टेक्सासमध्ये खूप बर्फ पडत नसला तरी ३-४ महिने थंडीचे असतात. त्यामुळे बागेचे काम दरवर्षी वसंत ऋतूत नव्याने करायला घ्यावे लागते. क्वचित हिमवर्षाव असला तरी काही आठवडे थंडीने बाग गारठून जाते. अशा काळात सकाळी लख्ख ऊन पडले की बाहेर एक चक्कर टाकायची निसर्गाची करामत पाहायला.
एका हिवाळ्यात पाणलिलींच्या मोठ्या टबातल्या पाण्यावर बर्फाची जाडसर ताटली तयार झालेली. त्यामध्ये एक रोपाची रिकामी कुंडी आधी पडलेली असावी.
कुंडीत एक वाळकं पान होतं. त्याभोवती कुंडीच्या आकाराने बर्फ झालेल्या तबकडीचा हा नजारा…
कोवळ्या उन्हात चमकणारे हे निसर्ग शिल्प !
~
सायली मोकाटे-जोग
बोगनवेल: अधुरी एक कहाणी
एखाद्या गोष्टीचा अनुभव आयुष्यात पहिल्यांदा घेत असल्यास त्याचे खूपच नावीन्य असते. त्यातल्या त्यात, जर ती गोष्ट जगात आपल्या बाबतीत प्रथम घडत असल्यास त्या नाविन्याबरोबर ती एक औत्सुक्याचा आणि अभिमानाचा विषय देखील बनते. परंतु अशा घटनेची जर कोणी काहीच दखल देखील घेतली नसेल तर? अशीच एक रोचक गोष्ट आहे जीन बॅरेट यांची.
जुलै २०२१ मधील अनुभव
आज सकाळी नवर्याने घाईघाईने बाहेर बागेत बोलावले. बघते तर कोपर्यातल्या निवडुन्गाला एक भले मोठे फ़ुल आले होते. पांढरे शुभ्र. जवळ गेल्यावर खूप छान सुगंध आला.
आम्ही ह्या घरात रहायला येऊन तीन महीने होतील. त्यामुळे येथील झाडांशी पूर्ण परिचय नाही झाला अजून. कोपर्यात 2-3 निवडुंग होती, काहिशी दुर्लक्षितच. मला निवडुन्गाची फारशी आवड नाही. आणि त्या ओबड दोभडं दिसणाऱ्या निवडुंगाला इतके सुंदर आणि सुगंधित फुल. क्षणभर डोळ्यांवर विश्वासच बसेना.
![dragonflwr1.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u79915/dragonflwr1.jpg)
खरं तर माझा हा पहिलाच अनुभव आहे. म्हणून एवढं अप्रूप! वसंत ऋतू , स्प्रिंगला अजून अवकाश आहे. हळू हळू दिवस मोठा होतोय. सकाळी सगळं आवरल्यावर थोडा वेळ मिळाला तर मागे अंगणात गेले सहजच. मोसंब्याच्या आणि त्याच्या बाजूच्या पपनसाच्या झाड कडे लक्ष गेल तर अनंताच्या फुलांपेक्षा थोडी लहान अशी पांढऱ्या रंगाची छान फुलं आलेली त्यांच्यावर. उत्सुकतेने जवळ गेले तर त्या फुलांना इतका सुंदर वास. अगदी सुवासिक फुलांचंच झाड जणू.
![spring3.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u79915/spring3.jpg)
![spring10.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u79915/spring10.jpg)
या वर्षीच्या बागकामाच्या गप्पांसाठी धागा सुरु करत आहे.
बाल्कनीतील बाग (बॉटलचा उपयोग)
छोट्याशा जागेत चार फुलझाडं लावणे आणि टाकाऊ बॉटलचा वापर या हेतूने केलेले प्रयोग.
फोटो १
ऑफीस टाइम फुलझाड
![](https://lh3.googleusercontent.com/pw/AMWts8CNJ04QOJBBfsHBZQcXNNsb6dC2v1Mcl1d7iPuqJADHpnqL-5DG4fFsMGKqX7Za6kA39w9VuGXbr16ra_O2Q6AV1xyl2F69hPTW9ITwOiDk6hjpsIvRBLWm7fvVzy3-nu9vlkQHmqxrlGMvT4EAxkbd=w2820-h3660-no?authuser=0 )
अंदाजे ऑक्टोबर २०२१ मध्ये आमच्या शेजाऱ्यांनी त्यांच्या मित्राने छाटलेल्या चाफ्याच्या काही फांद्या दिल्या. आमचे गच्चीवरचे उद्योग बघताना केव्हातरी मी चाफ्याचे झाड लावायची इच्छा दर्शवली होती. ती लक्षात ठेवून त्यांनी ही भेट मला दिली. त्यातून चार फांद्या निवडल्या आणि त्यांचे खालचे टोक ४५ अंशात कापले. पांढरा चीक आला त्यावरच मध, हळद आणि दालचिनी पूड समप्रमाणात घेऊन मिश्रणाचा लेप दिला आणि छोट्या चार कुंड्यांमध्ये एकेक रोप लावले. घरातच चारही प्रयोग ठेवले. आठ दिवसातून एकदा थोडे पाणी घालायचो. तीन चार महिन्यात एकेक करून तीन फांद्या सुकल्या पण एक मात्र तग धरून होती. मरत नव्हती हेच जिवंत असल्याचे लक्षण.
आजचा विषय:- माझं झाड माझी आठवण
झाडांची जास्त चांगली वाढ होण्यासाठी आपण खत वापरतो. मी अगदी सर्व प्रकारची खतं वापरून बघितली आहेत. (Liquid fertilizers to solid fertilizers, bioenzymes, etc) परंतु, जो result झाडांना जीवामृत देऊन मिळाला आहे त्याची तुलना बाकी कशाची होऊ शकत नाही. जीवामृत मुख्यत्वे गोमातेच्या शेणापासून आणि गोमूत्रापासून बनवल जातं. बऱ्याच लेखांमध्ये आणि व्हिडीओज मध्ये मी याबद्दल वाचलं आणि ऐकलं होतं. त्यामुळे, एकदा प्रयत्न करून बघाव असं ठरवलं. पण देशी गायीच ताजं शेण मिळणं हे खूप महत्प्रयासाने शक्य झालं.( गोमूत्र शीळ वापरु शकतो मात्र शेण ताजच हव).