आमच्या गावातली प्राथमिक शाळा या शैक्षणिक वर्षी अधिकृतपणे बंद झाल्याचं मला काही दिवसांपूर्वी कळलं. जिल्हा परिषदेची, मराठी माध्यमाची एका खेडेगावातली ही छोटीशी शाळा. गेली काही वर्षे ती बंद पडण्याच्या दिशेने जात असल्याचं लक्षात येत होतंच. तरीही, ती खरोखरच बंद झाल्यावर खूप वाईट वाटलं. मी शाळेत असताना साधारणपणे साठ ते पासष्ट विद्यार्थी शाळेत असायचे. पहिली ते चौथी, हे चारही वर्ग मिळून ही संख्या होती. ही संख्या त्याआधी आणि त्यानंतरही अनेक वर्षे स्थिर होती. नंतर मात्र सावकाश, पण निश्चित ओहोटी सुरू झालेली होती.
संध्याकाळ झालीये...सान्यांच्या कॉलनीत गणपती बसलेत...सात वाजून जातायत आणि आरतीला जाण्याची तयारी चालू आहे..आसपासच्या घरातून मालिकांची गाणी ऐकू येतायत.. कोणाच्यातरी घरातला कुकर जोरदार शिट्ट्या मारतोय आणि या सगळ्या गदारोळात मंडळाच्या गाण्यांचीही भर पडलीये.. सान्यांच्या घरातील एक दार मात्र या सगळ्यापासून अलिप्त आहे.. त्यांचा चिनू बारावीलाय नं.. दिवसभर त्याचे कसले कसले क्लास आणि उरलेल्या वेळात अभ्यास... त्यामुळे तो आणि त्याची खोली काहीशी अज्ञातवासातच गेलीये..
सद्याचा भारत हा मूळच्या इथल्या म्हणजे भारतातले लोक तसेच भारताबाहेरुन भारतात आलेल्या लोकांपासून बनलेला देश आहे.अगदी प्राचीन काळापासून ही स्थलांतरे होतायत.भारताच्या अंतर्भागतही बरीच स्थलांतरे झालेली आहेत.दुष्काळ,महापूर,रोजगार,लढाया,इत्यादी अशी विविध कारणे या मागे आहेत.भारतीय उपखंडासंबंधीच्या अशा स्थलांतराच्या नोंदी एकेठिकाणी व्हाव्यात,माहिती संकलित व्हावी तसेच माहितीत काही त्रुटी,चुका असतील तर त्यावरही आदानप्रदान व्हावे,या स्थलांतरामागची कारणे,या स्थलांतरीतांनी नवीन प्रदेशावर टाकलेला प्रभाव इत्यादी गोष्टी समजाव्यात यासाठी हे वाहते पान सुरु करत आहे.
Drawing by Hana Kruzikova
“काय गो, भाताचं काय करता तिकडे? आपला उकडा तांदूळ मिळतो का परदेशात?” लंडनहून पहिल्यांदा रत्नागिरीला गेल्यावर एका काकूंनी विचारलं.
“नाही, बासमती मिळतो.” मी त्यांची काळजी दूर करायच्या हेतूने म्हणाले, पण झालं उलटंच!
“मेलीस! रोज तो लांबलांब दाणा खायला लागतो की काय?” त्या ओरडल्या.
कोकणातला तांदूळ लंडनमध्ये मिळत नाही तो नाहीच, वर पोरीला रोज अख्खा बासमती खाऊन दिवस काढावे लागतायत म्हणजे परांजप्यांवर भलताच प्रसंग गुदरलाय असं वाटून काकूंना आमची फार दया आली होती त्यवेळी.
सुमारे ऐंशी वर्षापूर्वी डॉ फ्रेड अर्कहार्ट या एका कॅनेडियन संशोधकाने मोनार्क या अतिशय सुंदर व नावाला अनुरूप, राजबिंड्या फुलपाखरांचा अभ्यास सुरु केला. कडाक्याच्या थंडीत ही फुलपाखरे कुठे जातात? हा लहानपणापासून त्याला पडलेला प्रश्न! कीटक विषयात डॉक्टरेट मिळवून त्यांनी व त्यांच्या पत्नी नोराह यांनी या फुलपाखरांच्या स्थलांतराचा शोध चालू ठेवला. फुलपाखरांच्या एकत्र येण्याबद्दल ब्रिटिश कीटक शास्त्रज्ञ सी.बी. विल्यम यांनी १९३० मध्ये एक पुस्तक लिहिले होते. पण मोनार्क फुलपाखरे कॅनडा व अमेरिकेतून थंडीच्या ऋतूत नक्की जातात कुठे? हे गूढ उकलले नव्हते.
नोव्हेंबरच्या दुसर्या - तिसर्या आठवड्यात आकाशात काळ्या-पांढर्या रंगाचे पट्टे उमटायला लागतात आणि अचानक कॅनडा गीझचा आवाज आसमंत भरून टाकायला लागतो. कॅनडाहून दक्षिणेला प्रयाण करणारे हे कॅनडा गीझ मजल दरमजल प्रवास करताना काही काळासाठी आपल्या भागात मुक्कामाला आल्याची जाणीव होते. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं या पक्षांचं चाललेलं ट्रेनिंग पाहणं हा विलक्षण अनुभव. त्यांचं एकत्र येणं, विविध गट करणं, आवाजातून आणि पंख फडफडवून संदेश देणं, फिजीकल कपॅसीटी आणि वयानुसार वेगवेगळे ग्रुप्स करून सगळ्यांना एकत्र घेऊन उड्डाण करणं हे सगळंच अचंबित करणारं.
अमेरिकेत आज सुमारे ३० लाख (~ १% लोकसंख्या) भारतीय वंशाचे लोक राहतात; उत्पन्न आणि शिक्षणाच्या बाबतीत सर्वाधिक यशस्वी स्थलांतरित म्हणून भारतीय ओळखले जातात. ते तसे का आहेत हा वेगळ्या धाग्याचा विषय आहे; ह्या लेखात मी भारतीय लोक अमेरिकेत कसे स्थिरावले याचा थोडक्यात आढावा घेणार आहे. अमेरिकेमध्ये भारतीय स्थलांतराचा इतिहास सुमारे १५० वर्ष जुना आहे हे बऱ्याच जणांना ठाऊक नसते. स्थलांतर खऱ्या अर्थाने वाढलं ते १९६५ नंतर आणि त्याबद्दल आपण अनेक माध्यमातून वाचत / ऐकत / पाहत आलो आहोत. पण साधारण १८८० ते १९६५ हा प्रवास मोजक्याच भारतीयांचा असला तरी संघर्षपूर्ण आहे.