आजचा विषय:- माझं झाड माझी आठवण
चिंगीनं लावलं एक झाड,
झाडाला म्हणाली लवकर वाढ.
आठवतायत ना बालभारतीतल्या या ओळी
सकाळी उठल्या उठल्या किंवा दमूनभागून आल्यावर हातात चहा/कॉफीचा कप घेऊन जेव्हा आपली नजर गॅलरीतल्या/ अंगणातल्या झाडाकडे जाते तेव्हा किती प्रसन्न वाटतं! ताजी, टवटवीत पानं ,फुलं बघून सगळा शीणवटा निघून जातो. जागा आणि आवड असेल तशी आपण झाडंझुडं लावतो. त्यांना ओंजारतो - गोंजारतो. ती पण भरभरून रंगीत, सुंगंधी दान आपल्या पदरात टाकतात. पूर्वी चाळीत डालडाच्या डब्यात एखादी तुळस तरी नक्की डोलत असायची. मग आता उचला कॅमेरा आणि करा क्लिक. तुम्ही लावलेल्या, तुम्हाला आवडलेल्या कुठल्याही झाडाचा फोटो आणि माहीत असेल तर त्याचं नाव इथं द्या आणि हो झब्बूशी निगडित असेल तर तुमची आठवण/प्रसंग/गंमत लिहायला विसरू नका.
मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया आपल्या सगळ्यांचा आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांचा झब्बू !
हे लक्षात ठेवा:-
१. हा खेळ आहे. स्पर्धा नाही.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०२२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. दिलेल्या छाया/प्रकाशचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छाया/प्रकाशचित्र टाकावे.
४. झब्बूचे छाया/प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/शकते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
६.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे (https://www.maayboli.com/node/47635) पाहा.
छान विषय आहे!
छान विषय आहे!
खजूर :
खजूर :
खजुराच्या झाडाबद्दल कबीरांचा एक दोहा प्रसिद्ध आहे :
बड़ा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड़ खजूर |
पंथी को छाया नहीं, फल लागे अति दूर |
कितनी बातें कितने किस्से
कितनी बातें कितने किस्से
युंही सुने होंगे खडे खडे
ये पेड जाने कितने रिश्तोंका
राजदार होगा, हमसफर होगा
(चित्र काढण्याचा एक आगाऊ प्रयत्न आणि ते बघून सुचलेल्या ओळी)
तयाचा झाडू गेला (तळमजल्याच्या
सूर्यफूले
तयाचा झाडू गेला (तळमजल्याच्या) गगनावेली.
देवबाभूळ
देवबाभूळ
आमच्या सोसायटीला लागून असलेल्या जागेत होतं हे झाड, मागच्या वर्षी उन्मळून पडले.
हा गच्चीवरून काढलेला फोटो हीच आता त्याची आठवण
ओळखा?
ओळखा?
बामणोलीच्या किनाऱ्यावरची ही
बामणोलीच्या किनाऱ्यावरची ही झाडे कोयना बॅकवॉटरच्या पाण्यानुसार कधी आख्खी पाण्याखाली जातात तर कधी पूर्ण कोरडी पडतात पण पावसाळ्यानंतर हिवाळ्याच्या सुरुवातीला यांचे सौंदर्य खरे खुलुन दिसते!!
अमितव भेंडी ना, फुलावरून तरी
अमितव भेंडी ना, फुलावरून तरी तेच वाटतंय
झाड (बहुतेक) अर्जुन वय वर्षे
झाड (बहुतेक) अर्जुन वय वर्षे दोन
शेजारी हिरव्या खोडाची काटेसावरही दिसते आहे.
ही दोन्ही मियावाकी पद्धतीने वाढवलेली आहेत.
बरोबर हर्पेन.
बरोबर हर्पेन.
छान येत आहेत ईथे फोटो
छान येत आहेत ईथे फोटो
हे कशाचे फुल /झाड ओळखा
बडीशेप?
बडीशेप?
बरोबर
बरोबर
साधे गावठी बोराचे झाड पण
साधे गावठी बोराचे झाड पण कातरलेल्या पानातही काय सौंदर्य आहे.
हे आमच्या बागेतले देशी
हे आमच्या बागेतले देशी गुलाबाचे झाड
छान विषय आहे.
छान विषय आहे.
जागृतेश्वर मंदिर, वाशी
सावली, शांतता, सुकून सारे मिळते ईथे..
बुचाचे झाड
बुचाचे झाड
ह्याला काही ठिकाणी आकाशजाई म्हटलेलं वाचनात आले आहे
झाड चितारण्याचा हा अजुन एक
झाड चितारण्याचा हा अजुन एक प्रयत्न
हे आमच्या परसातलं फणसाचं एक
हे आमच्या परसातलं फणसाचं एक झाड. दोन वर्षांपूर्वी 'निसर्ग' चक्रीवादळात मोडून पडलं. आडव्या पडलेल्या खोडाला फुटलेले हे धुमारे
हे निसर्ग चक्रीवादळातच आमच्या
हे निसर्ग चक्रीवादळातच आमच्या कंपाऊंडमधील .. रोज दिसणारे.. रोज बघितले जाणारे
आडव्या पडलेल्या खोडाला
सगळे फोटो सुंदर .
आडव्या पडलेल्या खोडाला फुटलेले हे धुमारे Happy >> वाईट ही वाटलं आणि छान ही वाटलं.
पावसात वादळात झाडं कोलमडली की खूप वाईट वाटत.
Our family tree
Our family tree
कल्पवृक्ष
कल्पवृक्ष
कल्पवृक्षाला झब्बू.
कल्पवृक्षाला झब्बू.
मालवण जवळच्या एका देवळाच्या
मालवण जवळच्या एका देवळाच्या आवारातील फुललेला हा देवचाफा .
सर्व फोटो आहाहा एकदम,
सर्व फोटो आहाहा एकदम, नेत्रसुखदायक.
वावे डोळ्यात पाणी आलं ग, धारातीर्थी पडूनही फणसाची नवी उमेद बघून छान वाटलं.
नताशा फार छान हटके वंशवृक्ष. असा एका कच्छी मित्राकडे बघितलेला. आमच्याकडे रत्नागिरीजवळून फणसे इथे रहायला गेल्यावरची सर्व माहिती आहे, कागदावर (साडेतीनशे वर्षांची आहे), ते असं वृक्ष काढून लिहिता येईल, अर्थात आधीचे फोटो नाही मिळणार पण नावं लिहिता येतील. वृक्ष कल्पना आवडते मला.
ऊर्ध्वमूल ऊर्ध्वशाखं
ऊर्ध्वमूल ऊर्ध्वशाखं (नौपाडा, ठाणे)
माझ्या जुन्या घराच्या
माझ्या जुन्या घराच्या बॅकयार्ड मधे हे क्लिवलँड पेअर ट्री ( ओर्नामेन्टल पेअर ट्री असेही म्हणतात) होतं. याच्या स्प्रिंग मधल्या अशा स्पेक्टॅक्युलर ब्लॉसम मुळे माझं आवडतं झाड होतं हे. याला फळं येत नाहीत पण गार्डन मधे शोभेसाठी , सावलीसाठी लावतात. ते जुनं घर विकलं नंतर. आताचे नवं घर जेव्हा पहिल्यांदा पहायला गेलो तेव्हा नेमका स्प्रिंग होता आणि त्याच्या बॅकयार्डात एक नाही तर दोन क्लिवलँड पेअर ट्री फुललेले होते!
(फोटोत एकच दिसतंय त्यातलं)
मरिना बे, सिंगापूर
मरिना बे, सिंगापूर
किती भलामोठा विस्तार आहे!
किती भलामोठा विस्तार आहे! कॅमेरातही मावायला जमलं नाही.
बारा-बंगला, ठाणे.
Pages