घरगुती कचरा वर्गीकरण: तुमच्या युक्त्या, प्रश्न,विचार
आपल्या रोजच्या रुटीन मध्ये, घाई गडबडीत अनेक कचऱ्यात टाकण्या योग्य गोष्टी निर्माण होतात.त्यांच्या बद्दल हा धागा.
पर्यावरण
आपल्या रोजच्या रुटीन मध्ये, घाई गडबडीत अनेक कचऱ्यात टाकण्या योग्य गोष्टी निर्माण होतात.त्यांच्या बद्दल हा धागा.
चार-धाम परियोजने ( Chara Dham Project - CDP) अंतर्गत सिल्क्यारा, उत्तराखंड, येथे ४.५ कि मी लांबीच्या बोगद्याचे काम सुरु आहे. १२ नोव्हेंबर २०२३ या दिवशी पहाटे ५:३० वाजता या बोगद्याचा काही भाग कोसळला . घटनेला दोन आठवड्यापेक्षा जास्त काळ झाला आहे, आणि बोगद्याच्या आत मधे ४१ कामगार अडकले आहेत. CDP प्रकल्प ८९० किमी लांबीचा आहे आणि एकंदर प्रकल्पाचा खर्च १२,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त अपेक्षित आहे. बोगद्याच्या बांधकामामुळे यात्रेकरुंचा प्रवासाचा मार्ग २५ किमी ने कमी होणार आहे. बोगद्याच्या बांधकामाचा कंत्राट ( नवयुगा इंजिनियरींग कंपनी लिमिटेड कडे होता.
दिनांक ०३ नोव्हेंबर २०२३
आता दिवाळी अगदी जवळ आली. पुण्यातले रस्ते आकाशकंदील, रांगोळ्या-रंगाची दुकानं आणि खरेदीसाठी बाहेर पडलेल्या लोकांनी अगदी फुलून गेले आहेत. अशी उत्सवी गर्दी छान वाटते. पण त्यामुळे जिथेतिथे अडकायला होतंय. चौकाचौकात थांबत शेतापर्यंत जायचं म्हणजे संयमाची कसोटी. पुण्यात राहून शेतावर ये-जा करायची, तर ह्या प्रश्नातून सुटका नाही. पण थोडं लवकर निघालं तर ट्रॅफिकचा रेटा थोडा कमी असतो. म्हणून प्रवासाला जाण्याआधी प्लॅनिंग करावं, तसं प्लॅनिंग करून भल्या सकाळी डबा, पाण्याची बाटली वगैरे घेऊन निघालो.
नव्या संसद भवनात आमच्या विश्वगुरुंनी महिलाआरक्षण नावाच एक ऐतेहासिक विधेयक आणल कारण निवडणूक जवळ आली याच विधेयकाला काही काळापुर्वी भाजपचे एक बलशाली नेते व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगीजींनी विरोध केला होता पण तो विषय नाही मतेमतांतरे लोकशाहीत असणारच.एव्हढा गाजावाजा करत आणलेल्या या विधेयकाला कुणीही (फक्त दोन खासदार वगळता)विरोध न करता पाठिंबा देत हे विधेयक पास झाले .
आज जिकडे तिकडे वेळी यावेळी अचानक पुराचे थैमान आपण पाहत आहोत. इतके दिवस ग्लोबल वॉर्मिंग नावाखाली चर्चिला जाणारा हा विषय आता climet change' पर्यावरण बदल 'नावाने चर्चिला जाऊ लागला. पुराच्या थैमानाने अतोनात नुकसान होत आहे. आज चीन मध्ये तर हाहाकार माजला आहे.
मोराला पिसारा आहे, सिंहाला आयाळ आहे.
या दोन्ही प्राण्यात मादीला हे वैभव नाही.
माणसात स्त्री ला केशसंभार आहे तर पुरूषाला खुरटे केस / टक्कल आहे.
हे उलटे झाले.
पण पुरूषाला दाढी मिशा दिल्यात.
जे इतर कुठल्या प्राण्यात फक्त नराला दिलेले नाही.
एक चूक दुरूस्त करायला दुसरी चूक बरोबर कशी काय ?
झुरळात नर मादी दोघांनाही मिशा असतात.
मांजर, बोका दोघांनाही मिशा असतात.
ज्या प्राण्यात नराला मिशा असतात.
त्यांच्यात मादीलाही मिशा असतात.
म्हणून बायकांना पण दाढी मिशा पाहीजेत.
बरोबर ?
जर असे झाले तर काय होईल ?
आज बातमी वाचली कुनो नॅशनल पार्क मधे अजून एका चित्त्याने, सुरजने, मान टाकली. या आठवड्यातली अशी दुसरी बातमी आहे.
https://indianexpress.com/article/india/eighth-cheetah-dies-at-kuno-nati...
नदी आणि विकास
~ शिरीष कोठावळे
नको ग! नको ग!
आक्रंदे नदी ही
पायाशी लोळत
नमून विनवी
काँक्रीट ओतशी
वेगात वरून
आणिक खाली मी
चालले मरून!
फोडीशी खडक
चोरिशी वाळू ही
कशाचा विचार
नाही तो जराही!
नको ग! नको ग!
आक्रंदे नदी ही
बेभान होऊन
कापिशी झाडे ही
तोंडचा तोबरा
नदीत टाकून
उर्मट माणूस
गर्जला माजून
दुर्बळ! अशीच
ओरड खुशाल
पहात रहा तू
माझी ही कमाल!
मला ईथे माझे मत व्यक्त करावेसे वाटत नाहीये. कारण त्याने येणाऱ्या प्रतिसादांवर फरक पडू शकतो.
तरी आता ज्याचे त्याने ठरवायचे आहे की तुम्हाला हे दोन मार्ग दाखवले तर तुम्ही कुठे जाल?
दोन्ही मार्ग कोकणात जातात.
एक निसर्गसौंदर्याने नटलेला मार्ग त्याच जुनाट कोकणात नेईल.
तर दुसरा रिफायनरीच्या प्रदूषणाने बरबटलेला मार्ग औद्योगिक कात टाकलेल्या आधुनिक कोकणात नेईल.
कि तुमच्याकडे कुठला तिसरा मार्ग आहे?
नदीसुधार प्रकल्पाच्या नावाखाली अनेक झांडांची कत्तल करण्याचं आणि तीरावर कॉन्क्रीट ओतून बिल्डिंग बांधण्याचं मनपा ने घाटलेलं आहे. ४५००+ कोटींचा हा प्रकल्प नक्की कुणासाठी?
महानगर पालिकेला प्रश्न विचारण्यासाठी आणि हा विनाश थांबवण्यासाठी पुणेकरांनो जागे व्हा! पुणेकरांनो एकत्र या!
आपण काय करणार आहोत?