नमस्कार. माझ्या मुलीचं पाचवीचं हिंदी पुस्तक वाचताना एका पुस्तकाची माहिती मिळाली. उत्सुकता वाटली म्हणून हे पुस्तक विकत घेतलं आणि लवकरच वाचूनही झालं. अमेरिकन बाल साहित्यातला सर्वोच्च पुरस्कार मिळालेलं आजवरचं एकमेव भारतीय लेखकाचं पुस्तक! धान गोपाल मुकर्जींनी लिहीलेलं 'गे-नेक: द स्टोरी ऑफ अ पिजन!' 'गे-नेक' पिजन म्हणजे रंगीत मानेचं कबूतर आणि हे पुस्तक म्हणजे ह्या कबुतराची कहाणी! १९२५ मध्ये प्रकाशित झालेलं हे पुस्तक म्हणजे लेखकाच्या समृद्ध भावविश्वामधील प्रत्यक्षातील अनुभवांचं वर्णन आहे. आज आपण "त्या काळापासून" खूप दूर आलो आहोत.
Bird's Paradise - पक्ष्यांचे नंदनवन @ राणीबाग
राणीच्या बागेवर हा माझा चौथा वगैरे धागा असेल. (लेखाच्या शेवटी लिंक चेक करू शकता) पण त्याला जबाबदार राणीबागच आहे.
काऱण,
मेरा देश बदल रहा है या नही याची कल्पना नाही, पण मेरा राणीबाग जरूर झपाट्याने बदल रहा है
गणे शोत्सव दणक्यात पार पडला . श्रमपरिहारार्थ वनभोजन करू ह्या बागेत. फुले पाने , पक्षी , एक उंट , व एक बसायला गोधडी.
१) रंगीत गोधडी
२) जादूचे पक्षी तळ्यात व विहरताना:
३) मध चोख णारे पक्षी व लाल केशरी फुले. ढगाळ आकाश
आमच्या बिल्डिंगला छानशी गच्ची आहे आणि दोन विंग्ज गच्चीने एकमेकींना जोडलेल्या असल्यामुळे ती एकूण मिळून बरीच मोठी आहे. कोविडमुळे माझं बागेत किंवा तळ्यावर फिरायला जाणं बंद झालं आणि गच्चीवर जाणं वाढलं. सकाळ-संध्याकाळ गच्चीवर फिरायला गेल्यावर आजूबाजूच्या झाडांवर, झुडपांवर, विजेच्या तारांवर अनेक पक्षी दिसतात. आकाशातून उडत जाणारे बगळे, पाणकावळे, चित्रबलाक, शराटी अशा पक्ष्यांचे भलेमोठे थवेही दिसतात. गच्चीवरून बघितल्याचा फायदा म्हणजे झाडाच्या शेंड्यावर बसलेले पक्षीही दिसतात, ( जे एरवी आपण झाडासमोर उभं असताना सहज दिसत नाहीत. ) शिवाय एकाच वेळी मोठ्या भागावर नजर ठेवता येते.
विहंग
वाटले मज आज होऊनी विहंग
उधळावेत रंग आसमंतातले..
घेतली भरारी पसरूनी पंख
उमटलेत तरंग बघ पाण्यावरी...
मिटलेल्या गच्च पापण्यांनी घेतली मी खोल उडी
केल्या भंग आज मी माझ्याच खोट्या ह्रडी...
न्याहाळतीये हे विश्व होऊनी विहंग
मीच मज संग का उरलेली?
अर्थ लावत मी या जगण्याचा
गाठते सुरुंग मनाच्या अंताचा..
गवसले मज आज होते जे हरवले
बांधिला आता चंग नव्या उम्मेदीचा!
- जान्हवी जोरी.
कलर पेन्सिल
जंगलातल्या मैत्रीची गोष्ट
भल्या पहाटेच बंटी आणि चिकू जंगलात आले होते. निमित्तही तसेच होते. मुंबईचे प्रसिद्ध पक्षीतज्ञ डॉ. सालीम अली त्यांच्या गावाला आले होते. सालीम अंकल (खरे तर आजोबा) त्यांच्या बाबांच्या परिचयातले होते. त्यामुळे सकाळी फिरायला त्यांनी ह्या दोन चुणचुणीत मुलांना सोबत न्यायचे कबुल केले होते. मुलांना थोडी भीती वाटत होती. कारण ते खूप म्हणजे खूपच मोठे शास्त्रज्ञ आहेत असे त्यांना पुन्हा पुन्हा बजावले गेले होते.
नुकताच माझा अमेरीकेतला नव्या नवलाईचा संसार सुरु झाला होता. काही कामानिमित्त बाहेर पडलो. रस्ता एका हाउंसिंग सबडिविजनमधून जात होता. उन्हाळ्याचे दिवस होते. त्यामुळे छोट्या फुलबागा बहरल्या होत्या. मला सगळेच नविन त्यामुळे गाडीच्या खिडकीच्या काचेला अगदी नाक लावून बाहेर बघत होते. एका घराच्या पोर्चबाहेर काचेचे लाल झाकणाचे काहीतरी टांगलेले दिसले. पुढे गेल्यावर तसेच एका आवारातील झाडाच्या फांदीला देखील टांगलेले दिसले.
"ते झाडाला लाल झाकणाचे बाटली सारखे काय टांगलय?" मी कुतुहलाने विचारले.
"हमिंगबर्ड फिडर." रस्त्यावरची नजरही न हटवता नवर्याने उत्तर दिले. कुतुहल शमायच्या ऐवजी वाढले.
अंधश्रध्दा ही केंव्हाही वाईटच. या बद्दल कुणाचेच दुमत नाही. पण गेले काही वर्ष मी एका अंधश्रध्देची गोड फळे चाखतो आहे. मीच काय आमची सगळी सोसायटी या अंधश्रध्देमुळे खुष आहे.
या धाग्यात पक्ष्यांची फक्त उडतानाची प्रकाशचित्रे
शेकाट्या (Black-winged Stilt )