निसर्गाच्या गप्पा (भाग ३५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 30 March, 2025 - 08:10

Screenshot_20250330_173724_Photos.jpg

नमस्कार, मायबोलीच्या निसर्गाच्या गप्पांच्या ३५ व्या भागात आपले स्वागत आहे.

सर्वप्रथम गुढीपाढव्याच्या व मराठी नविन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

नेहमीप्रमाणेच आपण आपल्याला माहित असलेली निसर्गातील घटकांची माहिती, अनुभव या धाग्यावर शेयर करुन या धाग्याचा एक माहितीपूर्ण संच तयार करुया.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

ऋतुराज, तुमच्या पॅन्सीला माझा झब्बु. स्वहस्ते केलेली क्रोशेची पॅन्सी>>>> मामी wow
काय काय करता तुम्ही. जबरदस्त आहेत फुले.
पेंटेड गोकर्ण मस्त...
हिरवा चाफा भारी आहे.
@ गंधकुटी, स्वीट गार्लिक मस्त दिसतंय.

सर्वच फोटो मस्त. मामीची कलाकारीही मस्तच. Happy
काल इंद्रधनुष्य दिसले. चक्क दोन. Happy एक जरा फिकट आहे.
IMG-20250401-WA0002.jpg

या वीकेंडला Joshua Tree National Park ला गेलो होतो. नजर जाईपर्यंत वाळवंटभर पसरलेली जोशुआ ट्रीज. त्या झाडाचा आणि त्याच्या फुलांचा फोटो -
.
IMG-20250401-WA0012(1).jpg

.
IMG-20250401-WA0011(1).jpg

जोशुआ फुले पहिल्यांदाच पाहिलीत.
बायबलमधे उल्लेख आहे त्यांचा.>>>>> माझ्या एका ख्रिस्ती मित्राच्या मुलाचं नाव आहे.

पिवळा कांचन मस्त.
तो त्या एका पाकळीवरील ठिपका कीटकांना मार्गदर्शन करतो नक्की कुठे गेलं की मकरंद मिळेल. त्यानुसार पुंकेसराची रचना असते व परागण यशस्वी होते.
It's like how some signal guides on which runway flight needs to be landed.

पक्षीनिरीक्षण लहानपणापासूनचा छंद आहे. फोटो काढायला गेल्या काही वर्षांपासून जमतंय Happy

California Scrub Jay
हा जोशुआ ट्री नॅशनल पार्क मधे दिसला.

IMG-20250402-WA0009.jpg

Steller's Jay
हा बिग बेअर लेक वर दिसला.

IMG-20250402-WA0010.jpg

मस्त फोटो जागू, रमड, अनिंद्य, ऋतुराज. Happy
ऋतुराज, सगळ्या पोस्टी छान लिहिल्या आहेत, रंजक आणि माहितीपूर्ण.

जॉशुआ नॅशनल पार्क पाहिलेला आहे, पण फार वर्षांपूर्वी. मस्त फोटो. जॉशुआ म्हणजे येशुआ, ज्यू आणि ख्रिस्ती दोन्हींतही हे नाव असते. कुठे कुठे ते 'य' ला 'ज' म्हणतात. आपल्याकडे 'जुगल - युगल' असतं तसंच.

य परफेक्ट आहे. येशु परफेक्ट, मराठी लोकं योग्य उच्चार करतात असं आपला शामु नावाचा ज्यु मराठी युट्युबर म्हणाले. येशु मुळचा ज्यु आणि नाव येशु. य चा ज बाकीच्यांनी केला असं ते म्हणाले. येशुआ मूळ नाव आणि त्याचं येशु झालं.

सर्वांचे फोटो सुरेख. इथे आल्यावर नजरगारवा मिळतो.

रमड, जे जे पक्ष्यांचे फोटो टाकले आहेस ते ते छान आहेत. Lol

पिवळा कांचन, जोशुआ, डबल रेनबो,... वा!

मी केलेली पॅन्सी फुलं आवडल्याची पोच देणाऱ्या सर्वांना धन्यवाद.

अस्मिता, गुलाब तर अफाट सुंदर..> +++++ अनेक ++××
मागच्या धाग्यावरचे आणि याही धाग्यावरचे सगळेच फोटो सुंदर सुंदर अगदी डोळ्यांचे पारणे फेडणारे

स्निग्धा पिन्क टॅबेबुइया म्हणुन शोध घे गुगलवर >>> साधनाताई बहुतेक हेच झाड आहे. जमलं तर उद्या थांबून एखाद फुलं मिळत का बघते
पुणे सातारा रोडवर बाग आहे तिथे आहे >> अश्विनी कुठली बाग? मी बिबवेवाडीला रहाते जवळ असेल तर सीता अशोक बघून येते

Screenshot_20250402_231026_WhatsApp.jpg
शनिवारी म्हात्रे पुलावरून जातांना dp रोडवर असाच फुललेला बहावा पाहिला
हा गेल्या वर्षीचा फोटो आहे

आहा! बहावा काय जबरदस्त दिसतोय. अलंकार सोसायटीत होता असा एक भरगच्च बहावा. सोन्याचा पाऊस पडतोय डोक्यावर असं वाटायचं त्याखाली उभं राहून.

Flor de Papel>>>> class. Vibrant color.
गंधकुटी, अनंताची फुले मस्त, आकार मोठा आहे. जास्वंद रंग सुद्धा मस्त आहेत.
बहावा जबरदस्त आहे....

मस्त फोटो मस्त गप्पा.. बहावा अप्रतिम..
आमच्याकडे अनंताच्या कळ्या फुलण्याआधी गळून पडतायत, काय करावं बरं ?

अनण्ताचा तो आवडता छंद आहे. काहीही करता येण्याजोगे नसावे, तरी ऋतुराज वगैरे मंडळींकडे टिप्स असाव्यात. माझ्या एका अनंताने आयुष्यात एकच फुल दिले आणि त्या विरहात आयुष्यभर कळ्या गाळत राहिला. कंटाळुन शेजारणीला तिच्या बागेत लावायला दिला. मुळांनी जमिनीत हात पाय पसरले तसे ह्याच्या कळ्यांत बळ आले. असो. शेजारच्या दारी का होईना फुलू लागला हे नशीब समजायचे.

मी मुंबईहुन ढिगाने कुंड्या आणलेल्या त्यातल्या फार थोड्यांनी आंबोलीत जीव धरला. त्यात एक मदनबाण व मोगरा होता. त्यांनी चार पावसाळे इथे काढल्यावर हुश्श्य होऊन गेल्या महिन्यात दोघांनाही मातीत लावले. मदनबाण खुश होऊन
तोंडभर हसणारी फुले प्रसवतोय. मोगरा आधीपसुन शिष्टच होता. कळ्या अजिबात फुलायच्या नाहीत. मातीत लावल्यावर सुधस्रेल असे वाटले होते. पण हाय रे दैवा…. कुंडीत होता तेव्हा एखादी कळी एखादी पाकळी उलगडुन पाही. आता तेही बंद. भरपुर कळ्या आहेत पण फुल बनायचे नाही म्हणजे नाहीच..

आंबोलीत बाहेरचे लोक टिकत नाहीत. नमुत
कुंडीत गुलमोहर होता. तो इथे आणुन शेतात लावला. तिन वर्षे टिकला आणि मस्त ऊंच रुबाबदार झाला होता. यंदा गेला.

आंबा व नारळाचे असेच होते. चार पाच बर्षे टिकतात.. आपल्याला फळांची स्वप्ने पडु लागतात आणि अचानक मरतात.

माझ्या इथे तिन फणस व दोन आंबे अजुन आहेत. आंब्याला एक फांदी व चार पाने असतात. तेवढीच त्याची संपत्ती. फणस मस्त वाढतो आणि पावसाळ्यात रोडावतो. उन्हाळ्यात चार पावले पुढे व पावसाळ्यात साडेतिन पावले मागे असा प्रवास सुरु आहे.

तरीही मी परवा

नीर फणस, चिकु,
लिंबु, लाल जाम, सोनचाफा, रातांबा, गावठी गुलाब, दालचिनी, लवंग

इतकी मंडळी घरी आणली. फक्त ७०० रु मध्ये मिळाले. यापैकी नीरफणस व चिकु सोडुन बाकी इथे होतात. शेतात दालचिनी आहे, लाल जाम होता पण साफसफाई करणार्‍याने त्याला तोडला. एक पान शिल्लक दिसले, वाढेल परत. नीरफणस व चिकु होतील असे नर्सरीत सांगितले. माणुस चांगला होता. जे होणार नाही ते घ्यायला दिले नाही मला.

शेतात खाली पडुन असलेली खडकाळ जागा साफ केली. तिथे वृक्षारोपण करणार.

जो एस मी मागच्या भागात तुमची आठवण काढलेली, मला आयडी अजिबात आठवत नव्हता पण मुळ डोंबिवलीकर आणि पुण्यात सेटल्ड असं लिहीलं होतं (बरोबर ना). पुण्यातून तुम्ही तुमच्या बागेचे फोटो पोस्ट करायचात.

शेतात खाली पडुन असलेली खडकाळ जागा साफ केली. तिथे वृक्षारोपण करणार. >>> हे मस्त. आधी लावलेलं ही सर्व टिकूदे, बहरुदे.

बोगनवेल, बहावा, अनंत आहाहा सर्वच.

स्निग्धा , वाळवेकर नगर ची बाग आहे . सातारा रोडच्या आतल्या बाजूला आहे. तामण , बकुळ पण फुलायला लागली आहे .
बहावा चा फोटो मस्त !! रम्यनगरीच्या मेन गेट जवळ ही असाच बहावा आहे
मीही बिबवेवाडी चीच !!
साधना , एक विचारायचे होते . मागच्या वर्षी खाण्यासाठी फणस आणला होता तेव्हा काही आठळ्या अंकुरित होत्या म्हणून त्या रुजवल्या. अशी तयार झालेली रोपे फळ देतात का ? मला एक दोघांनी सांगितले की अशी झाडे उपयोगाची नाही.

Pages