निसर्ग
६ व्या मजल्यावरील खिडकी
खिडकी – जगापासून अलिप्त राहून जगाचं निरीक्षण करण्याची जागा!
माझं लहानपण बैठ्या घरात गेलेलं. घराला खिडक्या होत्या पण बाहेरचं जग अगदीच नजरेच्या टप्प्यात होतं. खिडकीचा अलिप्तपणा तितकासा नव्हता. २००१ साली आम्ही दहिसरला ६व्या मजल्यावरील घरात राहायला आलो आणि खिडकीची एक वेगळी मजा कळली.
उन्हाळी निसर्ग
उन्हाळा म्हटला की डोळ्यासमोर निसर्गात रणरणते उन, सुकलेले गवत, पाण्याचे प्रवाह आटलेले असे सगळे डोळ्यासमोर येते. पण ह्याच कडाक्याच्या उन्हात डोळे थंड गार करण्यासाठी निसर्गाने काही झाडांना बहरण्याचे वरदान दिले आहे. पक्षांना घरटी बांधून आपआपली कुटूंब व्यवस्था चालवण्याची मुभा दिली आहे. रानमेव्याचा आस्वादही आपल्याला ह्याच दिवसात भरभरून घेता येतो.
१) दुपार नंतरचा चंद्र पालवी नसलेल्या झाडाचे सौंदर्य वाढवत आहे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १९)
रोखुनि असा हा कोणी, फोडून ढाल नभाची
रोखुनि असा हा कोणी, फोडून ढाल नभाची
नील अंबरी या, निष्पर्ण सन्यस्त कोणी
झडली सर्व पाने, आशा उरात तरीही
झुंजतो वा-याशी, जिवंत फांद्यांमधुनी
निसर्गाच्या गप्पा (भाग १८)
निसर्गाच्या गप्पा (भाग १७)
मला आवडते वाट (आड)वळणाची...
पेठच्या किल्ल्याच्या घाटवाटा::: वाजंत्री घाट अन् कौल्याची धार
..रेंगाळलेले तुरळक ढग, खळाळणारा एखादा झरा, फुलांच्या ताटव्यामागे सदाहरित रानाचा टप्पा अन् या आकृतीबंधाला अनोखं परिमाण देणारा एक वृक्ष...
नकळत कवी अनिल यांची एक जुनी कविता गुणगुणू लागलो:
'मला आवडते वाट वळणाची
अशी भुलकावणीची हुलकावणीची
निसर्गवेळूच्या भर रानीची
मला आवडते वाट वळणाची'
भारतातले मिलेट्स
मला मिलेट्स ला मराठी शब्द नाही माहित परंतु ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी हे मिलेट्स आहेत. धान्य हा शब्द मला पटला नाही कारण गहू तांदूळ हीदेखील धान्ये आहेत, पन त्याचा अंतर्भाव मिलेट्स मधे होत नसावा असा माझा अंदाज आहे. रेफरन्स - खाली दिलेली वेबसाईट. काहीतरी गूगलताना मला ही खूप छान वेबसाईट मिळाली
www.milletindia.org
ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी ह्याशिवाय भारतात कोणती कोणती मिलेट्स आहेत - राळ, जव इत्यादी त्याबद्दल खूप छान माहिती आहे. त्याबद्दलच्या अनेक पाककृती देखील आहेत. अन्नपूर्णांना आणि बागकामाची आवड असणार्यांना आणि ज्यांची घरची शेती आहे अशा अनेकांना ह्या वेब्साईटचा फायदा होईल.