात पॅन्सी...

ह्याचे नाव माहीत नाही, पण आहेत सुंदर.
Screenshot_20250331_091305_Gallery.jpgScreenshot_20250331_091241_Gallery.jpg

It's Kalanchoe.
मस्त फुलला आहे.
बरेच रंग असतात. पानफुटीचा भाऊ.

ऋतुराज पॅनसी मस्त
गंधकुटी कलंचोई सुंदर. यात बरेच रंग येतात महिनाभर ही फुले असतात. गार्डन बहरलेले दिसण्यासाठी या हंगामातील कलंचोई उत्तम पर्याय आहे.

छान धागा, छान छान फुल, मस्त माहिती, गुलाब तर सुरेख दिसत आहेत.

माझ्याही कलांचोई ला वर्षाहून जास्त काळ पुन्हा फुलेच आली नाही, झाड छान दिसत असे, एकदम टवटवीत पाने, पण फुले येईनात, दुसऱ्या summer नंतर काय करायचे ते माहित नसल्याने मी ते देऊन टाकलं मैत्रिणीला.

ऊन्हाचा ताप वाढतोय; बहावा फुलू लागलाय.

f3ba17b3-70e0-487b-82e7-78a91cfbef20.jpeg

जीवन की दोपहरी में
तुझ से मुस्काना सीखें
घूँट –घूँट पी रंग धूप का
कुन्दन बन जाना सीखें

# अमलतास
# बहावा

मोती मोगरा, बटमोगरा आणि मदनबाण>>> शुभ्र काही जीवघेणे...
अनिंद्य,
बहावा..... वाहवा.. माझा आवडता.
सुंदर.

वा! नवा धागा बहरला.

ऋतुराज, तुमच्या पॅन्सीला माझा झब्बु. स्वहस्ते केलेली क्रोशेची पॅन्सी

IMG_20250401_130459_(1080_x_1080_pixel).jpgIMG_20250401_130651_(1080_x_1080_pixel).jpg

कसले एकेक मस्त फोटोज. मीही मेन रोडवरच्या बहावाचे दोन फोटो काढलेत पण ते खास नाही आले.

मामी भन्नाट आहे. किती नजाकत आहे.

Pages