घरची बाग
घरची बाग, भाग १ ( फुलझाडं)
आम्ही घरी गेली 12 वर्षे काही फुलं, फळं, भाजीपाला घरच्या ओल्या कचर्यापासून कंपोस्ट करुन सेंद्रिय पद्धतीने वाढवत आहोत.
बागेतले काही निवडक फोटो ईथे या सिरीज मध्ये देत आहे.
या भागात फुलांचे फोटो आहेत. गेल्या काही वर्षातले एकत्र असे हे फोटो आहेत.
यातली काही फुलं, फळं, भाज्या झाडे आता बागेत नाहीत, तर काही नवीन झाडांची अजून त्यात भर पडणे हे चक्र सुरु असते.
बाल्कनी बाग - एक विरंगुळा. ( डिसेंबर २०२०)
बाल्कनीतल्या अपुऱ्या जागेत आणि फारतर पाच तासांचे मिळणारे ऊन यात बागकामाची हौस भागवणे एक कसरतच असते. सर्वच प्रकारची झाडे हवीहवीशी वाटतात पण जागा पुरत नाही. एक काढले तर दुसऱ्याला जागा मिळते. इनडोर्स पद्धतीची सर्वच लावून चालत नाहीत. कामाचीही लागतात. पुन्हा त्यात वेलवर्गीय भाज्या, साध्या हिरव्या पालेभाज्या, फुलझाडे, मसाले, शेंगाभाज्या, पक्षी / फुलपाखरे यावेत म्हणून त्यांच्यासाठी वेगळी असे नाना प्रकार. सर्वप्रथम ठरवून टाकलेले की रासायनिक फवारे मारायचे नाहीत. ते बाजारात मिळतातच. रोग पडलाच तर सोपा उपाय करायचा अथवा झाड उपटून टाकायचे. फळे,फुले नाही आली तर बदलायचे. उपाय शेवटी दिले आहेत.
कुंडीतल्या वेलास आधार देणे
कुंडीतल्या वेलासाठी आधार
कुंडीमध्ये वेल लावले तर त्यांना आधार कसा द्यायचा?
अ) कुंडीत वेल लावण्या अगोदरच तळाशी असलेल्या भोकातून दोन ती नायलॅान देऱ्या बांधून ठेवायच्या. वरची टोके वर कुठेतरी आडव्या आधाराला बांधली की वेल त्यावर वाढतात. मग वर माती घालून भाज्यांचे वेल लावायचे. पण हा आधार पक्का बांधल्याने वेलाची वाढ झाल्यावर कुंडी हलवता येत नाही.
ब ) स्वतंत्र आधार
आरण्यक - हिरवाई (भाग – ०२ ब)
आरण्यक - हिरवाई (भाग – ०२ अ)
यापूर्वीचा भाग पहिला : https://www.maayboli.com/node/64916
आरण्यक - हिरवाई (भाग – ०२ अ)
Aaranyak – Flora (Part -02 A)
“आरण्यक मधील सखे सोबती“ आपण गेल्या भागात पाहिले.
हे सखे सोबती ज्या हिरवाईमुळे जमले, वाढले, ती हिरवाई मात्र अतिशय कमी पाण्यामुळे फार कष्टाने विचारपूर्वक वाढवायला लागली आहे आहे. याचा तपशील कदाचित पुढे एखाद्या भागात येईलच.. . . . .
भारतातले मिलेट्स
मला मिलेट्स ला मराठी शब्द नाही माहित परंतु ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी हे मिलेट्स आहेत. धान्य हा शब्द मला पटला नाही कारण गहू तांदूळ हीदेखील धान्ये आहेत, पन त्याचा अंतर्भाव मिलेट्स मधे होत नसावा असा माझा अंदाज आहे. रेफरन्स - खाली दिलेली वेबसाईट. काहीतरी गूगलताना मला ही खूप छान वेबसाईट मिळाली
www.milletindia.org
ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी ह्याशिवाय भारतात कोणती कोणती मिलेट्स आहेत - राळ, जव इत्यादी त्याबद्दल खूप छान माहिती आहे. त्याबद्दलच्या अनेक पाककृती देखील आहेत. अन्नपूर्णांना आणि बागकामाची आवड असणार्यांना आणि ज्यांची घरची शेती आहे अशा अनेकांना ह्या वेब्साईटचा फायदा होईल.
टेरारियम (Terrarium) आणि वाढदिवसाची पार्टी
वाढदिवस साजरा करायचा म्हणजे सोपं थोडीच असतं? दरवेळी काहीतरी नविन क्लृप्ती काढायची. 'हटके' झालं पाहिजे, इतरांपेक्षा वेगळं काहीतरी आणि तरीही इंटरेस्टिंग!!! हम्म्.......
बरीच भवति न भवति होऊन लेकीच्या यंदाच्या अकराव्या वाढदिवसानिमित्तच्या पार्टीकरता थीम ठरली - टेरारियम (Terrarium).
