Submitted by मेधा on 27 March, 2025 - 08:49
सालाबादप्रमाणे नवा धागा उघडलेला आहे.
बागकामाचे प्लान्स, बिया, कंद, रोपं या करता चांगले सोर्सेस, स्थानिक गार्डन शो / सेल यांची माहिती लिहिते व्हा मंडळी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अस्ताव्यस्त वाढलेली नि
अस्ताव्यस्त वाढलेली नि प्रचंड फुललेली बोगनवेल पूर्ण विंटरभर घरात आणून जगवली नि तशीच बाहेर नेता आलीये ह्याचा जबरदस्त आनंद झालाय. दर वेळी त्या खोली मधे येता जाताना हातावर ओढले गेलेले ओरखडे वर्थ ठरतील अशी आशा आहे.
बरे झाले हा धागा काढला. धागा
बरे झाले हा धागा काढला. धागा पाहून आळस झटकून काल बागकाम केले. शुगर स्नॅप, लाल आणि काळे रॅडीश, पालक, लिफ लेट्युस, आर्गुला टर्निप ग्रीन्स आणि बीट लावले. गेल्या वर्षीचे ओरेगानो आणि सेज थंडीत तगुन त्यांना नवी पाने येत आहेत. साधे आणि गार्लिक चाईव्जचा आता छान जम बसलाय.
गेल्या वर्षी ब्लॅकबेरीजचे बंपर क्रॉप आले होते, अजून फ्रीझरमधे भरपूर बेरीज आहेत. पण छाटणीला उशीर झाला म्हणा, आम्ही काहीतरी गोंधळ केला म्हणा पण या वर्षीसाठी सेकंड इअर केन्सच नाहीत. आता नवीन फुटवा येतोय तो कलमांचा की रुट स्टॉकचा हा देखील एक प्रश्न आहेच. अजून एक म्हणजे त्या पॅचमधे गेल्या वर्षी मधे मधे सकर्स टाईप उगवले होते. ब्लॅकबेरीसारखे दिसणारे पण ५ लोबची पाने, लालसर दांडे असे काहीतरी. आम्ही जमेल तसे उपटून टाकत होतो. गेले वर्ष झाले आम्हाला अॅग एज्युकेटर नाही त्यामुळे त्यावर उजेड पडायला कुणी नाही.
मी पण आज अरुगुला, रॅडिश,
मी पण आज अरुगुला, रॅडिश, पालक आणि दोन चार प्रकारचे सॅलड ग्रीन्स लावले. बाकी वाफ्याची नांगरणी करुन झाली.
स्वाती ताई, तुमच्या / शेजारच्या काउंटीमधे मास्टर गार्डनर हॉटलाइन असेल तर त्यांना फोन करुन विचारू शकता ब्लॅकबेरी विषयी
धागा काढल्याबद्दल धन्यवाद.
धागा काढल्याबद्दल धन्यवाद.
आम्ही ह्यावर्षी फार काही लावलेलं नाही अजून. पण गेल्या उन्हाळ्यात आणि फॉल मध्ये केलेल्या बागकामाचे रिजल्ट्स बघायला उत्सुक होतो.
गेल्यावर्षी खूप सफरचंद आली होती पण ते झाड घराच्या जवळ होतं. माळी म्हणाला ते रिप्लँट करू शकतो. त्यामुळे लेट फॉलमध्ये बहर गेल्यानंतर ते थोडं दुर हलवलं होतं. जरा धाकधूक होती पण त्याला कळ्या/पानं आली आहेत! अंजीराला कळ्या आल्या आहेत पण वाटत होतं तितक्या वेगाने मोठ्या होत नाहीयेत. त्यामुळे किपींग फिंगर्स क्रॉस्ड! रेनियर चेरींच्या झाडांसाठी इथे नर्सरीत नंबर लावावा लागतो इतकी पटापट ती झाडं संपतात. त्याप्रमाणे एका नर्सरीतून फोन आला आणि ते झाड घेऊन आलो. आता ते जामिनीत लावायचं आहे.
फॉलमध्ये लावलेल्या डॉग वूड आणि जपानी मेपल दोन्हींना कळ्या, पानं आली आहेत. डॅफोडील्स छान फुलली आहेत. ट्युलिप्सनाही कळ्या आल्या आहेत. ह्यावेळी चार चार बल्बचे बंच एकत्र लावले आहेत. त्यामुळे ते फुलं बाहेर दिसतात तसे घोस दिसतील असं वाटलं होतं पण ते बंच लांब लांब लावले गेले. आता पुढच्या वर्षी त्यांच्या मधे मधे अजून लावू.
शिवाय Rhododendron, Hydrangea हे गेल्यावर्षी हलवले होते. त्यांनाही छान फुट आली आहे. कळ्या यायची वाट बघतोय. विंटर जस्मिनचा बहर आता संपला पण त्या वेलीची वाढ होते आहे आणि खूप पानं आली आहेत. हिवाळ्यात त्याला फक्त पिवळी फुलं असतात एकही पान नाही. कुंडीतल्या दोन्ही मम्सना पानं फुटली आहेत. जमितीतलं मम ह्याही वर्षी मेलं बहूतेक.
जमिनीतल्या अॅस्टरलाही फुट आली आहे.
यंदा गोकर्ण, गणेशवेल तसेच झेंडू, सूर्यफुलं आणि पॉपीज लावायच्या आहेत. भाज्यांसाठी जरा वाफे तयार करून घेऊन नीट लावायच्या आहेत. गेल्यावर्षी टोमॅटोजचं वेडं पिक आलं. काही खाली पडून फुटले तर काही सश्यांनी खाल्ले. चेरी टमॅटोज प्रचंड आले! दुधी आणि कार्ल्याचे वेल लावायचे आहेत. बघु कसं काय जमतय.
व्वा मस्त वाटतंय वाचून.
व्वा मस्त वाटतंय वाचून.
यांचे फोटो पण टाका जमल्यास.
पराग मस्त. सगळी लागवड
पराग मस्त. सगळी लागवड डोळ्यासमोर आली.
आमच्याकडे (अॅरिझोना )
आमच्याकडे (अॅरिझोना ) डॅफोडील्स दोन आठवड्यापूर्वी फुलून आता सुकले देखील. दोन वर्षापूर्वी बाग re do केली तेव्हा सांगून देखील त्या माण्साने माझे Narcissus चे चार वर्ष फुलं देणारे बल्ब हरवले. कुठे टाकले कोण जाणे! ऑक्टोबरमधे अॅमेझोन वरुन मागवले. त्याला आता फुले आली आहेत पण ती मिनी डेफोडिल्स निघाली. त्याला सुगंध बिलकूलच नाहीये. आधीचे बल्ब कॅलीफोर्नियातून एका फार्मर मार्केटमधून आणले होते.
डिसेंबरात हरबरा लावला होता तो आता मस्त फुलावर आला आहे.
आमच्याकडे वांग्याचं झाड बारा महिने टिकतं, वांगी सिझनलंच येतात. सध्या खूप कळ्या आल्या आहेत.
मागच्या वर्षी गोकर्णाच्या बिया लावून खूप छान फुलं आली होती. थंडीत वेल वाळला. मला वाटलं होतं की पुन्हा बिया लावाव्या लागतात का काय! पण आता त्यालाच छान पालवी फुटली आहे
मागच्या वर्षी ४ जास्वंद लावले होते. समरला सगळे मेले. फक्त एक लाल जास्वंद मात्र पाच वर्ष छान फुलं देतोय. माझ्या यार्डात दिवसभर उन्हं असतात. झाडांची पार वाट लागते. मागील वर्षी चांगला सात फूट वाढलेला कढीपत्ता मेला पण खाली बरीच रोपं देऊन गेला. ती आता छान वाढताहेत.
लिंबू, डाळिंब, अंजीर, शेवगा ही उन्हं आवडणारी मंडळी मात्र छान असतात. दरवर्षी नेमाने फुलतात, फळतात.
माझ्या गुलमोहराबद्दल लिहीते लवकरच.
मेधा हा धागा काढल्याबद्दल
मेधा हा धागा काढल्याबद्दल धन्यवाद. तू , पराग वेगळ्या झोनमध्ये असता त्यामुळे तुमच्याकडची फळांची, फुलांची झाडे वेगळी आणि माझ्या आवडीची असतात. तुमचे, तसेच स्वाती२ आणि इतरांचे गार्डनिंगचे अपडेट्स वाचायला आवडते.