कित्येक वर्षांपूर्वी अगदी ऐन पावसाळ्यात लोणावळा-खंडाळ्याला गेले होते. धुक्यात लपलेले ते हिरवेगार डोंगर, पावसात न्हाऊन पानोपानी प्रफुल्लीत झालेली ती झाडे, हिरव्यागार डोंगरामधून कोसळणारे ते पांढऱ्याशुभ्र पाण्याचे प्रपात. ह्या अशा स्वर्गीय म्हणावं अशा मनोरम निसर्गदृश्याकडे पाहतांना मला काही क्षण अक्षरश: असुरक्षित वाटलं. ह्या सगळ्या असीम सौंदर्याचा फक्त आस्वाद घेण्याची सुद्धा क्षमता आपल्याजवळ नाही. ह्या सौंदर्यांचा आस्वाद घेण्यासाठी आपली पंचेद्रियांची झोळी फाटकी आहे आहे, असे काहीसे विचार मनात येऊन गेले. आपल्या क्षुद्र असण्याची जाणीव नव्याने अस्वथ्य करुन गेली.
मभागौदि २०२५: निसर्गायण
"नितराम् सृजति इति निसर्ग:" जो सर्वांगाने सर्जनशील असतो तो निसर्ग.
मनुष्याचे निसर्गाशी आदिमकाळापासून एक अतूट नाते आहे. खरं तर निसर्ग आपल्या संस्कृतीचा आदिम स्रोत आहे. जगातील कोणत्याही संस्कृतीचा उगम आणि भरभराट निसर्गाच्या सानिध्यातच होत असतात. मानवी भावना देखील निसर्गाच्या सानिध्यात अधिक उचंबळून येतात.
नभिचा प्रभाकर
कधी डोळे वटारून
जाळ ओकतो
कधी गुलाबी थंडीत
शेकोटी पेटवतो
कधी ढगांच्या मस्तीत
लपाछपी खेळतो
कधी चंद्र कवेत घेऊन
पृथ्वीला वाकुल्या दावतो
कधी पूर्वेला फेकून नजर
लालभडक शेंदूर फेकतो
सायंकाळी दर्याला लपेटून
नजराणा पेश करतो
सृष्टीचा असा हा ताबेदार
आपणावर तयाचे अनंत उपकार
प्रा.महेश बिऱ्हाडे
पेझारी रायगड
नभिचा प्रभाकर
कधी डोळे वटारून
जाळ ओकतो
कधी गुलाबी थंडीत
शेकोटी पेटवतो
कधी ढगांच्या मस्तीत
लपाछपी खेळतो
कधी चंद्र कवेत घेऊन
पृथ्वीला वाकुल्या दावतो
कधी पूर्वेला फेकून नजर
लालभडक शेंदूर फेकतो
सायंकाळी दर्याला लपेटून
नजराणा पेश करतो
सृष्टीचा असा हा ताबेदार
आपणावर तयाचे अनंत उपकार
प्रा.महेश बिऱ्हाडे
पेझारी रायगड
घे उतरवला सगळा साज श्रृंगार
तयार आहे आता तुझ्या स्वागताला
बरस हवा तितका, हवा तसा
गोठवून टाक माझ्या नसानसांना
कर प्रयत्न, रंग-रूप सारं कर शुभ्र
तुझ्या बोचऱ्या गारठ्याने टोकेरी फांद्या
रंगहिन, रुक्ष, निष्पर्ण, निरिच्छ, निर्विकार
अन वर दे सोडून निर्लेप वस्त्र पांढरं
राहिन लपेटून तेच गारढोण प्रावरण
सुकत आत आत, रुखं रुखं वरून...
अविरत सरिता गुणगुणती
श्रोतसे रसिक ते नभ वरती
चंचल जलदही स्वैर विहरती
अचलाभवती सलगी करती
विश्रांत चराचर, शीत प्रकृती
शास्त्र, कला, क्रीडा करिती
सृष्टीचे हे कुशल सारथी
गणिताची भाषा वदती
हिमकण घेवूनी आले वारे
खगही म्हणती सुट्टी घ्या रे
सवंगडी परी चिंतित सारे
कुठे राहिला मित्र बरे?
पक्षी पळाले
चिवचिव संपले
कुठे हो गेले
होतोय विकास
रस्ते वाढले
मोठे जाहले
पुरात गेले
होतोय विकास
झाडे तोडली
घरे वाढली
ऊन काहिली
होतोय विकास
निसर्ग रडला
समतोल बिघडला
हाहाकार माजला
पण ... होतोय ना विकास
कणेकरांची "माझी फिल्लमबाजी* परिचित आहेच, ह्या धाग्याच फक्त शीर्षक त्यावरून घेतल आहे, पण हा धागा फिल्म फोटोग्राफीशी (चित्रफित प्रकाशचित्रण) संबंधित आहे. सध्या मोबाईल कॅमेरा च्या युगात फिल्म फोटोग्राफी पुरातन काळातील गोष्ट वाटेल. पण माझ्या सारखे कूणी हौशी असतील, त्यांच्या कडे काही जुने/नवे फोटो, फिल्म कॅमेरा ने काढलेले असतील तर ती प्रदर्शित करता यावी तसच त्याबद्दल चर्चा व्हावी ह्या हेतूने हा धागा सुरु करत आहे.
ह्या भागात फिल्म कॅमेरा बरोबर मॅक्रो लेन्स वापरून काढलेली प्रकाशचित्र पोस्ट करत आहे.
मायबोली आणि मायबोलीकरांना नमस्कार. तुमच्या सगळ्यांच्या प्रोत्साहनाने व आशिर्वादाने मी हिरवी स्वप्ने/Green dreams नावाने यू ट्युब चॅनेल चालू केले आहे. यामध्ये निसर्गातील फुला-पानांच्या, पक्षांच्या गमती जमती, मला टिपता येईल ती माहिती, बागकाम या विषयांचा समावेश असेल. खाली तीन भाग देत आहे. तुम्हाला आवडतील अशी आशा आहे.
इथे तुम्ही बुलबुलचे बाळंतपणचे दोन लेख माझे वाचलेले आहात. या वर्षीच्या जन्मोत्सवाची थोडक्यात कथा खालील भागात आहे.
https://youtu.be/aA6k1AgPocY
सकाळ कोवळी रात्रीनंतर हासत येई
हिरव्या गवताचा गर्द गंध घेवून येई
धुक्यातून दव फुलले उतरे अलगद पानांवर
शिखरावर झाडांच्या उन्ह सोनेरी हळूच येई
झुळू़क हवेची थंडगार वाहते चुकार अल्लड
सरत्या पावसाची सर ठिबठिबणारी सोबत येई
रान फुलले रानफुलांचे रंग लेवून ताजे सुंदर
वार्यावरती हालती डूलती नजरेला सुखवीत जाई
फुलपाखरांसवे पक्षी उडती वरती आरव करती
खोल दरीतून दूर कुणीतरी आल्हादक गीत गाई
- पाषाणभेद
१७/१०/२०२१